१ |
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
२ |
“अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.” |
३ |
अहरोनाने तसे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले. |
४ |
दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते; बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते; परमेश्वराने मोशेला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडवला होता. |
५ |
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
६ |
“इस्राएल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर. |
७ |
तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर: पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे. |
८ |
मग त्यांनी एक गोर्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे; आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा. |
९ |
मग तू लेव्यांना दर्शनमंडपासमोर सादर करावे आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी; |
१० |
लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करत असताना इस्राएल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत; |
११ |
लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1 |
१२ |
तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोर्हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा. |
१३ |
मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे. |
१४ |
ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील. |
१५ |
तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पण केल्यानंतर त्यांनी सेवा करायला दर्शनमंडपात जावे. |
१६ |
कारण इस्राएल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत; उदरातून प्रथम निघणार्या अर्थात इस्राएल लोकांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे. |
१७ |
कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले. |
१८ |
इस्राएल लोकांतील प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. |
१९ |
दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.” |
२० |
मोशे, अहरोन आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी ह्या प्रकारे लेव्यांना केले; परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी त्यांचे सर्वकाही केले. |
२१ |
लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त केले. |
२२ |
त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात गेले. लेव्यां-संबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले. |
२३ |
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
२४ |
“लेव्यांसंबंधीचा नियम हा: वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा; |
२५ |
ते पन्नास वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये; |
२६ |
पण त्यांनी आपल्या भाऊबंदांसह दर्शनमंडपात रक्षकाचे काम करावे, दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपवलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंबर ८:1 |
नंबर ८:2 |
नंबर ८:3 |
नंबर ८:4 |
नंबर ८:5 |
नंबर ८:6 |
नंबर ८:7 |
नंबर ८:8 |
नंबर ८:9 |
नंबर ८:10 |
नंबर ८:11 |
नंबर ८:12 |
नंबर ८:13 |
नंबर ८:14 |
नंबर ८:15 |
नंबर ८:16 |
नंबर ८:17 |
नंबर ८:18 |
नंबर ८:19 |
नंबर ८:20 |
नंबर ८:21 |
नंबर ८:22 |
नंबर ८:23 |
नंबर ८:24 |
नंबर ८:25 |
नंबर ८:26 |
|
|
|
|
|
|
नंबर 1 / नंबर 1 |
नंबर 2 / नंबर 2 |
नंबर 3 / नंबर 3 |
नंबर 4 / नंबर 4 |
नंबर 5 / नंबर 5 |
नंबर 6 / नंबर 6 |
नंबर 7 / नंबर 7 |
नंबर 8 / नंबर 8 |
नंबर 9 / नंबर 9 |
नंबर 10 / नंबर 10 |
नंबर 11 / नंबर 11 |
नंबर 12 / नंबर 12 |
नंबर 13 / नंबर 13 |
नंबर 14 / नंबर 14 |
नंबर 15 / नंबर 15 |
नंबर 16 / नंबर 16 |
नंबर 17 / नंबर 17 |
नंबर 18 / नंबर 18 |
नंबर 19 / नंबर 19 |
नंबर 20 / नंबर 20 |
नंबर 21 / नंबर 21 |
नंबर 22 / नंबर 22 |
नंबर 23 / नंबर 23 |
नंबर 24 / नंबर 24 |
नंबर 25 / नंबर 25 |
नंबर 26 / नंबर 26 |
नंबर 27 / नंबर 27 |
नंबर 28 / नंबर 28 |
नंबर 29 / नंबर 29 |
नंबर 30 / नंबर 30 |
नंबर 31 / नंबर 31 |
नंबर 32 / नंबर 32 |
नंबर 33 / नंबर 33 |
नंबर 34 / नंबर 34 |
नंबर 35 / नंबर 35 |
नंबर 36 / नंबर 36 |