A A A A A
मराठी बायबल 2015

यिर्मया ४४

जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे:
“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मी यरुशलेमेवर व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट आणले ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे; पाहा, आज ती उजाड व निर्जन झाली आहेत;
त्यांनी जाऊन धूप जाळला व त्यांना, तुम्हांला व तुमच्या वडिलांनाही अज्ञात असलेल्या अशा अन्य देवांची सेवा त्यांनी केली; असा दुष्टपणा करून त्यांनी मला चिडवले म्हणून असे झाले.
मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.
तरीपण अन्य देवांना धूप जाळण्याचे सोडून देऊन आपल्या दुष्टतेपासून वळण्याचे ते ऐकेनात व आपला कान देईनात.
ह्यामुळे माझा संताप व क्रोध ह्यांचा वर्षाव झाला, तो यहूदाची नगरे व यरुशलेमेच्या आळ्या ह्यांत पेटला; ती ओसाड व वैराण झाली आहेत हे आज दिसत आहे.
ह्यास्तव आता सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो: तुम्ही आपल्या हातच्या कर्मांनी मला चिडवावे आणि यहूदातले तुमचे पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही ह्यांचा उच्छेद होऊन तुमच्यातला कोणी शिल्लक राहू नये, असे आपल्या जिवावर का अरिष्ट आणता?
कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.
यहूदा देशात व यरुशलेमेच्या आळ्याआळ्यांतून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहूदाचे राजे व त्यांच्या स्त्रिया ह्यांची दुष्कृत्ये, तुमची स्वतःची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये, ह्यांचा तुम्हांला विसर पडला काय?
१०
ते अजून नम्र झाले नाहीत, त्यांना भीती वाटत नाही, व तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी लावून दिलेले आपले नियमशास्त्र व आपले विधी ह्याप्रमाणे ते चालत नाहीत.
११
“ह्यामुळे सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमचे अनिष्ट करण्यासाठी व सर्व यहूदाचा उच्छेद करण्यासाठी मी तुम्हांला विन्मुख होईन.
१२
मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा यहूदाच्या अवशिष्ट लोकांनी निश्‍चय केला त्या सर्वांवर माझा हात पडून त्यांचा नायनाट होईल; मिसर देशात ते पडतील; तलवारीने व दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल; लहानथोर तलवारीने व दुष्काळाने मृत्यू पावतील; ते निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय होतील.
१३
मी यरुशलेमेस शिक्षा केली तशी मिसर देशात जाऊन राहिलेल्यांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी शिक्षा करीन.
१४
यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”
१५
तेव्हा आपल्या स्त्रिया अन्य देवांना धूप जाळतात हे ज्या पुरुषांना ठाऊक होते त्यांनी आणि तेथे उभ्या असलेल्या सर्व स्त्रियांचा मोठा समुदाय व मिसर देशातील पथ्रोसात राहिलेले सर्व लोक ह्यांनी यिर्मयाला प्रत्युत्तर केले की:
१६
“तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही.
१७
आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.
१८
पण आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले तेव्हापासून आम्हांला सर्व गोष्टींची वाण पडली, आणि तलवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चालला आहे.”
१९
स्त्रिया म्हणाल्या, “आम्ही स्त्रिया आकाशराणीस धूप जाळत होतो व तिला पेयार्पणे करीत होतो, तेव्हा तिच्या प्रतिमेच्या पोळ्या1 करून तिला पेयार्पणे करीत होतो, ते आमच्या नवर्‍यांच्या संमतीवाचून करीत होतो काय?”
२०
मग ज्या पुरुषांनी, स्त्रियांनी व लोकांनी यिर्मयाला हे उत्तर दिले त्या सर्वांना तो म्हणाला,
२१
“तुम्ही व तुमचे पूर्वज, तुमचे राजे व तुमचे सरदार आणि देशातील लोक ह्या सर्वांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत धूप जाळला त्याचे परमेश्वराला स्मरण नाही का झाले? त्याच्या लक्षात ते नाही का आले?
२२
तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.
२३
तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे नियमशास्त्र, त्याचे विधी व त्याचे निर्बंध ह्यांनी तुम्ही चालला नाहीत; म्हणून तुमच्यावर हे अरिष्ट आले आहे हे आज दिसतच आहे.”
२४
यिर्मया त्या सर्व लोकांना व सर्व स्त्रियांना म्हणाला, “यहूदातले जे तुम्ही सगळे लोक मिसर देशात आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.
२५
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी आपल्या तोंडांनी ते बोलून हातांनी सिद्धीसही नेले आहे. तुम्ही म्हणालात, ‘आकाशराणीस धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे अर्पण करण्याचे आम्ही केलेले नवस फेडूच,’ तर तुम्ही आपले नवस कराच व फेडाही.
२६
तरीपण यहूदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका: परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की अखिल मिसर देशात, ‘परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणायला माझे नाम यहूदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही.
२७
पाहा, त्यांचे अभीष्ट नव्हे तर अनिष्ट व्हावे म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवीन; आणि मिसर देशात असलेल्या यहूदातल्या सर्व लोकांचा अंत होईपर्यंत ते दुष्काळाने व तलवारीने क्षय पावतील.
२८
तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.
२९
परमेश्वर म्हणतो, माझी वचने तुमच्या अनिष्टांची ठरतील हे तुम्हांला कळून यावे म्हणून मी ह्या ठिकाणी तुम्हांला शिक्षा करीन, हेच तुम्हांला चिन्ह होय.
३०
परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा वैरी जो बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर तो त्याचा घात करण्यास पाहत होता, त्याच्या हाती मी त्याला दिले त्याप्रमाणे मिसरी राजा, फारो हफ्रा ह्याला मी त्याच्या वैर्‍यांच्या व त्याचा घात करू पाहणार्‍यांच्या हाती देईन.”
यिर्मया ४४:1
यिर्मया ४४:2
यिर्मया ४४:3
यिर्मया ४४:4
यिर्मया ४४:5
यिर्मया ४४:6
यिर्मया ४४:7
यिर्मया ४४:8
यिर्मया ४४:9
यिर्मया ४४:10
यिर्मया ४४:11
यिर्मया ४४:12
यिर्मया ४४:13
यिर्मया ४४:14
यिर्मया ४४:15
यिर्मया ४४:16
यिर्मया ४४:17
यिर्मया ४४:18
यिर्मया ४४:19
यिर्मया ४४:20
यिर्मया ४४:21
यिर्मया ४४:22
यिर्मया ४४:23
यिर्मया ४४:24
यिर्मया ४४:25
यिर्मया ४४:26
यिर्मया ४४:27
यिर्मया ४४:28
यिर्मया ४४:29
यिर्मया ४४:30
यिर्मया 1 / यिर्मया 1
यिर्मया 2 / यिर्मया 2
यिर्मया 3 / यिर्मया 3
यिर्मया 4 / यिर्मया 4
यिर्मया 5 / यिर्मया 5
यिर्मया 6 / यिर्मया 6
यिर्मया 7 / यिर्मया 7
यिर्मया 8 / यिर्मया 8
यिर्मया 9 / यिर्मया 9
यिर्मया 10 / यिर्मया 10
यिर्मया 11 / यिर्मया 11
यिर्मया 12 / यिर्मया 12
यिर्मया 13 / यिर्मया 13
यिर्मया 14 / यिर्मया 14
यिर्मया 15 / यिर्मया 15
यिर्मया 16 / यिर्मया 16
यिर्मया 17 / यिर्मया 17
यिर्मया 18 / यिर्मया 18
यिर्मया 19 / यिर्मया 19
यिर्मया 20 / यिर्मया 20
यिर्मया 21 / यिर्मया 21
यिर्मया 22 / यिर्मया 22
यिर्मया 23 / यिर्मया 23
यिर्मया 24 / यिर्मया 24
यिर्मया 25 / यिर्मया 25
यिर्मया 26 / यिर्मया 26
यिर्मया 27 / यिर्मया 27
यिर्मया 28 / यिर्मया 28
यिर्मया 29 / यिर्मया 29
यिर्मया 30 / यिर्मया 30
यिर्मया 31 / यिर्मया 31
यिर्मया 32 / यिर्मया 32
यिर्मया 33 / यिर्मया 33
यिर्मया 34 / यिर्मया 34
यिर्मया 35 / यिर्मया 35
यिर्मया 36 / यिर्मया 36
यिर्मया 37 / यिर्मया 37
यिर्मया 38 / यिर्मया 38
यिर्मया 39 / यिर्मया 39
यिर्मया 40 / यिर्मया 40
यिर्मया 41 / यिर्मया 41
यिर्मया 42 / यिर्मया 42
यिर्मया 43 / यिर्मया 43
यिर्मया 44 / यिर्मया 44
यिर्मया 45 / यिर्मया 45
यिर्मया 46 / यिर्मया 46
यिर्मया 47 / यिर्मया 47
यिर्मया 48 / यिर्मया 48
यिर्मया 49 / यिर्मया 49
यिर्मया 50 / यिर्मया 50
यिर्मया 51 / यिर्मया 51
यिर्मया 52 / यिर्मया 52