A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

होशे १२एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.
परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.
गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली; तो आपल्या भरज्वानीत असता देवाबरोबर झगडला.
म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला, त्याने रडून देवाची करुणा भाकली. त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले, तेथे तो आमच्याबरोबर बोलला म
परमेश्वर, सेनाधीश देव परमेश्वर, हे नाम त्याचे स्मारक आहे:
“म्हणून तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय ह्यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”
कनानाच्या1 हाती खोटा ताजवा आहे; जुलूम करणे त्याला आवडते.
एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”
मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, उत्सवाच्या दिवसांप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत राहायला लावीन.
१०
मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.
११
गिलाद मूर्तिपूजक बनला आहे ना? तर तो शून्यवत होऊन जाईल; गिल्गालात त्यांनी बैल अर्पण केले; त्यांच्या वेद्या शेतांच्या तासांतील दगडांच्या राशींसारख्या आहेत.
१२
याकोब अरामाच्या रानात पळून गेला; इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली, बायकोसाठी मेंढरे राखली.
१३
एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले, दुसर्‍या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करवले.
१४
एफ्राइमाने क्रोध अत्यंत चेतवला आहे, त्याचा रक्तपातदोष त्याच्यावर तसाच राहील, आणि प्रभू त्याने केलेल्या अप्रतिष्ठेचे उसने फेडील.होशे १२:1

होशे १२:2

होशे १२:3

होशे १२:4

होशे १२:5

होशे १२:6

होशे १२:7

होशे १२:8

होशे १२:9

होशे १२:10

होशे १२:11

होशे १२:12

होशे १२:13

होशे १२:14होशे 1 / होशे 1

होशे 2 / होशे 2

होशे 3 / होशे 3

होशे 4 / होशे 4

होशे 5 / होशे 5

होशे 6 / होशे 6

होशे 7 / होशे 7

होशे 8 / होशे 8

होशे 9 / होशे 9

होशे 10 / होशे 10

होशे 11 / होशे 11

होशे 12 / होशे 12

होशे 13 / होशे 13

होशे 14 / होशे 14