१ |
परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, |
२ |
“दर्शनमंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्राएल लोकांनी आपापल्या निशाणाजवळ व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजाजवळ आपले डेरे द्यावेत. |
३ |
पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकायचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावेत; यहूदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा; |
४ |
त्याच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौर्याहत्तर हजार सहाशे होती. |
५ |
त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते इस्साखार वंशातले लोक असावेत; इस्साखार वंशाचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल असावा; |
६ |
त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे होती. |
७ |
मग जबुलून वंशातील लोक; जबुलून वंशाचा सरदार हेलोनाचा मुलगा अलीयाब असावा; |
८ |
त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती सत्तावन्न हजार चारशे होती. |
९ |
ह्या प्रकारे यहूदा वंशाच्या छावणीत त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष शहाऐंशी हजार चारशे होती. कूच करताना ह्यांनीच अग्रभागी चालावे. |
१० |
दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; रऊबेन वंशाचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर असावा. |
११ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती शेहेचाळीस हजार पाचशे होती. |
१२ |
त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते शिमोन वंशातले लोक असावेत; शिमोन वंशाचा सरदार सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल असावा; |
१३ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती एकोणसाठ हजार तीनशे होती. |
१४ |
मग गाद वंशाचे लोक; गाद वंशाचा सरदार रगुवेलाचा मुलगा एल्यासाप असावा; |
१५ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास होती. |
१६ |
ह्या प्रकारे रऊबेन वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष एकावन्न हजार चारशे पन्नास होती. कूच करताना त्यांची रांग दुसरी असावी. |
१७ |
मग सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा; ज्या क्रमाने ते डेरे ठोकतील त्याच क्रमाने त्यांनी आपापल्या जागी आपापल्या निशाणांजवळ राहून कूच करावे. |
१८ |
पश्चिम बाजूस एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; एफ्राईम वंशाचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा हा असावा; |
१९ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती चाळीस हजार पाचशे होती. |
२० |
त्यांच्याशेजारी मनश्शे वंशाचे डेरे ठोकावेत आणि मनश्शे वंशाचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल हा असावा; |
२१ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती बत्तीस हजार दोनशे होती. |
२२ |
मग बन्यामीन वंशाचे लोक; बन्यामीन वंशाचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा; |
२३ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती पस्तीस हजार चारशे होती. |
२४ |
ह्या प्रकारे एफ्राईम वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष आठ हजार शंभर होती. कूच करताना त्यांची रांग तिसरी असावी. |
२५ |
उत्तर बाजूस दान वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलाप्रमाणे राहावे; दान वंशाचा सरदार अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा असावा. |
२६ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे होती. |
२७ |
त्यांच्याशेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावेत, आणि आशेर वंशाचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल हा असावा. |
२८ |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे होती. |
२९ |
मग नफताली वंशाचे लोक; नफताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा हा असावा; |
३० |
त्यांच्या दलांची जी मोजदाद झाली ती त्रेपन्न हजार चारशे होती. |
३१ |
ह्या प्रकारे दान वंशाच्या छावणीत त्या सर्वांची जी मोजदाद झाली, ती एक लक्ष सत्तावन्न हजार सहाशे होती. कूच करताना ह्यांनी आपली निशाणे घेऊन सर्वांच्या पिछाडीस चालावे.” |
३२ |
इस्राएल वंशातील ज्या लोकांची त्यांच्या-त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे मोजदाद झाली ती ही. त्यांच्या छावण्यांतील त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे ज्या सर्वांची मोजदाद करण्यात आली, त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास होती. |
३३ |
परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्राएल लोकांबरोबर झाली नाही. |
३४ |
त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणाजवळ डेरे ठोकत आणि कूच करीत.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंबर २:1 |
नंबर २:2 |
नंबर २:3 |
नंबर २:4 |
नंबर २:5 |
नंबर २:6 |
नंबर २:7 |
नंबर २:8 |
नंबर २:9 |
नंबर २:10 |
नंबर २:11 |
नंबर २:12 |
नंबर २:13 |
नंबर २:14 |
नंबर २:15 |
नंबर २:16 |
नंबर २:17 |
नंबर २:18 |
नंबर २:19 |
नंबर २:20 |
नंबर २:21 |
नंबर २:22 |
नंबर २:23 |
नंबर २:24 |
नंबर २:25 |
नंबर २:26 |
नंबर २:27 |
नंबर २:28 |
नंबर २:29 |
नंबर २:30 |
नंबर २:31 |
नंबर २:32 |
नंबर २:33 |
नंबर २:34 |
|
|
|
|
|
|
नंबर 1 / नंबर 1 |
नंबर 2 / नंबर 2 |
नंबर 3 / नंबर 3 |
नंबर 4 / नंबर 4 |
नंबर 5 / नंबर 5 |
नंबर 6 / नंबर 6 |
नंबर 7 / नंबर 7 |
नंबर 8 / नंबर 8 |
नंबर 9 / नंबर 9 |
नंबर 10 / नंबर 10 |
नंबर 11 / नंबर 11 |
नंबर 12 / नंबर 12 |
नंबर 13 / नंबर 13 |
नंबर 14 / नंबर 14 |
नंबर 15 / नंबर 15 |
नंबर 16 / नंबर 16 |
नंबर 17 / नंबर 17 |
नंबर 18 / नंबर 18 |
नंबर 19 / नंबर 19 |
नंबर 20 / नंबर 20 |
नंबर 21 / नंबर 21 |
नंबर 22 / नंबर 22 |
नंबर 23 / नंबर 23 |
नंबर 24 / नंबर 24 |
नंबर 25 / नंबर 25 |
नंबर 26 / नंबर 26 |
नंबर 27 / नंबर 27 |
नंबर 28 / नंबर 28 |
नंबर 29 / नंबर 29 |
नंबर 30 / नंबर 30 |
नंबर 31 / नंबर 31 |
नंबर 32 / नंबर 32 |
नंबर 33 / नंबर 33 |
नंबर 34 / नंबर 34 |
नंबर 35 / नंबर 35 |
नंबर 36 / नंबर 36 |