A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

नंबर ३०मोशे इस्राएल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला, “परमेश्वराने दिलेली आज्ञा ही:
एखाद्या पुरुषाने परमेश्वराला नवस केला अथवा आपण व्रतबद्ध होण्याची शपथ वाहिली तर त्याने आपली शपथ मोडू नये; जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे.
त्याचप्रमाणे एखादी स्त्री तरुणपणात आपल्या बापाच्या घरी असताना परमेश्वराला नवस करून व्रतबद्ध झाली असेल,
आणि तिचा नवस आणि ज्या वचनाने ती व्रतबद्ध झाली ते ऐकून तिचा बाप काही बोलला नसेल, तर तिचे सर्व नवस कायम राहतील, आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यांपैकी कोणतेही कायम राहणार नाही; तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
तिने नवस केल्यावर किंवा ती अविचाराने व्रतबद्ध झाल्यावर तिचा विवाह झाला,
आणि तिच्या नवसाविषयी ऐकून तिचा पती काही बोलला नाही, तर तिचे नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली, तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील; आणि परमेश्वर तिला क्षमा करील.
विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती कायम राहतील.
१०
एखाद्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असताना नवस केला अथवा शपथेने स्वतःला बद्ध करून घेतले,
११
व तिचा पती ते ऐकून काही बोलला नाही व त्याने तिला मनाई केली नाही, तर तिचे सर्व नवस कायम राहतील व ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
१२
पण नवर्‍याने ती ऐकली त्याच दिवशी ती रद्द केली, तर तिच्या तोंडून जे नवस अथवा तिला बद्ध करणारी जी वचने निघाली असतील ती रद्द होतील; तिच्या नवर्‍याने ती रद्द केली आहेत म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
१३
तिचा कोणताही नवस किंवा जिवाला दंडन करणारे कोणतेही व्रत तिचा पती कायम करील किंवा रद्द करील.
१४
दिवसामागून दिवस जात असता तिचा पती तिला काही बोलत नाही, तर तो तिचे सर्व नवस आणि ज्या ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती कायम करतो; ती ऐकली त्याच दिवशी तो काही बोलत नाही, ह्यावरून त्याने ती कायम केली आहेत असे समजावे.
१५
पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधाची शिक्षा त्याने भोगावी.”
१६
पतिपत्नीसंबंधीच्या आणि पिता व त्याच्या घरी राहणारी त्याची अविवाहित कन्या ह्यांच्या संबंधीच्या ज्या विधींविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली ते हे विधी होत.नंबर ३०:1
नंबर ३०:2
नंबर ३०:3
नंबर ३०:4
नंबर ३०:5
नंबर ३०:6
नंबर ३०:7
नंबर ३०:8
नंबर ३०:9
नंबर ३०:10
नंबर ३०:11
नंबर ३०:12
नंबर ३०:13
नंबर ३०:14
नंबर ३०:15
नंबर ३०:16


नंबर 1 / नंबर 1
नंबर 2 / नंबर 2
नंबर 3 / नंबर 3
नंबर 4 / नंबर 4
नंबर 5 / नंबर 5
नंबर 6 / नंबर 6
नंबर 7 / नंबर 7
नंबर 8 / नंबर 8
नंबर 9 / नंबर 9
नंबर 10 / नंबर 10
नंबर 11 / नंबर 11
नंबर 12 / नंबर 12
नंबर 13 / नंबर 13
नंबर 14 / नंबर 14
नंबर 15 / नंबर 15
नंबर 16 / नंबर 16
नंबर 17 / नंबर 17
नंबर 18 / नंबर 18
नंबर 19 / नंबर 19
नंबर 20 / नंबर 20
नंबर 21 / नंबर 21
नंबर 22 / नंबर 22
नंबर 23 / नंबर 23
नंबर 24 / नंबर 24
नंबर 25 / नंबर 25
नंबर 26 / नंबर 26
नंबर 27 / नंबर 27
नंबर 28 / नंबर 28
नंबर 29 / नंबर 29
नंबर 30 / नंबर 30
नंबर 31 / नंबर 31
नंबर 32 / नंबर 32
नंबर 33 / नंबर 33
नंबर 34 / नंबर 34
नंबर 35 / नंबर 35
नंबर 36 / नंबर 36