A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

लेवीय १८1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“इस्राएल लोकांना सांग की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
3
तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका; तसेच ज्या कनान देशात मी तुम्हांला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका.
4
माझ्याच नियमांप्रमाणे चाला, आणि माझेच विधी पाळा म्हणजे त्याप्रमाणे वागा; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
5
म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावेत; ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील; मी परमेश्वर आहे.
6
तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करण्यास जवळ जाऊ नये; मी परमेश्वर आहे.
7
तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नकोस. ती तुझी आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नकोस.
8
आपल्या सावत्र आईची कायाही उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाचीच काया होय.
9
आपली बहीण, मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नकोस.
10
आपली नात, मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, तिची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझीच काया होय.
11
तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे म्हणून तिची काया उघडी करू नकोस.
12
आपल्या आत्याची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय.
13
आपल्या मावशीची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची आप्त होय.
14
आपल्या चुलत्याची काया उघडी करू नकोस, म्हणजे त्याच्या बायकोशी गमन करू नकोस, ती तुझी चुलती होय.
15
आपल्या सुनेची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या मुलाची बायको होय; तिची काया उघडी करू नकोस.
16
आपल्या भावजयीची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या भावाचीच काया होय.
17
एखाद्या स्त्रीची आणि तिच्या मुलीची अशा दोघींचीही काया उघडी करू नकोस, तिची नात, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो अथवा मुलीची मुलगी असो, तिला आपली बायको करून घेऊन तिची काया उघडी करू नकोस; त्या जवळच्या आप्त होत; असे करणे अतिदुष्टपणा होय.
18
तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नकोस, ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नकोस,
19
स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नकोस.
20
तू आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नकोस.
21
आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नकोस, ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नकोस, मी परमेश्वर आहे.
22
स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नकोस, हे अमंगळ कृत्य होय.
23
कोणत्याही पशूशी गमन करून त्याच्यासह अशुद्ध होऊ नकोस; स्त्रीने पशूशी गमन करण्यास त्याच्यापाशी जाऊ नये, हे विपरीत कृत्य होय.
24
असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरून घालवणार आहे, ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत.
25
त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे.1
26
ह्याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत. स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यांच्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत;
27
कारण तुमच्यापूर्वी ह्या देशात राहणार्‍या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्ये केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे.
28
तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3
29
जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
30
ही जी आज्ञा मी तुम्हांला केली आहे, ती तुम्ही पाळावी; तुमच्यापूर्वी प्रचलित असलेल्या अमंगळ चालीरीतींप्रमाणे तुम्ही चालू नये व त्यांच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”लेवीय १८:1
लेवीय १८:2
लेवीय १८:3
लेवीय १८:4
लेवीय १८:5
लेवीय १८:6
लेवीय १८:7
लेवीय १८:8
लेवीय १८:9
लेवीय १८:10
लेवीय १८:11
लेवीय १८:12
लेवीय १८:13
लेवीय १८:14
लेवीय १८:15
लेवीय १८:16
लेवीय १८:17
लेवीय १८:18
लेवीय १८:19
लेवीय १८:20
लेवीय १८:21
लेवीय १८:22
लेवीय १८:23
लेवीय १८:24
लेवीय १८:25
लेवीय १८:26
लेवीय १८:27
लेवीय १८:28
लेवीय १८:29
लेवीय १८:30


लेवीय 1 / Lev 1
लेवीय 2 / Lev 2
लेवीय 3 / Lev 3
लेवीय 4 / Lev 4
लेवीय 5 / Lev 5
लेवीय 6 / Lev 6
लेवीय 7 / Lev 7
लेवीय 8 / Lev 8
लेवीय 9 / Lev 9
लेवीय 10 / Lev 10
लेवीय 11 / Lev 11
लेवीय 12 / Lev 12
लेवीय 13 / Lev 13
लेवीय 14 / Lev 14
लेवीय 15 / Lev 15
लेवीय 16 / Lev 16
लेवीय 17 / Lev 17
लेवीय 18 / Lev 18
लेवीय 19 / Lev 19
लेवीय 20 / Lev 20
लेवीय 21 / Lev 21
लेवीय 22 / Lev 22
लेवीय 23 / Lev 23
लेवीय 24 / Lev 24
लेवीय 25 / Lev 25
लेवीय 26 / Lev 26
लेवीय 27 / Lev 27