A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

यहेज्केल १२



परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.
ह्याकरता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर, व भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्यांच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसर्‍या ठिकाणी जा; न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल; ते तर बंडखोर घराण्यातले आहेत.
देशांतरास जाताना सामग्री बाहेर काढतात तसे तू भरदिवसा त्यांच्यादेखत आपले सामानसुमान बाहेर काढ, व देशांतरास निघतात तसा संध्याकाळी त्यांच्यादेखत निघून जा.
त्यांच्यादेखत तटास आरपार भोक पाड व त्यातून आपले सामानसुमान ने.
त्यांच्यादेखत ते खांद्यावर घे व अंधार पडला म्हणजे ते घेऊन जा; तू आपले मुख झाक म्हणजे भूमी तुला दिसायची नाही; कारण मी तुला इस्राएल घराण्यास चिन्हवत नेमले आहे.”
मला आज्ञा झाली तसे मी केले; देशांतरास लागणारी सामग्री नेतात तसे मी भरदिवसा आपले सामानसुमान बाहेर काढले व संध्याकाळी मी तटास आरपार भोक पाडले; अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले व त्यांच्यादेखत ते मी खांद्यावर घेतले.
सकाळी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
“मानवपुत्रा, ‘तू काय करतोस’ असे तुला त्या इस्राएल घराण्याने, त्या फितुरी घराण्याने म्हटले ना?
१०
त्यांना साग: ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की हे देववचन यरुशलेमेतील अधिपतीस व ज्या इस्राएल घराण्यातले ते आहेत त्या सर्व घराण्यास लागू आहे.’
११
असे म्हण की, ‘मी तुम्हांला चिन्हवत आहे; मी त्यांना करून दाखवले तसेच त्यांना घडेल; ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील.”’
१२
त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल, ते तट फोडून त्यातून ते नेतील; तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमी दिसायची नाही.
१३
मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.
१४
मी त्याच्याभोवतालचे त्याचे सर्व साहाय्यकर्ते व त्याची सर्व सेना ह्यांची दाही दिशांना दाणादाण करीन, व मी तलवार उपसून त्यांचा पिच्छा पुरवीन.
१५
मी त्यांना राष्ट्रांमध्ये परागंदा करीन, त्यांची देशोदेशी पांगापांग करीन, तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
१६
तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
१७
नंतर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
१८
“मानवपुत्रा, तू थरथर कापत अन्न खा; कंपायमान व चिंतातुर होऊन पाणी पी;
१९
आणि ह्या देशाच्या लोकांना सांग की, प्रभू परमेश्वर इस्राएल देशातल्या यरुशलेमनिवासीयांविषयी म्हणतो की, ते चिंतातुर होऊन अन्न खातील, भयचकित होऊन पाणी पितील; कारण त्या देशाच्या सर्व रहिवाशांच्या दुष्टतेमुळे त्या भूमीतले सर्वकाही नष्ट करून ती ओसाड करण्यात आली आहे.
२०
आबाद नगरे उजाड होतील, भूमी ओसाड होईल, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”
२१
मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
२२
“मानवपुत्रा, ‘दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे,’ ही जी म्हण इस्राएल देशात तुमच्या तोंडी पडली आहे तिचा अर्थ काय?
२३
तर त्यांना सांग: ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, मी ह्या म्हणीचा प्रचार बंद करीन व ती ते इस्राएलात पुन्हा उच्चारणार नाहीत.’ त्यांना सांग की दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टान्त प्रत्ययास येण्याचा समय जवळ आला आहे.
२४
इस्राएल घराण्यात ह्यापुढे निरर्थक दृष्टान्त व खूश करणारा शकुन सांगणार नाहीत.
२५
कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”
२६
परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,
२७
“मानवपुत्रा, पाहा, इस्राएल घराणे म्हणत आहे की, ‘त्याने जो दृष्टान्त पाहिला त्याला पुष्कळ अवधी आहे; तो दूरच्या काळाविषयी संदेश देत आहे.’
२८
ह्याकरता त्यांना सांग: प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही; मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”











यहेज्केल १२:1

यहेज्केल १२:2

यहेज्केल १२:3

यहेज्केल १२:4

यहेज्केल १२:5

यहेज्केल १२:6

यहेज्केल १२:7

यहेज्केल १२:8

यहेज्केल १२:9

यहेज्केल १२:10

यहेज्केल १२:11

यहेज्केल १२:12

यहेज्केल १२:13

यहेज्केल १२:14

यहेज्केल १२:15

यहेज्केल १२:16

यहेज्केल १२:17

यहेज्केल १२:18

यहेज्केल १२:19

यहेज्केल १२:20

यहेज्केल १२:21

यहेज्केल १२:22

यहेज्केल १२:23

यहेज्केल १२:24

यहेज्केल १२:25

यहेज्केल १२:26

यहेज्केल १२:27

यहेज्केल १२:28







यहेज्केल 1 / यहेज्के 1

यहेज्केल 2 / यहेज्के 2

यहेज्केल 3 / यहेज्के 3

यहेज्केल 4 / यहेज्के 4

यहेज्केल 5 / यहेज्के 5

यहेज्केल 6 / यहेज्के 6

यहेज्केल 7 / यहेज्के 7

यहेज्केल 8 / यहेज्के 8

यहेज्केल 9 / यहेज्के 9

यहेज्केल 10 / यहेज्के 10

यहेज्केल 11 / यहेज्के 11

यहेज्केल 12 / यहेज्के 12

यहेज्केल 13 / यहेज्के 13

यहेज्केल 14 / यहेज्के 14

यहेज्केल 15 / यहेज्के 15

यहेज्केल 16 / यहेज्के 16

यहेज्केल 17 / यहेज्के 17

यहेज्केल 18 / यहेज्के 18

यहेज्केल 19 / यहेज्के 19

यहेज्केल 20 / यहेज्के 20

यहेज्केल 21 / यहेज्के 21

यहेज्केल 22 / यहेज्के 22

यहेज्केल 23 / यहेज्के 23

यहेज्केल 24 / यहेज्के 24

यहेज्केल 25 / यहेज्के 25

यहेज्केल 26 / यहेज्के 26

यहेज्केल 27 / यहेज्के 27

यहेज्केल 28 / यहेज्के 28

यहेज्केल 29 / यहेज्के 29

यहेज्केल 30 / यहेज्के 30

यहेज्केल 31 / यहेज्के 31

यहेज्केल 32 / यहेज्के 32

यहेज्केल 33 / यहेज्के 33

यहेज्केल 34 / यहेज्के 34

यहेज्केल 35 / यहेज्के 35

यहेज्केल 36 / यहेज्के 36

यहेज्केल 37 / यहेज्के 37

यहेज्केल 38 / यहेज्के 38

यहेज्केल 39 / यहेज्के 39

यहेज्केल 40 / यहेज्के 40

यहेज्केल 41 / यहेज्के 41

यहेज्केल 42 / यहेज्के 42

यहेज्केल 43 / यहेज्के 43

यहेज्केल 44 / यहेज्के 44

यहेज्केल 45 / यहेज्के 45

यहेज्केल 46 / यहेज्के 46

यहेज्केल 47 / यहेज्के 47

यहेज्केल 48 / यहेज्के 48