A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

यशया ५०परमेश्वर म्हणतो, “तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्याला तुम्हांला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमची विक्री झाली आहे; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईला सोडावे लागले.
मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.
मी आकाशास काळा पेहराव लेववतो; गोणपाट त्याचे पांघरूण करतो.”
शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.
प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही.
मी मारणार्‍यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्‍यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही.
प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.
मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे.
पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; त्यांना कसर खाऊन टाकील.
१०
परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.
११
जे तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही कोलिते वागवता ते तुम्ही सर्व आपल्याच अग्नीच्या ज्वालेत चालते व्हा! तुम्ही स्वतः पेटवलेल्या कोलितांत जाऊन पडा! माझ्या हातून हे तुम्हांला घडेल; तुम्ही क्लेशात पडून राहाल.यशया ५०:1

यशया ५०:2

यशया ५०:3

यशया ५०:4

यशया ५०:5

यशया ५०:6

यशया ५०:7

यशया ५०:8

यशया ५०:9

यशया ५०:10

यशया ५०:11यशया 1 / यशया 1

यशया 2 / यशया 2

यशया 3 / यशया 3

यशया 4 / यशया 4

यशया 5 / यशया 5

यशया 6 / यशया 6

यशया 7 / यशया 7

यशया 8 / यशया 8

यशया 9 / यशया 9

यशया 10 / यशया 10

यशया 11 / यशया 11

यशया 12 / यशया 12

यशया 13 / यशया 13

यशया 14 / यशया 14

यशया 15 / यशया 15

यशया 16 / यशया 16

यशया 17 / यशया 17

यशया 18 / यशया 18

यशया 19 / यशया 19

यशया 20 / यशया 20

यशया 21 / यशया 21

यशया 22 / यशया 22

यशया 23 / यशया 23

यशया 24 / यशया 24

यशया 25 / यशया 25

यशया 26 / यशया 26

यशया 27 / यशया 27

यशया 28 / यशया 28

यशया 29 / यशया 29

यशया 30 / यशया 30

यशया 31 / यशया 31

यशया 32 / यशया 32

यशया 33 / यशया 33

यशया 34 / यशया 34

यशया 35 / यशया 35

यशया 36 / यशया 36

यशया 37 / यशया 37

यशया 38 / यशया 38

यशया 39 / यशया 39

यशया 40 / यशया 40

यशया 41 / यशया 41

यशया 42 / यशया 42

यशया 43 / यशया 43

यशया 44 / यशया 44

यशया 45 / यशया 45

यशया 46 / यशया 46

यशया 47 / यशया 47

यशया 48 / यशया 48

यशया 49 / यशया 49

यशया 50 / यशया 50

यशया 51 / यशया 51

यशया 52 / यशया 52

यशया 53 / यशया 53

यशया 54 / यशया 54

यशया 55 / यशया 55

यशया 56 / यशया 56

यशया 57 / यशया 57

यशया 58 / यशया 58

यशया 59 / यशया 59

यशया 60 / यशया 60

यशया 61 / यशया 61

यशया 62 / यशया 62

यशया 63 / यशया 63

यशया 64 / यशया 64

यशया 65 / यशया 65

यशया 66 / यशया 66