१ |
परमेश्वर मवाबाच्या मैदानात यरीहोसमोर यार्देनेतीरी मोशेला म्हणाला, |
२ |
“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, तुम्ही आपल्या ताब्यात मिळणार्या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावीत आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावीत. |
३ |
नगरे त्यांच्या वस्तीसाठी असावीत आणि शिवारे त्यांची गुरेढोरे, शेरडेमेंढरे आणि त्यांच्या सर्व जनावरांसाठी असावीत. |
४ |
लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत. |
५ |
आणि नगराच्या बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दक्षिण बाजूस दोन हजार हात, पश्चिम बाजूस दोन हजार हात, उत्तर बाजूस दोन हजार हात मोजावेत आणि नगर मध्ये असावे, हेच त्यांच्या नगराचे शिवार असावे. |
६ |
लेव्यांना जी नगरे द्याल त्यांपैकी सहा शरणपुरे असावीत, मनुष्यवध करणार्यांना तेथे पळून जाऊ द्यावे; त्या सहांखेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावीत. |
७ |
अशी एकंदर अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची शिवारे लेव्यांना द्यावीत. |
८ |
इस्राएल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यायची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावीत; प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत.” |
९ |
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
१० |
“इस्राएल लोकांना सांग: यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहचाल, |
११ |
तेव्हा तुमच्याकरता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा; म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे. |
१२ |
सूड उगवणार्यापासून आश्रयस्थानादाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये. |
१३ |
जी नगरे तुम्ही द्याल त्यांपैकी सहा तुमची शरणपुरे असावीत. |
१४ |
तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावीत आणि तीन नगरे कनान देशात द्यावीत, ही शरणपुरे होत. |
१५ |
ही सहा नगरे इस्राएल लोकांसाठी, त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपर्यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे. |
१६ |
तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. |
१७ |
ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा मनुष्याला अवश्य जिवे मारावे. |
१८ |
ज्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. |
१९ |
रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे. |
२० |
कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले, किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला; |
२१ |
अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला, तर मारणार्याला अवश्य जिवे मारावे; तो खुनी होय; रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने खुनी सापडेल तेथे त्याला जिवे मारावे. |
२२ |
तथापि कोणी वैरभावाने नव्हे पण अचानक एखाद्याला ढकलले किंवा टपून न बसता त्याच्यावर एखादे शस्त्र फेकले, किंवा ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा हातात घेऊन नकळत कोणावर फेकला, |
२३ |
आणि त्यामुळे तो मेला, आणि तो त्याचा शत्रू नसला अथवा त्याने त्याची हानी करू पाहिली नसली, |
२४ |
तर मंडळीने मारणार्याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याचा न्याय ह्या नियमानुसार करावा. |
२५ |
मग मनुष्यवध करणार्या त्या मनुष्याला, रक्तपाताबद्दल सूड घेणार्याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे; आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे. |
२६ |
पण मनुष्यवध करणारा ज्या शरणपुरात पळून गेला असेल त्याच्या सीमेबाहेर जर तो कधी गेला, |
२७ |
आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले, आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागायचा नाही. |
२८ |
कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणार्याने शरणपुरातच राहायचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे. |
२९ |
तुमच्या पिढ्यानपिढ्यासाठी तुमच्या सर्व वस्तीच्या ठिकाणी ह्या गोष्टी तुमच्या न्यायाचे विधी म्हणून नेमलेल्या आहेत. |
३० |
कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये. |
३१ |
मनुष्यवध करणारा देहान्त शासनास पात्र ठरला तर त्याच्या प्राणाबद्दल खंडणी घेऊन त्याला सोडून देऊ नये, पण त्याला अवश्य जिवे मारावे. |
३२ |
त्याचप्रमाणे शरणपुरात पळून गेलेल्या मनुष्याबद्दल काही खंडणी घेऊन त्याला याजक मरण्यापूर्वी आपल्या वतनात राहण्यास परत जाऊ देऊ नये. |
३३ |
ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित्त होऊ शकत नाही. |
३४ |
ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंबर ३५:1 |
नंबर ३५:2 |
नंबर ३५:3 |
नंबर ३५:4 |
नंबर ३५:5 |
नंबर ३५:6 |
नंबर ३५:7 |
नंबर ३५:8 |
नंबर ३५:9 |
नंबर ३५:10 |
नंबर ३५:11 |
नंबर ३५:12 |
नंबर ३५:13 |
नंबर ३५:14 |
नंबर ३५:15 |
नंबर ३५:16 |
नंबर ३५:17 |
नंबर ३५:18 |
नंबर ३५:19 |
नंबर ३५:20 |
नंबर ३५:21 |
नंबर ३५:22 |
नंबर ३५:23 |
नंबर ३५:24 |
नंबर ३५:25 |
नंबर ३५:26 |
नंबर ३५:27 |
नंबर ३५:28 |
नंबर ३५:29 |
नंबर ३५:30 |
नंबर ३५:31 |
नंबर ३५:32 |
नंबर ३५:33 |
नंबर ३५:34 |
|
|
|
|
|
|
नंबर 1 / नंबर 1 |
नंबर 2 / नंबर 2 |
नंबर 3 / नंबर 3 |
नंबर 4 / नंबर 4 |
नंबर 5 / नंबर 5 |
नंबर 6 / नंबर 6 |
नंबर 7 / नंबर 7 |
नंबर 8 / नंबर 8 |
नंबर 9 / नंबर 9 |
नंबर 10 / नंबर 10 |
नंबर 11 / नंबर 11 |
नंबर 12 / नंबर 12 |
नंबर 13 / नंबर 13 |
नंबर 14 / नंबर 14 |
नंबर 15 / नंबर 15 |
नंबर 16 / नंबर 16 |
नंबर 17 / नंबर 17 |
नंबर 18 / नंबर 18 |
नंबर 19 / नंबर 19 |
नंबर 20 / नंबर 20 |
नंबर 21 / नंबर 21 |
नंबर 22 / नंबर 22 |
नंबर 23 / नंबर 23 |
नंबर 24 / नंबर 24 |
नंबर 25 / नंबर 25 |
नंबर 26 / नंबर 26 |
नंबर 27 / नंबर 27 |
नंबर 28 / नंबर 28 |
नंबर 29 / नंबर 29 |
नंबर 30 / नंबर 30 |
नंबर 31 / नंबर 31 |
नंबर 32 / नंबर 32 |
नंबर 33 / नंबर 33 |
नंबर 34 / नंबर 34 |
नंबर 35 / नंबर 35 |
नंबर 36 / नंबर 36 |