१ |
योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा: त्याची सीमा यरीहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून यरीहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि यरीहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेलास जाते. |
२ |
मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते; |
३ |
पश्चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्यास मिळते. |
४ |
येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांनी आपले वतन घेतले. |
५ |
एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली: त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते. |
६ |
पुढे ती पश्चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथाथ येथून पूर्वेस वळते आणि तानथ-शिलो येथे जाते; तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते. |
७ |
यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून यरीहोपाशी यार्देनेवर निघते. |
८ |
ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय; |
९ |
त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली. |
१० |
गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राइम्यांनी घालवून दिले नाही म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत; ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
यहोशवा १६:1 |
यहोशवा १६:2 |
यहोशवा १६:3 |
यहोशवा १६:4 |
यहोशवा १६:5 |
यहोशवा १६:6 |
यहोशवा १६:7 |
यहोशवा १६:8 |
यहोशवा १६:9 |
यहोशवा १६:10 |
|
|
|
|
|
|
यहोशवा 1 / यहोशवा 1 |
यहोशवा 2 / यहोशवा 2 |
यहोशवा 3 / यहोशवा 3 |
यहोशवा 4 / यहोशवा 4 |
यहोशवा 5 / यहोशवा 5 |
यहोशवा 6 / यहोशवा 6 |
यहोशवा 7 / यहोशवा 7 |
यहोशवा 8 / यहोशवा 8 |
यहोशवा 9 / यहोशवा 9 |
यहोशवा 10 / यहोशवा 10 |
यहोशवा 11 / यहोशवा 11 |
यहोशवा 12 / यहोशवा 12 |
यहोशवा 13 / यहोशवा 13 |
यहोशवा 14 / यहोशवा 14 |
यहोशवा 15 / यहोशवा 15 |
यहोशवा 16 / यहोशवा 16 |
यहोशवा 17 / यहोशवा 17 |
यहोशवा 18 / यहोशवा 18 |
यहोशवा 19 / यहोशवा 19 |
यहोशवा 20 / यहोशवा 20 |
यहोशवा 21 / यहोशवा 21 |
यहोशवा 22 / यहोशवा 22 |
यहोशवा 23 / यहोशवा 23 |
यहोशवा 24 / यहोशवा 24 |