A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

अनुवाद ९हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबी आहेत;
तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे; ‘अनाकांच्या वंशजांशी कोण सामना करील’ असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.
तर आता हे पक्के लक्षात ठेव की, भस्म करणार्‍या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वर आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करशील.
तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देईल, तेव्हा आपल्या मनात म्हणू नकोस की, ‘माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून घेण्यास येथे आणले आहे’; खरे पाहता ह्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्यासमोरून घालवून देत आहे.
तू त्यांचा देश वतन करून घ्यायला जात आहेस हे तुझ्या पुण्याईमुळे नव्हे अथवा तुझ्या मनाच्या सात्त्विकतेमुळे नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे; तसेच तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना परमेश्वराने दिलेले वचन खरे करावे म्हणून तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.
म्हणून हे पक्के लक्षात ठेव की, तुझ्या पुण्याईमुळे हा उत्तम देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे असे नाही; कारण तू ताठ मानेचे राष्ट्र आहेस.
रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.
तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापवले, तेव्हा तो इतका रागावला की, तो तुमचा संहारच करणार होता.
दगडी पाट्या म्हणजे परमेश्वराने तुमच्याशी केलेल्या कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतावर चढून गेलो, तेव्हा मी तेथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीही प्यालो नाही.
१०
आणि देवाच्या बोटाने लिहिलेल्या दोन दगडी पाट्या परमेश्वराने मला दिल्या; आणि मंडळी जमली होती त्या दिवशी जेवढी वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली तेवढी सर्व त्या पाट्यांवर होती.
११
चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यावर परमेश्वराने त्या दोन दगडी पाट्या म्हणजे कराराच्या पाट्या मला दिल्या.
१२
तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, येथून लवकर खाली जा; कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून काढून आणलेस ते बिघडले आहेत, आणि ज्या मार्गाने जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो एवढ्यातच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केली आहे.’
१३
परमेश्वर आणखी मला म्हणाला, ‘मी ह्या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत.
१४
मला अडवू नकोस, मला त्यांचा संहार करू दे, आणि पृथ्वीवरून1 त्यांचे नाव नाहीसे करू दे, म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ व समर्थ असे तुझेच एक राष्ट्र मी करीन.’
१५
तेव्हा मी मागे फिरून पर्वतावरून उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि कराराच्या दोन पाट्या माझ्या दोन्ही हातांत होत्या.
१६
मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले होते; तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आज्ञापिले होते तो केव्हाच सोडून तुम्ही बहकून गेला होता.
१७
तेव्हा मी धरलेल्या त्या दोन पाट्या दोन्ही हातांतून फेकल्या व तुमच्या समक्ष फोडून टाकल्या.
१८
तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून पाप केले व त्याला संतापवले; तुम्ही केलेल्या ह्या पापामुळे मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस व चाळीस रात्री पालथा पडून राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही.
१९
परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की, तो तुमचा संहार करणार होता; त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली; तथापि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले.
२०
परमेश्वर अहरोनावर इतका रागावला होता की, तो त्याचा नाश करणार होता; त्या प्रसंगी त्याच्यासाठीही मी प्रार्थना केली.
२१
मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू घेऊन मी अग्नीत जाळले; नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणार्‍या ओढ्यात फेकून दिले.
२२
नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त करीत राहिलात.
२३
जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हांला रवाना करून सांगितले की, ‘जा, व जो देश मी तुम्हांला दिला आहे तो ताब्यात घ्या,’ तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.
२४
तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.
२५
‘तुमचा नाश करतो’ असे परमेश्वराने म्हटले म्हणून मी त्याच्यासमोर त्या वेळेस चाळीस दिवस व चाळीस रात्री पालथा पडलो होतो.
२६
मी परमेश्वराची अशी प्रार्थना केली की, ‘हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा, हे तुझे वतन तू आपल्या प्रतापाने सोडवलेस आणि पराक्रमी हाताने मिसर देशातून काढून आणलेस त्याचा नाश करू नकोस.
२७
तुझे दास अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांची आठवण कर आणि ह्या लोकांचा हट्ट, दुष्टाई व पाप ह्यांकडे लक्ष देऊ नकोस;
२८
देशील तर ज्या देशातून तू आम्हांला काढून आणलेस, तेथले लोक म्हणतील की, जो देश त्यांना देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते तेथे त्यांना त्याला नेता आले नाही आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून तो त्यांना रानात मारून टाकण्यासाठी घेऊन गेला.
२९
ही तुझी प्रजा आहे, हे तर तुझे वतन आहे, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व उगारलेल्या हाताने काढून आणले आहेस.’अनुवाद ९:1
अनुवाद ९:2
अनुवाद ९:3
अनुवाद ९:4
अनुवाद ९:5
अनुवाद ९:6
अनुवाद ९:7
अनुवाद ९:8
अनुवाद ९:9
अनुवाद ९:10
अनुवाद ९:11
अनुवाद ९:12
अनुवाद ९:13
अनुवाद ९:14
अनुवाद ९:15
अनुवाद ९:16
अनुवाद ९:17
अनुवाद ९:18
अनुवाद ९:19
अनुवाद ९:20
अनुवाद ९:21
अनुवाद ९:22
अनुवाद ९:23
अनुवाद ९:24
अनुवाद ९:25
अनुवाद ९:26
अनुवाद ९:27
अनुवाद ९:28
अनुवाद ९:29


अनुवाद 1 / अनुवाद 1
अनुवाद 2 / अनुवाद 2
अनुवाद 3 / अनुवाद 3
अनुवाद 4 / अनुवाद 4
अनुवाद 5 / अनुवाद 5
अनुवाद 6 / अनुवाद 6
अनुवाद 7 / अनुवाद 7
अनुवाद 8 / अनुवाद 8
अनुवाद 9 / अनुवाद 9
अनुवाद 10 / अनुवाद 10
अनुवाद 11 / अनुवाद 11
अनुवाद 12 / अनुवाद 12
अनुवाद 13 / अनुवाद 13
अनुवाद 14 / अनुवाद 14
अनुवाद 15 / अनुवाद 15
अनुवाद 16 / अनुवाद 16
अनुवाद 17 / अनुवाद 17
अनुवाद 18 / अनुवाद 18
अनुवाद 19 / अनुवाद 19
अनुवाद 20 / अनुवाद 20
अनुवाद 21 / अनुवाद 21
अनुवाद 22 / अनुवाद 22
अनुवाद 23 / अनुवाद 23
अनुवाद 24 / अनुवाद 24
अनुवाद 25 / अनुवाद 25
अनुवाद 26 / अनुवाद 26
अनुवाद 27 / अनुवाद 27
अनुवाद 28 / अनुवाद 28
अनुवाद 29 / अनुवाद 29
अनुवाद 30 / अनुवाद 30
अनुवाद 31 / अनुवाद 31
अनुवाद 32 / अनुवाद 32
अनुवाद 33 / अनुवाद 33
अनुवाद 34 / अनुवाद 34