१ |
तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. |
२ |
सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. |
३ |
तलवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हांला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?” |
४ |
ते आपसात म्हणाले, “आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊ या.” |
५ |
तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले, |
६ |
आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडले; |
७ |
आणि ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. |
८ |
परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल. |
९ |
तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका; आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीती बाळगू नका.” |
१० |
पण सर्व मंडळी म्हणू लागली की, “ह्यांना दगडमार करा.” तेव्हा दर्शनमंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीस पडले. |
११ |
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत? |
१२ |
मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.” |
१३ |
मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस. |
१४ |
आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस. |
१५ |
आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील, |
१६ |
‘जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यायला तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले.’ |
१७ |
म्हणून मी विनवतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे; तू म्हटलेच आहेस की, |
१८ |
‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’ |
१९ |
तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केलीस तशी ह्या वेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवतो.” |
२० |
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. |
२१ |
वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे; |
२२ |
आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही; |
२३ |
म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत. |
२४ |
तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. |
२५ |
अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.” |
२६ |
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, |
२७ |
“ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे; |
२८ |
म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो: ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन; |
२९ |
तुमची प्रेते ह्या रानात पडतील, आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्यांहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यांपैकी कोणीही |
३० |
ज्या देशात तुम्हांला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील. |
३१ |
ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील; |
३२ |
पण तुमची स्वत:ची प्रेते ह्या रानात पडतील. |
३३ |
तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्या मेंढपाळासारखी होतील. |
३४ |
देश हेरायला जे चाळीस दिवस लागले त्यांतील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल.’ |
३५ |
मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्याविरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करीन; त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल; ते तेथे मरून जातील.” |
३६ |
नंतर मोशेने देश हेरायला पाठवलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करायला चिथावले होते, |
३७ |
ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. |
३८ |
तथापि देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले. |
३९ |
मोशेने हे शब्द इस्राएल लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी फार विलाप केला. |
४० |
मग ते पहाटेस उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, “आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या ठिकाणी आम्ही जाऊ.” |
४१ |
तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ह्यात तुम्हांला यश यायचे नाही. |
४२ |
चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही; कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल. |
४३ |
पाहा, तुमच्यापुढे अमालेकी व कनानी लोक आहेत म्हणून तुम्ही तलवारीने पडाल; तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात म्हणून परमेश्वर तुमच्याबरोबर असणार नाही.” |
४४ |
पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले; परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हलले नाहीत. |
४५ |
तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लावले.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंबर १४:1 |
नंबर १४:2 |
नंबर १४:3 |
नंबर १४:4 |
नंबर १४:5 |
नंबर १४:6 |
नंबर १४:7 |
नंबर १४:8 |
नंबर १४:9 |
नंबर १४:10 |
नंबर १४:11 |
नंबर १४:12 |
नंबर १४:13 |
नंबर १४:14 |
नंबर १४:15 |
नंबर १४:16 |
नंबर १४:17 |
नंबर १४:18 |
नंबर १४:19 |
नंबर १४:20 |
नंबर १४:21 |
नंबर १४:22 |
नंबर १४:23 |
नंबर १४:24 |
नंबर १४:25 |
नंबर १४:26 |
नंबर १४:27 |
नंबर १४:28 |
नंबर १४:29 |
नंबर १४:30 |
नंबर १४:31 |
नंबर १४:32 |
नंबर १४:33 |
नंबर १४:34 |
नंबर १४:35 |
नंबर १४:36 |
नंबर १४:37 |
नंबर १४:38 |
नंबर १४:39 |
नंबर १४:40 |
नंबर १४:41 |
नंबर १४:42 |
नंबर १४:43 |
नंबर १४:44 |
नंबर १४:45 |
|
|
|
|
|
|
नंबर 1 / नंबर 1 |
नंबर 2 / नंबर 2 |
नंबर 3 / नंबर 3 |
नंबर 4 / नंबर 4 |
नंबर 5 / नंबर 5 |
नंबर 6 / नंबर 6 |
नंबर 7 / नंबर 7 |
नंबर 8 / नंबर 8 |
नंबर 9 / नंबर 9 |
नंबर 10 / नंबर 10 |
नंबर 11 / नंबर 11 |
नंबर 12 / नंबर 12 |
नंबर 13 / नंबर 13 |
नंबर 14 / नंबर 14 |
नंबर 15 / नंबर 15 |
नंबर 16 / नंबर 16 |
नंबर 17 / नंबर 17 |
नंबर 18 / नंबर 18 |
नंबर 19 / नंबर 19 |
नंबर 20 / नंबर 20 |
नंबर 21 / नंबर 21 |
नंबर 22 / नंबर 22 |
नंबर 23 / नंबर 23 |
नंबर 24 / नंबर 24 |
नंबर 25 / नंबर 25 |
नंबर 26 / नंबर 26 |
नंबर 27 / नंबर 27 |
नंबर 28 / नंबर 28 |
नंबर 29 / नंबर 29 |
नंबर 30 / नंबर 30 |
नंबर 31 / नंबर 31 |
नंबर 32 / नंबर 32 |
नंबर 33 / नंबर 33 |
नंबर 34 / नंबर 34 |
नंबर 35 / नंबर 35 |
नंबर 36 / नंबर 36 |