१ |
कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ |
२ |
हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. |
३ |
ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, “तुमचे आता फारच झाले! सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता?” |
४ |
हे ऐकून मोशे पालथा पडला; |
५ |
मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, “परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल; ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल. |
६ |
आता असे करा. कोरहा, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा; |
७ |
आणि उद्या त्यांत अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा; मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल; लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले.” |
८ |
तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो ऐका; |
९ |
तुम्ही परमेश्वराच्या निवासमंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आपल्याजवळ येऊ दिले; ह्या कार्यासाठी इस्राएलाच्या देवाने तुम्हांला इस्राएल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे हे काय थोडे झाले? |
१० |
तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंदांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय? |
११ |
ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात, हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्याविरुद्ध कुरकुर करावी?” |
१२ |
मोशेने अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांना बोलावणे पाठवले; पण ते म्हणाले, “आम्ही येत नाही; |
१३ |
दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशातून काढून तू आम्हांला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस हे काय थोडे झाले म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवतोस? |
१४ |
शिवाय, दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशात तू आम्हांला मुळीच आणलेले नाहीस अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हांला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यांत तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही.” |
१५ |
तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.” |
१६ |
मग मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तू आपल्या सार्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो; तू, ते व अहरोन |
१७ |
तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला; प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे दोनशे पन्नास धुपाटणी परमेश्वरासमोर आणावीत; तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे.” |
१८ |
तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेवला व त्यावर धूप घातला, आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शनमंडपाच्या दाराजवळ उभे राहिले. |
१९ |
कोरहाने त्यांच्याविरुद्ध सगळी मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमवली, तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. |
२० |
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, |
२१ |
“तुम्ही ह्या मंडळीतून वेगळे व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करतो.” |
२२ |
तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?” |
२३ |
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, |
२४ |
“मंडळीला सांग की, तुम्ही कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा.” |
२५ |
तेव्हा मोशे उठून दाथान व अबीराम ह्यांच्याकडे गेला आणि इस्राएल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले. |
२६ |
तो मंडळीला म्हणाला, “तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.” |
२७ |
मग ते कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या डेर्याजवळून निघून गेले; आणि दाथान व अबीराम बाहेर निघाले व आपली बायकामुले व तान्ही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दाराजवळ उभे राहिले. |
२८ |
तेव्हा मोशे म्हणाला, “मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करायला परमेश्वराने मला पाठवले आहे हे तुम्हांला दिसून येईल. |
२९ |
इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा. |
३० |
पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे.” |
३१ |
हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली. |
३२ |
आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. |
३३ |
ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. |
३४ |
‘पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील’ असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्राएल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले. |
३५ |
मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले. |
३६ |
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, |
३७ |
“अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत व तो अग्नी विखरून टाक. |
३८ |
पाप करून आपल्या जिवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे पवित्र आहेत; ह्या प्रकारे ती इस्राएल लोकांना ताकीद दिल्याची चिन्हे होतील.” |
३९ |
जी पितळेची धुपाटणी अग्नीने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पण केली होती, ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी मढवली; |
४० |
ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये. |
४१ |
दुसर्या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, “तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकले आहे.” |
४२ |
मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शनमंडपाकडे नजर टाकली तेव्हा त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रकट झाले आहे असे त्यांना दिसले. |
४३ |
हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपासमोर गेले. |
४४ |
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, |
४५ |
“तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो.” हे ऐकून ते पालथे पडले. |
४६ |
मग मोशे अहरोनाला म्हणाला, “धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून ते ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे.” |
४७ |
मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला आणि लोकात मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित्त केले. |
४८ |
मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली. |
४९ |
कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे ऐंशी लोक मेले. |
५० |
मरी थांबल्यावर अहरोन दर्शनमंडपाच्या दाराकडे मोशेजवळ परत आला.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंबर १६:1 |
नंबर १६:2 |
नंबर १६:3 |
नंबर १६:4 |
नंबर १६:5 |
नंबर १६:6 |
नंबर १६:7 |
नंबर १६:8 |
नंबर १६:9 |
नंबर १६:10 |
नंबर १६:11 |
नंबर १६:12 |
नंबर १६:13 |
नंबर १६:14 |
नंबर १६:15 |
नंबर १६:16 |
नंबर १६:17 |
नंबर १६:18 |
नंबर १६:19 |
नंबर १६:20 |
नंबर १६:21 |
नंबर १६:22 |
नंबर १६:23 |
नंबर १६:24 |
नंबर १६:25 |
नंबर १६:26 |
नंबर १६:27 |
नंबर १६:28 |
नंबर १६:29 |
नंबर १६:30 |
नंबर १६:31 |
नंबर १६:32 |
नंबर १६:33 |
नंबर १६:34 |
नंबर १६:35 |
नंबर १६:36 |
नंबर १६:37 |
नंबर १६:38 |
नंबर १६:39 |
नंबर १६:40 |
नंबर १६:41 |
नंबर १६:42 |
नंबर १६:43 |
नंबर १६:44 |
नंबर १६:45 |
नंबर १६:46 |
नंबर १६:47 |
नंबर १६:48 |
नंबर १६:49 |
नंबर १६:50 |
|
|
|
|
|
|
नंबर 1 / नंबर 1 |
नंबर 2 / नंबर 2 |
नंबर 3 / नंबर 3 |
नंबर 4 / नंबर 4 |
नंबर 5 / नंबर 5 |
नंबर 6 / नंबर 6 |
नंबर 7 / नंबर 7 |
नंबर 8 / नंबर 8 |
नंबर 9 / नंबर 9 |
नंबर 10 / नंबर 10 |
नंबर 11 / नंबर 11 |
नंबर 12 / नंबर 12 |
नंबर 13 / नंबर 13 |
नंबर 14 / नंबर 14 |
नंबर 15 / नंबर 15 |
नंबर 16 / नंबर 16 |
नंबर 17 / नंबर 17 |
नंबर 18 / नंबर 18 |
नंबर 19 / नंबर 19 |
नंबर 20 / नंबर 20 |
नंबर 21 / नंबर 21 |
नंबर 22 / नंबर 22 |
नंबर 23 / नंबर 23 |
नंबर 24 / नंबर 24 |
नंबर 25 / नंबर 25 |
नंबर 26 / नंबर 26 |
नंबर 27 / नंबर 27 |
नंबर 28 / नंबर 28 |
नंबर 29 / नंबर 29 |
नंबर 30 / नंबर 30 |
नंबर 31 / नंबर 31 |
नंबर 32 / नंबर 32 |
नंबर 33 / नंबर 33 |
नंबर 34 / नंबर 34 |
नंबर 35 / नंबर 35 |
नंबर 36 / नंबर 36 |