A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

कायदे २३मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.”
तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्‍यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.
तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”
तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय?”
पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्‍याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.”
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परूश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”
तो असे बोलला तेव्हा परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली.
कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात.
तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे शास्त्री परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? [आपण देवाशी भांडू नये].”
१०
असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
११
त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”
१२
मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.”
१३
हा कट रचणारे इसम चाळीसहून अधिक होते.
१४
ते मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही स्वतःला बद्ध करून घेतले आहे.
१५
तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेसहित सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”
१६
ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.
१७
तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.”
१८
तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलायचे आहे.”
१९
तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला मला काय सांगायचे आहे?”
२०
तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
२१
तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.”
२२
तेव्हा, “तू हे मला कळवले आहेस हे कोणाला सांगू नकोस,” असे त्या तरुणाला बजावून सरदाराने त्याला निरोप दिला.
२३
मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्‍या ताशी तयार ठेवा;
२४
आणि पाठाळे मिळवा. त्यांवर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून न्या.”
२५
शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले:
२६
“महाराज फेलिक्स सुभेदार ह्यांना क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम.
२७
ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले;
२८
आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.
२९
तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.
३०
ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. [सुखरूप असावे.]”
३१
शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले;
३२
आणि दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.
३३
कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.
३४
पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर
३५
त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि ‘त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकूम सोडला.कायदे २३:1

कायदे २३:2

कायदे २३:3

कायदे २३:4

कायदे २३:5

कायदे २३:6

कायदे २३:7

कायदे २३:8

कायदे २३:9

कायदे २३:10

कायदे २३:11

कायदे २३:12

कायदे २३:13

कायदे २३:14

कायदे २३:15

कायदे २३:16

कायदे २३:17

कायदे २३:18

कायदे २३:19

कायदे २३:20

कायदे २३:21

कायदे २३:22

कायदे २३:23

कायदे २३:24

कायदे २३:25

कायदे २३:26

कायदे २३:27

कायदे २३:28

कायदे २३:29

कायदे २३:30

कायदे २३:31

कायदे २३:32

कायदे २३:33

कायदे २३:34

कायदे २३:35कायदे 1 / कायदे 1

कायदे 2 / कायदे 2

कायदे 3 / कायदे 3

कायदे 4 / कायदे 4

कायदे 5 / कायदे 5

कायदे 6 / कायदे 6

कायदे 7 / कायदे 7

कायदे 8 / कायदे 8

कायदे 9 / कायदे 9

कायदे 10 / कायदे 10

कायदे 11 / कायदे 11

कायदे 12 / कायदे 12

कायदे 13 / कायदे 13

कायदे 14 / कायदे 14

कायदे 15 / कायदे 15

कायदे 16 / कायदे 16

कायदे 17 / कायदे 17

कायदे 18 / कायदे 18

कायदे 19 / कायदे 19

कायदे 20 / कायदे 20

कायदे 21 / कायदे 21

कायदे 22 / कायदे 22

कायदे 23 / कायदे 23

कायदे 24 / कायदे 24

कायदे 25 / कायदे 25

कायदे 26 / कायदे 26

कायदे 27 / कायदे 27

कायदे 28 / कायदे 28