A A A A A
मराठी बायबल 2015

यशया ५२हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.
अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.
कारण परमेश्वर म्हणतो की: “मोलावाचून तुम्हांला विकले आणि पैक्यावाचून तुमची मुक्तता होणार.
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक मिसर देशात जाऊन राहिले; अश्शूरानेही विनाकारण त्यांच्यावर जुलूम केला.
परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.
म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.”
जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, “तुझा देव राज्य करीत आहे” असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.
तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत; कारण परमेश्वर सीयोनेस परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत.
यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.
१०
परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.
११
निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.
१२
तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे.
१३
पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल.
१४
ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्‍यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),
१५
त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.यशया ५२:1

यशया ५२:2

यशया ५२:3

यशया ५२:4

यशया ५२:5

यशया ५२:6

यशया ५२:7

यशया ५२:8

यशया ५२:9

यशया ५२:10

यशया ५२:11

यशया ५२:12

यशया ५२:13

यशया ५२:14

यशया ५२:15यशया 1 / यशया 1

यशया 2 / यशया 2

यशया 3 / यशया 3

यशया 4 / यशया 4

यशया 5 / यशया 5

यशया 6 / यशया 6

यशया 7 / यशया 7

यशया 8 / यशया 8

यशया 9 / यशया 9

यशया 10 / यशया 10

यशया 11 / यशया 11

यशया 12 / यशया 12

यशया 13 / यशया 13

यशया 14 / यशया 14

यशया 15 / यशया 15

यशया 16 / यशया 16

यशया 17 / यशया 17

यशया 18 / यशया 18

यशया 19 / यशया 19

यशया 20 / यशया 20

यशया 21 / यशया 21

यशया 22 / यशया 22

यशया 23 / यशया 23

यशया 24 / यशया 24

यशया 25 / यशया 25

यशया 26 / यशया 26

यशया 27 / यशया 27

यशया 28 / यशया 28

यशया 29 / यशया 29

यशया 30 / यशया 30

यशया 31 / यशया 31

यशया 32 / यशया 32

यशया 33 / यशया 33

यशया 34 / यशया 34

यशया 35 / यशया 35

यशया 36 / यशया 36

यशया 37 / यशया 37

यशया 38 / यशया 38

यशया 39 / यशया 39

यशया 40 / यशया 40

यशया 41 / यशया 41

यशया 42 / यशया 42

यशया 43 / यशया 43

यशया 44 / यशया 44

यशया 45 / यशया 45

यशया 46 / यशया 46

यशया 47 / यशया 47

यशया 48 / यशया 48

यशया 49 / यशया 49

यशया 50 / यशया 50

यशया 51 / यशया 51

यशया 52 / यशया 52

यशया 53 / यशया 53

यशया 54 / यशया 54

यशया 55 / यशया 55

यशया 56 / यशया 56

यशया 57 / यशया 57

यशया 58 / यशया 58

यशया 59 / यशया 59

यशया 60 / यशया 60

यशया 61 / यशया 61

यशया 62 / यशया 62

यशया 63 / यशया 63

यशया 64 / यशया 64

यशया 65 / यशया 65

यशया 66 / यशया 66