A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

यहेज्केल ३५परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे:
“मानवपुत्रा, सेईर डोंगराकडे आपले तोंड कर व त्याच्याविरुद्ध संदेश दे;
त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सेईर डोंगरा, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर चालवीन आणि तुला वैराण व उद्ध्वस्त करीन.
मी तुझी नगरे ओस करीन व तू उजाड होशील; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.
तू कायमचे वैर धरलेस आणि इस्राएल लोकांवर संकट आले तेव्हा, त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा, त्यांना तलवारीच्या धारेच्या हवाली केलेस;
म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुझ्या रक्तपाताची तयारी करीन व रक्तपात तुझा पिच्छा पुरवील; तू रक्तपाताविषयी नापसंती दाखवली नाहीस म्हणून रक्तपात तुझ्या पाठीस लागेल.
मी सेईर डोंगर उद्ध्वस्त व वैराण करीन; त्यात येणार्‍याजाणार्‍यांचा उच्छेद करीन.
त्याच्या वधलेल्या लोकांनी मी त्याचे डोंगर व्यापून टाकीन; तुझ्या टेकड्यांवर, तुझ्या खोर्‍यात व तुझ्या नाल्यांत तलवारीने वधलेले पडतील.
मी तुला कायमचे उद्ध्वस्त करीन, तुझी नगरे पुन्हा वसायची नाहीत; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
१०
‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,
११
म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू जो द्वेष दाखवलास, तू त्यांचा द्वेष करून जो हेवा प्रकट केलास, त्यानुसार मी तुझ्याबरोबर वागेन; मी न्याय करून तुला शासन करीन, तेव्हा मी त्यांना प्रकट होईन.
१२
तू इस्राएलाच्या पर्वतांविरुद्ध म्हणालास की, ‘ते उद्ध्वस्त झाले आहेत, ते आम्हांला भक्षण करण्यासाठी दिले आहेत,’ हे तुझे सर्व दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.
१३
ह्या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्याविरुद्ध आपली थोरवी मिरवलीत, माझ्याविरुद्ध हवे तितके बोललात; ते मी ऐकले आहे.
१४
म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, सर्व पृथ्वी आनंद करीत असता मी तुला उजाड करीन.
१५
इस्राएल घराण्याचे वतन उद्ध्वस्त झाले तेव्हा तुला हर्ष वाटला, म्हणून मी तुझेही तसेच करीन; हे सेईर डोंगरा, तू वैराण होशील, एकदम सारा अदोम ओसाड होईल; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.यहेज्केल ३५:1

यहेज्केल ३५:2

यहेज्केल ३५:3

यहेज्केल ३५:4

यहेज्केल ३५:5

यहेज्केल ३५:6

यहेज्केल ३५:7

यहेज्केल ३५:8

यहेज्केल ३५:9

यहेज्केल ३५:10

यहेज्केल ३५:11

यहेज्केल ३५:12

यहेज्केल ३५:13

यहेज्केल ३५:14

यहेज्केल ३५:15यहेज्केल 1 / यहेज्के 1

यहेज्केल 2 / यहेज्के 2

यहेज्केल 3 / यहेज्के 3

यहेज्केल 4 / यहेज्के 4

यहेज्केल 5 / यहेज्के 5

यहेज्केल 6 / यहेज्के 6

यहेज्केल 7 / यहेज्के 7

यहेज्केल 8 / यहेज्के 8

यहेज्केल 9 / यहेज्के 9

यहेज्केल 10 / यहेज्के 10

यहेज्केल 11 / यहेज्के 11

यहेज्केल 12 / यहेज्के 12

यहेज्केल 13 / यहेज्के 13

यहेज्केल 14 / यहेज्के 14

यहेज्केल 15 / यहेज्के 15

यहेज्केल 16 / यहेज्के 16

यहेज्केल 17 / यहेज्के 17

यहेज्केल 18 / यहेज्के 18

यहेज्केल 19 / यहेज्के 19

यहेज्केल 20 / यहेज्के 20

यहेज्केल 21 / यहेज्के 21

यहेज्केल 22 / यहेज्के 22

यहेज्केल 23 / यहेज्के 23

यहेज्केल 24 / यहेज्के 24

यहेज्केल 25 / यहेज्के 25

यहेज्केल 26 / यहेज्के 26

यहेज्केल 27 / यहेज्के 27

यहेज्केल 28 / यहेज्के 28

यहेज्केल 29 / यहेज्के 29

यहेज्केल 30 / यहेज्के 30

यहेज्केल 31 / यहेज्के 31

यहेज्केल 32 / यहेज्के 32

यहेज्केल 33 / यहेज्के 33

यहेज्केल 34 / यहेज्के 34

यहेज्केल 35 / यहेज्के 35

यहेज्केल 36 / यहेज्के 36

यहेज्केल 37 / यहेज्के 37

यहेज्केल 38 / यहेज्के 38

यहेज्केल 39 / यहेज्के 39

यहेज्केल 40 / यहेज्के 40

यहेज्केल 41 / यहेज्के 41

यहेज्केल 42 / यहेज्के 42

यहेज्केल 43 / यहेज्के 43

यहेज्केल 44 / यहेज्के 44

यहेज्केल 45 / यहेज्के 45

यहेज्केल 46 / यहेज्के 46

यहेज्केल 47 / यहेज्के 47

यहेज्केल 48 / यहेज्के 48