१ |
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
२ |
“इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे-त्याचे नाव लिही; |
३ |
लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही; कारण इस्राएलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एकेक काठी घे, |
४ |
आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. |
५ |
ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील; इस्राएल लोक तुमच्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन.” |
६ |
मोशेने इस्राएल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर बारा काठ्या दिल्या; त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाचीही काठी होती. |
७ |
मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या. |
८ |
दुसर्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले. |
९ |
तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्राएल लोकांकडे नेल्या; व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. |
१० |
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे; ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी; अशाने ते माझ्याविरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील, म्हणजे ते मरायचे नाहीत.” |
११ |
मोशेने तसे केले; परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती तसे त्याने केले; |
१२ |
मग इस्राएल लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरत आहोत, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहोत. |
१३ |
जो कोणी जवळ जाईल म्हणजे परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वांचा अंत होणार की काय?”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंबर १७:1 |
नंबर १७:2 |
नंबर १७:3 |
नंबर १७:4 |
नंबर १७:5 |
नंबर १७:6 |
नंबर १७:7 |
नंबर १७:8 |
नंबर १७:9 |
नंबर १७:10 |
नंबर १७:11 |
नंबर १७:12 |
नंबर १७:13 |
|
|
|
|
|
|
नंबर 1 / नंबर 1 |
नंबर 2 / नंबर 2 |
नंबर 3 / नंबर 3 |
नंबर 4 / नंबर 4 |
नंबर 5 / नंबर 5 |
नंबर 6 / नंबर 6 |
नंबर 7 / नंबर 7 |
नंबर 8 / नंबर 8 |
नंबर 9 / नंबर 9 |
नंबर 10 / नंबर 10 |
नंबर 11 / नंबर 11 |
नंबर 12 / नंबर 12 |
नंबर 13 / नंबर 13 |
नंबर 14 / नंबर 14 |
नंबर 15 / नंबर 15 |
नंबर 16 / नंबर 16 |
नंबर 17 / नंबर 17 |
नंबर 18 / नंबर 18 |
नंबर 19 / नंबर 19 |
नंबर 20 / नंबर 20 |
नंबर 21 / नंबर 21 |
नंबर 22 / नंबर 22 |
नंबर 23 / नंबर 23 |
नंबर 24 / नंबर 24 |
नंबर 25 / नंबर 25 |
नंबर 26 / नंबर 26 |
नंबर 27 / नंबर 27 |
नंबर 28 / नंबर 28 |
नंबर 29 / नंबर 29 |
नंबर 30 / नंबर 30 |
नंबर 31 / नंबर 31 |
नंबर 32 / नंबर 32 |
नंबर 33 / नंबर 33 |
नंबर 34 / नंबर 34 |
नंबर 35 / नंबर 35 |
नंबर 36 / नंबर 36 |