A A A A A
मराठी बायबल 2015

यहेज्केल ४५तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतनासाठी देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश अर्पावा; जमिनीचा एक वाटा पवित्र म्हणून वेगळा काढून ठेवावा; त्याची लांबी पंचवीस हजार हात1 व रुंदी वीस हजार हात1 असावी; हे सारे क्षेत्र चोहोंकडून पवित्र ठेवावे.
ह्यापैकी पाचशे हात लांब व पाचशे हात रुंद एवढी समचौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नात हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती समचौरस असावी.
त्या मापलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद क्षेत्र मापून काढ; ह्या क्षेत्रात पवित्रस्थान होणार; ते परमपवित्र होय.
हे क्षेत्र पवित्र राहावे; सेवा करण्यास परमेश्वरासमीप जाणार्‍या पवित्रस्थानाच्या सेवकांसाठी म्हणजे याजकांसाठी ते असावे; त्यात त्यांच्या घरांसाठी जागा व पवित्रस्थानासाठी पवित्र जागा असावी.
पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात1 रुंद एवढी जागा मंदिराची सेवाचाकरी करणार्‍या लेव्यांची व्हावी; वसतिस्थानासाठी हे त्यांचे वतन होय.
समर्पित अंश म्हणून जी जागा निराळी ठेवायची तिला लागून पाच हजार हात रुंद व पंचवीस हजार हात लांब एवढी जमीन नगरासाठी वतन म्हणून द्यावी; ही सगळ्या इस्राएल घराण्याची व्हावी.
समर्पित अंश म्हणून ठेवलेला भाग व नगरास दिलेला भाग ह्यांना लागून दोहों बाजूंकडील म्हणजे पश्‍चिमेकडील व पूर्वेकडील जागा अधिपतीस द्यावी; पश्‍चिम सीमेपासून पूर्व सीमेपर्यंत तिची लांबी इस्राएली वंशांना वाटून दिलेल्या भागाच्या लांबीइतकी असावी.
ही जमीन इस्राएलात अधिपतींचे वतन व्हावी, म्हणजे ह्यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर इस्राएल घराण्यातील निरनिराळ्या वंशाना दिलेली जमीन ज्याची त्याच्याकडे राहू द्यावी.
प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम ह्यांपासून दूर राहा, न्याय व नीती ह्यांचे पालन करा, आणि माझ्या लोकांना त्यांच्या वतनांतून घालवून देण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
१०
खरी तागडी, खरी एफा2 व खरी बथ3 वापरा.
११
एफा व बथ ह्या दोन्ही एकाच परिमाणाच्या असाव्यात; बथ होमराचा1 दहावा भाग; तशीच एफाही होमराचा दहावा भाग; ह्या होमराच्या प्रमाणाने असाव्यात.
१२
शेकेल2 वीस गेरांचा2 असावा आणि माने2 वीस शेकेलांचा, पंचवीस शेकेलांचा किंवा पंधरा शेकेलांचा असावा.
१३
समर्पित अंश म्हणून अर्पायची तुमची अर्पणे येणेप्रमाणे असावीत: गव्हाच्या एका होमरामागे एक षष्ठांश एफा गहू आणि जवाच्या एका होमरामागे एक षष्ठांश जव द्यावे;
१४
तेलाचा नियमित अंश द्यायचा तो दहा बथांचा कोर1 म्हणजे एक होमर ह्यामागे एक दशांश बथ असावा; दहा बथांचा एक होमर होतो.
१५
इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणांतील कळपांतून दोनशे मेंढरांमागे एक कोकरू द्यावे; लोकांप्रीत्यर्थ प्रायश्‍चित्त करावे म्हणून अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही द्यावीत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
१६
इस्राएलाच्या अधिपतीला देशाच्या सर्व लोकांनी ही समर्पित अंशाची अर्पणे पुरवली पाहिजेत.
१७
उत्सव, चंद्रदर्शने, शब्बाथ व इस्राएल घराण्याचे सर्व सण ह्यांत होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण ह्यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे; इस्राएल घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणून त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावीत.
१८
प्रभू परमेश्वर म्हणतो, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस एक निर्दोष गोर्‍हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे.
१९
तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या बाह्यांवर वेदीच्या बैठकीच्या चार्‍ही कोपर्‍यांवर व आतील अंगणाच्या दरवाजाच्या बाह्यांवर शिंपडावे.
२०
तसेच त्या महिन्याच्या सप्तमीस भ्रांतीत पडलेल्या किंवा मूढ झालेल्या प्रत्येक माणसाप्रीत्यर्थ असेच करावे; ह्या प्रकारे तुम्ही मंदिरासाठी प्रायश्‍चित्त करावे.
२१
पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस तुम्ही वल्हांडण, म्हणजे पूर्ण एक सप्तकाचा सण पाळावा; ह्या सणात बेखमीर भाकर खावी.
२२
त्या दिवशी स्वतःसाठी व देशाच्या सर्व लोकांसाठी पापार्पण करावे म्हणून अधिपतीने एक गोर्‍हा सिद्ध करावा;
२३
परमेश्वराला होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात मेंढे सिद्ध करावेत आणि पापार्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा;
२४
आणि अन्नार्पण म्हणून दर गोर्‍ह्यामागे व दर मेंढ्यामागे एफाभर अन्न व दर एफाबरोबर एक हिनभर1 तेल अर्पावे.
२५
सातव्या महिन्याच्या पौर्णिमेपासून सणाचे सात दिवस पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही ह्याप्रमाणेच अर्पण करावीत.यहेज्केल ४५:1

यहेज्केल ४५:2

यहेज्केल ४५:3

यहेज्केल ४५:4

यहेज्केल ४५:5

यहेज्केल ४५:6

यहेज्केल ४५:7

यहेज्केल ४५:8

यहेज्केल ४५:9

यहेज्केल ४५:10

यहेज्केल ४५:11

यहेज्केल ४५:12

यहेज्केल ४५:13

यहेज्केल ४५:14

यहेज्केल ४५:15

यहेज्केल ४५:16

यहेज्केल ४५:17

यहेज्केल ४५:18

यहेज्केल ४५:19

यहेज्केल ४५:20

यहेज्केल ४५:21

यहेज्केल ४५:22

यहेज्केल ४५:23

यहेज्केल ४५:24

यहेज्केल ४५:25यहेज्केल 1 / यहेज्के 1

यहेज्केल 2 / यहेज्के 2

यहेज्केल 3 / यहेज्के 3

यहेज्केल 4 / यहेज्के 4

यहेज्केल 5 / यहेज्के 5

यहेज्केल 6 / यहेज्के 6

यहेज्केल 7 / यहेज्के 7

यहेज्केल 8 / यहेज्के 8

यहेज्केल 9 / यहेज्के 9

यहेज्केल 10 / यहेज्के 10

यहेज्केल 11 / यहेज्के 11

यहेज्केल 12 / यहेज्के 12

यहेज्केल 13 / यहेज्के 13

यहेज्केल 14 / यहेज्के 14

यहेज्केल 15 / यहेज्के 15

यहेज्केल 16 / यहेज्के 16

यहेज्केल 17 / यहेज्के 17

यहेज्केल 18 / यहेज्के 18

यहेज्केल 19 / यहेज्के 19

यहेज्केल 20 / यहेज्के 20

यहेज्केल 21 / यहेज्के 21

यहेज्केल 22 / यहेज्के 22

यहेज्केल 23 / यहेज्के 23

यहेज्केल 24 / यहेज्के 24

यहेज्केल 25 / यहेज्के 25

यहेज्केल 26 / यहेज्के 26

यहेज्केल 27 / यहेज्के 27

यहेज्केल 28 / यहेज्के 28

यहेज्केल 29 / यहेज्के 29

यहेज्केल 30 / यहेज्के 30

यहेज्केल 31 / यहेज्के 31

यहेज्केल 32 / यहेज्के 32

यहेज्केल 33 / यहेज्के 33

यहेज्केल 34 / यहेज्के 34

यहेज्केल 35 / यहेज्के 35

यहेज्केल 36 / यहेज्के 36

यहेज्केल 37 / यहेज्के 37

यहेज्केल 38 / यहेज्के 38

यहेज्केल 39 / यहेज्के 39

यहेज्केल 40 / यहेज्के 40

यहेज्केल 41 / यहेज्के 41

यहेज्केल 42 / यहेज्के 42

यहेज्केल 43 / यहेज्के 43

यहेज्केल 44 / यहेज्के 44

यहेज्केल 45 / यहेज्के 45

यहेज्केल 46 / यहेज्के 46

यहेज्केल 47 / यहेज्के 47

यहेज्केल 48 / यहेज्के 48