१ |
आता वंशांची नावे ही: उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिष्काच्या सरहद्दीवरले हसर-एनान, ह्या पूर्व-पश्चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग. |
२ |
दानाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो आशेराचा विभाग. |
३ |
आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो नफतालीचा विभाग. |
४ |
नफतालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो मनश्शेचा विभाग. |
५ |
मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग. |
६ |
एफ्राइमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो रऊबेनाचा विभाग. |
७ |
रऊबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग. |
८ |
यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश पंचवीस हजार हात1 रुंद व इतर वंशांच्या विभागांइतका पूर्वपश्चिम लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल त्यामध्ये पवित्रस्थान असणार. |
९ |
परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा. |
१० |
हा समर्पित अंश याजकांचा; हा उत्तरेस पंचवीस हजार हात लांब, पश्चिमेस दहा हजार हात रुंद, पूर्वेस दहा हजार हात रुंद, व दक्षिणेस पंचवीस हजार हात लांब असावा; परमेश्वराचे पवित्रस्थान ह्यामध्ये असणार. |
११ |
याजकांपैकी जे सादोकवंशज पवित्र केले आहेत, ज्यांनी माझे नियम पाळले आहेत, व जे लेव्यांप्रमाणे इस्राएल वंशजांबरोबर बहकले नाहीत, |
१२ |
त्यांना देशातील समर्पित अंशातला एक अंश, म्हणजे अर्थात लेव्यांच्या विभागांतला एक परमपवित्र विभाग द्यावा; |
१३ |
आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी. |
१४ |
त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे. |
१५ |
त्या पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पाच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा; त्याच्यामध्ये नगर वसवावे. |
१६ |
त्याचे माप असे असावे: उत्तर बाजू साडेचार हजार हात, दक्षिण बाजू साडेचार हजार हात, पूर्व बाजू साडेचार हजार हात व पश्चिम बाजू साडेचार हजार हात. |
१७ |
नगराची बखळ उत्तरेस अडीचशे हात, दक्षिणेस अडीचशे हात, पूर्वेस अडीचशे हात, व पश्चिमेस अडीचशे हात असावी. |
१८ |
ह्या समर्पित प्रदेशाला लागून उरलेला जो प्रदेश त्याच्या उत्पन्नाने नगरातील कामधंदा करणार्यांचे पोषण व्हावे |
१९ |
इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी. |
२० |
सगळे समर्पित क्षेत्र पंचवीस हजार हात लांब व पंचवीस हजार हात रुंद असावे; ह्या पवित्र समर्पित अंशाचा चतुर्थांश नगराच्या वतनासाठी द्यावा. |
२१ |
तो समर्पित भाग व नगराचे वतन ह्यांच्या अलीकडे-पलीकडे उरलेला भाग अधिपतीचा असावा; वंशाना दिलेल्या भागांना लागून पंचवीस हजार हात समर्पित जागेच्या पूर्व सीमेवर, तसेच पंचवीस हजार हात जागेच्या पश्चिम सीमेवर असलेले भाग अधिपतीचे असावेत; समर्पित भाग व मंदिराचे पवित्रस्थान हे त्या दोहो भागांच्या मध्ये असावेत. |
२२ |
ह्या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्यामध्ये आहेत; हे अधिपतीचे वतन यहूदा प्रांत व बन्यामीन प्रांत ह्यांच्या दरम्यान आहे; हा भाग अधिपतीचा होय. |
२३ |
वरकड वंशांचा भाग पूर्वपश्चिम आहे; त्यांतला एक बन्यामिनाचा विभाग. |
२४ |
बन्यामिनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो शिमोनाचा विभाग. |
२५ |
शिमोनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो इस्साखाराचा विभाग. |
२६ |
इस्साखाराच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो जबुलूनाचा विभाग. |
२७ |
जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो गादाचा विभाग. |
२८ |
दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ-कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत. |
२९ |
ही भूमी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलच्या वंशांना वतनासाठी वाटून द्यावी; हे त्यांचे विभाग आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. |
३० |
उत्तर दिशेस नगराबाहेरील रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे. |
३१ |
नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात: उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस. |
३२ |
पूर्व दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथे तीन वेशी असाव्यात: योसेफ वेस, बन्यामीन वेस व दान वेस. |
३३ |
दक्षिण दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: शिमोन वेस, इस्साखार वेस व जबुलून वेस. |
३४ |
पश्चिम दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: गाद वेस, आशेर वेस व नफताली वेस. |
३५ |
ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
यहेज्केल ४८:1 |
यहेज्केल ४८:2 |
यहेज्केल ४८:3 |
यहेज्केल ४८:4 |
यहेज्केल ४८:5 |
यहेज्केल ४८:6 |
यहेज्केल ४८:7 |
यहेज्केल ४८:8 |
यहेज्केल ४८:9 |
यहेज्केल ४८:10 |
यहेज्केल ४८:11 |
यहेज्केल ४८:12 |
यहेज्केल ४८:13 |
यहेज्केल ४८:14 |
यहेज्केल ४८:15 |
यहेज्केल ४८:16 |
यहेज्केल ४८:17 |
यहेज्केल ४८:18 |
यहेज्केल ४८:19 |
यहेज्केल ४८:20 |
यहेज्केल ४८:21 |
यहेज्केल ४८:22 |
यहेज्केल ४८:23 |
यहेज्केल ४८:24 |
यहेज्केल ४८:25 |
यहेज्केल ४८:26 |
यहेज्केल ४८:27 |
यहेज्केल ४८:28 |
यहेज्केल ४८:29 |
यहेज्केल ४८:30 |
यहेज्केल ४८:31 |
यहेज्केल ४८:32 |
यहेज्केल ४८:33 |
यहेज्केल ४८:34 |
यहेज्केल ४८:35 |
|
|
|
|
|
|
यहेज्केल 1 / यहेज्के 1 |
यहेज्केल 2 / यहेज्के 2 |
यहेज्केल 3 / यहेज्के 3 |
यहेज्केल 4 / यहेज्के 4 |
यहेज्केल 5 / यहेज्के 5 |
यहेज्केल 6 / यहेज्के 6 |
यहेज्केल 7 / यहेज्के 7 |
यहेज्केल 8 / यहेज्के 8 |
यहेज्केल 9 / यहेज्के 9 |
यहेज्केल 10 / यहेज्के 10 |
यहेज्केल 11 / यहेज्के 11 |
यहेज्केल 12 / यहेज्के 12 |
यहेज्केल 13 / यहेज्के 13 |
यहेज्केल 14 / यहेज्के 14 |
यहेज्केल 15 / यहेज्के 15 |
यहेज्केल 16 / यहेज्के 16 |
यहेज्केल 17 / यहेज्के 17 |
यहेज्केल 18 / यहेज्के 18 |
यहेज्केल 19 / यहेज्के 19 |
यहेज्केल 20 / यहेज्के 20 |
यहेज्केल 21 / यहेज्के 21 |
यहेज्केल 22 / यहेज्के 22 |
यहेज्केल 23 / यहेज्के 23 |
यहेज्केल 24 / यहेज्के 24 |
यहेज्केल 25 / यहेज्के 25 |
यहेज्केल 26 / यहेज्के 26 |
यहेज्केल 27 / यहेज्के 27 |
यहेज्केल 28 / यहेज्के 28 |
यहेज्केल 29 / यहेज्के 29 |
यहेज्केल 30 / यहेज्के 30 |
यहेज्केल 31 / यहेज्के 31 |
यहेज्केल 32 / यहेज्के 32 |
यहेज्केल 33 / यहेज्के 33 |
यहेज्केल 34 / यहेज्के 34 |
यहेज्केल 35 / यहेज्के 35 |
यहेज्केल 36 / यहेज्के 36 |
यहेज्केल 37 / यहेज्के 37 |
यहेज्केल 38 / यहेज्के 38 |
यहेज्केल 39 / यहेज्के 39 |
यहेज्केल 40 / यहेज्के 40 |
यहेज्केल 41 / यहेज्के 41 |
यहेज्केल 42 / यहेज्के 42 |
यहेज्केल 43 / यहेज्के 43 |
यहेज्केल 44 / यहेज्के 44 |
यहेज्केल 45 / यहेज्के 45 |
यहेज्केल 46 / यहेज्के 46 |
यहेज्केल 47 / यहेज्के 47 |
यहेज्केल 48 / यहेज्के 48 |