१ |
कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा. |
२ |
मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. |
३ |
अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय. |
४ |
भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे. |
५ |
तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे. |
६ |
त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय. |
७ |
कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. |
८ |
अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे; ते याजकाकडे आणून द्यावे, व त्याने ते वेदीजवळ न्यावे. |
९ |
याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. |
१० |
अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय. |
११ |
परमेश्वराला अर्पण केलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर नसावे; कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पायचे नाहीत. |
१२ |
प्रथमउत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. |
१३ |
तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नकोस; तुझ्या सर्व अर्पणांसह मीठसुद्धा अर्पावे. |
१४ |
परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथमउपज अर्पायचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसांतले दाणे, म्हणजे हिरव्या कणसांचे चोळून काढलेले दाणे प्रथमउपजाचे अन्नार्पण म्हणून आण. |
१५ |
त्यावर तेल ओत व धूप ठेव; हे अन्नार्पण होय. |
१६ |
चोळून काढलेले दाणे व तेल ह्यांपैकी काही भाग स्मारकभाग म्हणून सर्व धूपासहित याजकाने जाळावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होय.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लेवीय २:1 |
लेवीय २:2 |
लेवीय २:3 |
लेवीय २:4 |
लेवीय २:5 |
लेवीय २:6 |
लेवीय २:7 |
लेवीय २:8 |
लेवीय २:9 |
लेवीय २:10 |
लेवीय २:11 |
लेवीय २:12 |
लेवीय २:13 |
लेवीय २:14 |
लेवीय २:15 |
लेवीय २:16 |
|
|
|
|
|
|
लेवीय 1 / लेवीय 1 |
लेवीय 2 / लेवीय 2 |
लेवीय 3 / लेवीय 3 |
लेवीय 4 / लेवीय 4 |
लेवीय 5 / लेवीय 5 |
लेवीय 6 / लेवीय 6 |
लेवीय 7 / लेवीय 7 |
लेवीय 8 / लेवीय 8 |
लेवीय 9 / लेवीय 9 |
लेवीय 10 / लेवीय 10 |
लेवीय 11 / लेवीय 11 |
लेवीय 12 / लेवीय 12 |
लेवीय 13 / लेवीय 13 |
लेवीय 14 / लेवीय 14 |
लेवीय 15 / लेवीय 15 |
लेवीय 16 / लेवीय 16 |
लेवीय 17 / लेवीय 17 |
लेवीय 18 / लेवीय 18 |
लेवीय 19 / लेवीय 19 |
लेवीय 20 / लेवीय 20 |
लेवीय 21 / लेवीय 21 |
लेवीय 22 / लेवीय 22 |
लेवीय 23 / लेवीय 23 |
लेवीय 24 / लेवीय 24 |
लेवीय 25 / लेवीय 25 |
लेवीय 26 / लेवीय 26 |
लेवीय 27 / लेवीय 27 |