A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

यिर्मया १९परमेश्वर म्हणाला, “जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन,
जेथे खापर्‍या टाकतात त्या वेशीसमोरच्या बेन-हिन्नोम खोर्‍यात जा, तेथे मी तुला सांगेन ती वचने जाहीर कर.
असे म्हण, ‘अहो यहूदाच्या राजांनो, व अहो यरुशलेम-निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका; सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, ह्या स्थळावर मी अरिष्ट आणतो, त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील.
त्यांनी माझा त्याग केला आहे, हे स्थान त्यांनी परक्यांचे असे मानले आहे; त्यांचे पूर्वज व यहूदाचे राजे ह्यांना जे माहीत नव्हते अशा अन्य देवांपुढे त्यांनी धूप जाळला; निर्दोष्यांच्या रक्ताने ते स्थान भरले;
आणि बआलदैवताप्रीत्यर्थ आपले पुत्र होमार्पण म्हणून अग्नीत होम करण्यासाठी त्यांनी उच्च स्थाने बांधली; अशी आज्ञा मी केली नव्हती, हे मी सांगितले नव्हते, हे माझ्या मनातही आले नव्हते.
परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या कारणास्तव ह्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत.
ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.
मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.
मी त्यांना त्यांच्या पुत्रांचे मांस व त्यांच्या कन्यांचे मांस खायला लावीन; त्यांचे शत्रू व त्यांचा जीव घेण्यास टपणारे त्यांना वेढा घालतील व पेचात आणतील, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या शेजार्‍याचे मांस खाईल.’
१०
मग जी माणसे तुझ्याबरोबर असतील त्यांच्या डोळ्यांदेखत ते मातीचे मडके फोड;
११
आणि त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व ह्या नगराचा भंग करीन व पुरण्यास जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील.
१२
परमेश्वर म्हणतो, हे नगर तोफेतासारखे करावे म्हणून मी हे स्थळ व त्यातील रहिवासी ह्यांचे असे करीन.
१३
ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’
१४
मग परमेश्वराने यिर्मयाला तोफेत येथे जाऊन संदेश देण्यास पाठवले; तेथून तो आला व परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांना म्हणाला,
१५
“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”यिर्मया १९:1

यिर्मया १९:2

यिर्मया १९:3

यिर्मया १९:4

यिर्मया १९:5

यिर्मया १९:6

यिर्मया १९:7

यिर्मया १९:8

यिर्मया १९:9

यिर्मया १९:10

यिर्मया १९:11

यिर्मया १९:12

यिर्मया १९:13

यिर्मया १९:14

यिर्मया १९:15यिर्मया 1 / यिर्मया 1

यिर्मया 2 / यिर्मया 2

यिर्मया 3 / यिर्मया 3

यिर्मया 4 / यिर्मया 4

यिर्मया 5 / यिर्मया 5

यिर्मया 6 / यिर्मया 6

यिर्मया 7 / यिर्मया 7

यिर्मया 8 / यिर्मया 8

यिर्मया 9 / यिर्मया 9

यिर्मया 10 / यिर्मया 10

यिर्मया 11 / यिर्मया 11

यिर्मया 12 / यिर्मया 12

यिर्मया 13 / यिर्मया 13

यिर्मया 14 / यिर्मया 14

यिर्मया 15 / यिर्मया 15

यिर्मया 16 / यिर्मया 16

यिर्मया 17 / यिर्मया 17

यिर्मया 18 / यिर्मया 18

यिर्मया 19 / यिर्मया 19

यिर्मया 20 / यिर्मया 20

यिर्मया 21 / यिर्मया 21

यिर्मया 22 / यिर्मया 22

यिर्मया 23 / यिर्मया 23

यिर्मया 24 / यिर्मया 24

यिर्मया 25 / यिर्मया 25

यिर्मया 26 / यिर्मया 26

यिर्मया 27 / यिर्मया 27

यिर्मया 28 / यिर्मया 28

यिर्मया 29 / यिर्मया 29

यिर्मया 30 / यिर्मया 30

यिर्मया 31 / यिर्मया 31

यिर्मया 32 / यिर्मया 32

यिर्मया 33 / यिर्मया 33

यिर्मया 34 / यिर्मया 34

यिर्मया 35 / यिर्मया 35

यिर्मया 36 / यिर्मया 36

यिर्मया 37 / यिर्मया 37

यिर्मया 38 / यिर्मया 38

यिर्मया 39 / यिर्मया 39

यिर्मया 40 / यिर्मया 40

यिर्मया 41 / यिर्मया 41

यिर्मया 42 / यिर्मया 42

यिर्मया 43 / यिर्मया 43

यिर्मया 44 / यिर्मया 44

यिर्मया 45 / यिर्मया 45

यिर्मया 46 / यिर्मया 46

यिर्मया 47 / यिर्मया 47

यिर्मया 48 / यिर्मया 48

यिर्मया 49 / यिर्मया 49

यिर्मया 50 / यिर्मया 50

यिर्मया 51 / यिर्मया 51

यिर्मया 52 / यिर्मया 52