A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

लेवीय ४मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले,
म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोर्‍हा परमेश्वराला अर्पावा.
तो गोर्‍हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
अभिषिक्त याजकाने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
आणि याजकाने त्यातले थोडे रक्त घेऊन दर्शनमंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना लावावे; मग त्या गोर्‍ह्याचे बाकीचे सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
नंतर पापार्पणाच्या गोर्‍ह्याची सर्व चरबी काढावी म्हणजे आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी,
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
१०
शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात, तसे ते वेगळे काढून घ्यावेत व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
११
गोर्‍ह्याचे कातडे, सर्व मांस, डोके, पाय, आतडी, शेण,
१२
असा सगळा गोर्‍हा त्याने छावणीबाहेर जेथे राख टाकतात तेथे एका स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडांवर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा.
१३
इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले,
१४
आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोर्‍ह्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शनमंडपासमोर आणावा.
१५
मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.
१६
अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे थोडे रक्त घ्यावे व दर्शनमंडपात न्यावे.
१७
याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर, ते सात वेळा शिंपडावे.
१८
मग दर्शनमंडपात परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे; आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
१९
त्या गोर्‍ह्याची सर्व चरबी काढून वेदीवर तिचा होम करावा.
२०
पापार्पणाच्या गोर्‍ह्याचे जसे करायचे तसेच ह्याचेही करावे; ह्या प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल.
२१
पहिला गोर्‍हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्‍हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय.
२२
आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला,
२३
आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा;
२४
त्याने त्या बकर्‍याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
२५
मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
२६
शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
२७
परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला,
२८
आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी.
२९
त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा.
३०
मग याजकाने त्याचे थोडे रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सर्व रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
३१
आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
३२
त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी.
३३
त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा.
३४
याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
३५
आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.लेवीय ४:1
लेवीय ४:2
लेवीय ४:3
लेवीय ४:4
लेवीय ४:5
लेवीय ४:6
लेवीय ४:7
लेवीय ४:8
लेवीय ४:9
लेवीय ४:10
लेवीय ४:11
लेवीय ४:12
लेवीय ४:13
लेवीय ४:14
लेवीय ४:15
लेवीय ४:16
लेवीय ४:17
लेवीय ४:18
लेवीय ४:19
लेवीय ४:20
लेवीय ४:21
लेवीय ४:22
लेवीय ४:23
लेवीय ४:24
लेवीय ४:25
लेवीय ४:26
लेवीय ४:27
लेवीय ४:28
लेवीय ४:29
लेवीय ४:30
लेवीय ४:31
लेवीय ४:32
लेवीय ४:33
लेवीय ४:34
लेवीय ४:35


लेवीय 1 / Лев 1
लेवीय 2 / Лев 2
लेवीय 3 / Лев 3
लेवीय 4 / Лев 4
लेवीय 5 / Лев 5
लेवीय 6 / Лев 6
लेवीय 7 / Лев 7
लेवीय 8 / Лев 8
लेवीय 9 / Лев 9
लेवीय 10 / Лев 10
लेवीय 11 / Лев 11
लेवीय 12 / Лев 12
लेवीय 13 / Лев 13
लेवीय 14 / Лев 14
लेवीय 15 / Лев 15
लेवीय 16 / Лев 16
लेवीय 17 / Лев 17
लेवीय 18 / Лев 18
लेवीय 19 / Лев 19
लेवीय 20 / Лев 20
लेवीय 21 / Лев 21
लेवीय 22 / Лев 22
लेवीय 23 / Лев 23
लेवीय 24 / Лев 24
लेवीय 25 / Лев 25
लेवीय 26 / Лев 26
लेवीय 27 / Лев 27