A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

यशया ६२सीयोनेची नीतिमत्ता उदयप्रभेप्रमाणे फाकेपर्यंत तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालींप्रमाणे दिसेपर्यंत तिच्याकरिता मला चैन पडणार नाही.
राष्ट्रे तुझी नीतिमत्ता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील; परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील.
तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील.
ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.
कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.
हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;
आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका.
परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;
तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठवले तेच ते खातील व परमेश्वराचे स्तवन करतील; ज्यांनी तो द्राक्षारस साठवला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील.”
१०
बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.
११
पाहा, परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजवले आहे की, “सीयोनेच्या कन्येला म्हणा, ‘पाहा, तुझे तारण येत आहे; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे व पारिपत्य त्याच्यासमोर आहे.”’
१२
पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक, असे त्यांना म्हणतील व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील.यशया ६२:1

यशया ६२:2

यशया ६२:3

यशया ६२:4

यशया ६२:5

यशया ६२:6

यशया ६२:7

यशया ६२:8

यशया ६२:9

यशया ६२:10

यशया ६२:11

यशया ६२:12यशया 1 / यशया 1

यशया 2 / यशया 2

यशया 3 / यशया 3

यशया 4 / यशया 4

यशया 5 / यशया 5

यशया 6 / यशया 6

यशया 7 / यशया 7

यशया 8 / यशया 8

यशया 9 / यशया 9

यशया 10 / यशया 10

यशया 11 / यशया 11

यशया 12 / यशया 12

यशया 13 / यशया 13

यशया 14 / यशया 14

यशया 15 / यशया 15

यशया 16 / यशया 16

यशया 17 / यशया 17

यशया 18 / यशया 18

यशया 19 / यशया 19

यशया 20 / यशया 20

यशया 21 / यशया 21

यशया 22 / यशया 22

यशया 23 / यशया 23

यशया 24 / यशया 24

यशया 25 / यशया 25

यशया 26 / यशया 26

यशया 27 / यशया 27

यशया 28 / यशया 28

यशया 29 / यशया 29

यशया 30 / यशया 30

यशया 31 / यशया 31

यशया 32 / यशया 32

यशया 33 / यशया 33

यशया 34 / यशया 34

यशया 35 / यशया 35

यशया 36 / यशया 36

यशया 37 / यशया 37

यशया 38 / यशया 38

यशया 39 / यशया 39

यशया 40 / यशया 40

यशया 41 / यशया 41

यशया 42 / यशया 42

यशया 43 / यशया 43

यशया 44 / यशया 44

यशया 45 / यशया 45

यशया 46 / यशया 46

यशया 47 / यशया 47

यशया 48 / यशया 48

यशया 49 / यशया 49

यशया 50 / यशया 50

यशया 51 / यशया 51

यशया 52 / यशया 52

यशया 53 / यशया 53

यशया 54 / यशया 54

यशया 55 / यशया 55

यशया 56 / यशया 56

यशया 57 / यशया 57

यशया 58 / यशया 58

यशया 59 / यशया 59

यशया 60 / यशया 60

यशया 61 / Ese 61

यशया 62 / Ese 62

यशया 63 / Ese 63

यशया 64 / Ese 64

यशया 65 / Ese 65

यशया 66 / Ese 66