A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

इब्री १३बंधुप्रेम टिकून राहो.
अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.
बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहोत म्हणून पीडितांची आठवण ठेवा.
लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.
तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”
म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”
जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.
विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.
१०
आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणार्‍यांना नाही.
११
कारण ज्या पशूंचे ‘रक्त पापाबद्दल’ प्रमुख याजकाच्या द्वारे ‘परमपवित्रस्थानात नेले जाते’ त्यांची शरीरे ‘तळाबाहेर जाळण्यात येतात.’
१२
म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले.
१३
तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊ या.
१४
कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत.
१५
म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’
१६
चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
१७
आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
१८
आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.
१९
आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.
२०
आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’
२१
तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.
२२
बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.
२३
आपला बंधू तीमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हांला कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन.
२४
तुम्ही आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात.
२५
तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.इब्री १३:1

इब्री १३:2

इब्री १३:3

इब्री १३:4

इब्री १३:5

इब्री १३:6

इब्री १३:7

इब्री १३:8

इब्री १३:9

इब्री १३:10

इब्री १३:11

इब्री १३:12

इब्री १३:13

इब्री १३:14

इब्री १३:15

इब्री १३:16

इब्री १३:17

इब्री १३:18

इब्री १३:19

इब्री १३:20

इब्री १३:21

इब्री १३:22

इब्री १३:23

इब्री १३:24

इब्री १३:25इब्री 1 / इब्री 1

इब्री 2 / इब्री 2

इब्री 3 / इब्री 3

इब्री 4 / इब्री 4

इब्री 5 / इब्री 5

इब्री 6 / इब्री 6

इब्री 7 / इब्री 7

इब्री 8 / इब्री 8

इब्री 9 / इब्री 9

इब्री 10 / इब्री 10

इब्री 11 / इब्री 11

इब्री 12 / इब्री 12

इब्री 13 / इब्री 13