A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

१ करिंथकर १४प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा.
कारण अन्य भाषा1 बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण ते माणसाला समजत नाही; तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो.
संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.
अन्य भाषा बोलणारा स्वत:चीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो.
तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात, तरी विशेषत: तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे; कारण मंडळीच्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे.
तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्या द्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?
पावा, वीणा, असल्या नाद काढणार्‍या निर्जीव वस्तूंच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल?
तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?
त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वार्‍याबरोबर बोलणारे व्हाल.
१०
जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही.
११
म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणार्‍याला मी बर्बर असा होईन आणि बोलणारा मला बर्बर असा होईल;
१२
तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही, मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावीत म्हणून खटपट करा.
१३
अन्य भाषा बोलणार्‍याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
१४
कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही.
१५
तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार.
१६
तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही.
१७
कारण तुझे उपकारस्तुती करणे चांगले असेल, तरी त्याने2 दुसर्‍याची उन्नती होत नाही.
१८
तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो.
१९
तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्‍यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते.
२०
बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.
२१
नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्‍या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो.
२२
म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणार्‍यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे.
२३
सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय?
२४
परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खातरी होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो,
२५
त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील.
२६
बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे.
२७
अन्य भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत; अधिक नसावेत व त्यांनी पाळीपाळीने बोलावे; आणि एकाने अर्थ सांगावा.
२८
परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वत:बरोबर व देवाबरोबर बोलावे;
२९
संदेश देणार्‍या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, आणि इतरांनी निर्णय करावा;
३०
तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले, तर बोलणार्‍याने उगेच राहावे.
३१
सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल;
३२
संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.
३३
कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांत जशी रीत आहे,
३४
तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे.
३५
त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.
३६
देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय?
३७
जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे.
३८
कोणी तसे समजत नसल्यास न समजो.
३९
म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.
४०
सर्वकाही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.१ करिंथकर १४:1

१ करिंथकर १४:2

१ करिंथकर १४:3

१ करिंथकर १४:4

१ करिंथकर १४:5

१ करिंथकर १४:6

१ करिंथकर १४:7

१ करिंथकर १४:8

१ करिंथकर १४:9

१ करिंथकर १४:10

१ करिंथकर १४:11

१ करिंथकर १४:12

१ करिंथकर १४:13

१ करिंथकर १४:14

१ करिंथकर १४:15

१ करिंथकर १४:16

१ करिंथकर १४:17

१ करिंथकर १४:18

१ करिंथकर १४:19

१ करिंथकर १४:20

१ करिंथकर १४:21

१ करिंथकर १४:22

१ करिंथकर १४:23

१ करिंथकर १४:24

१ करिंथकर १४:25

१ करिंथकर १४:26

१ करिंथकर १४:27

१ करिंथकर १४:28

१ करिंथकर १४:29

१ करिंथकर १४:30

१ करिंथकर १४:31

१ करिंथकर १४:32

१ करिंथकर १४:33

१ करिंथकर १४:34

१ करिंथकर १४:35

१ करिंथकर १४:36

१ करिंथकर १४:37

१ करिंथकर १४:38

१ करिंथकर १४:39

१ करिंथकर १४:40१ करिंथकर 1 / १करिंथ 1

१ करिंथकर 2 / १करिंथ 2

१ करिंथकर 3 / १करिंथ 3

१ करिंथकर 4 / १करिंथ 4

१ करिंथकर 5 / १करिंथ 5

१ करिंथकर 6 / १करिंथ 6

१ करिंथकर 7 / १करिंथ 7

१ करिंथकर 8 / १करिंथ 8

१ करिंथकर 9 / १करिंथ 9

१ करिंथकर 10 / १करिंथ 10

१ करिंथकर 11 / १करिंथ 11

१ करिंथकर 12 / १करिंथ 12

१ करिंथकर 13 / १करिंथ 13

१ करिंथकर 14 / १करिंथ 14

१ करिंथकर 15 / १करिंथ 15

१ करिंथकर 16 / १करिंथ 16