A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

यशया २४पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.
तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणार्‍याची तशी विकत देणार्‍याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल.
पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.
पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.
ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.
नवा द्राक्षारस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे, हर्षित मनाचे सर्व जन उसासे टाकत आहेत.
डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणार्‍यांचा कल्ला थांबला आहे, किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे.
ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.
१०
व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे; प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही.
११
बाहेर रस्त्यात द्राक्षारसास्तव ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे;
१२
नगरात नुसती ओसाडी झालेली आहे; वेशीचा भुगाभुगा झाला आहे.
१३
जैतून वृक्ष हलवल्यावर, द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर, सरवा वेचताना जशी थोडीशी फळे राहतात तसे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल.
१४
ते उच्च स्वराने गजर करतील, परमेश्वराच्या प्रभावास्तव समुद्रावरून गजर करतील.
१५
ह्यास्तव उगवतीकडल्या लोकांनो, परमेश्वराचे गौरव करा; समुद्रतीरी राहणार्‍यांनो, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाचे गौरव करा.
१६
नीतिमानाची प्रतिष्ठा होवो अशी गीते दिगंतापासून आमच्या कानी पडली. तेव्हा मी म्हणालो, “माझा नाश झाला हो नाश झाला! हायहाय! ठकांनी ठकवले, ठकांनी ठकबाजीने ठकवले.”
१७
हे पृथ्वीवरील रहिवाशा, दरारा, खाडा व पाश हे तुझ्यापुढे आहेत!
१८
असे होईल की दरार्‍याच्या शब्दामुळे पळणारा खाड्यात पडेल, खाड्यातून निभावलेला पाशात सापडेल; कारण आकाशाची द्वारे उघडली आहेत, पृथ्वीचे आधार हालत आहेत.
१९
भूमी अगदी फाटून गेली आहे, भूमी साफ फुटून गेली आहे, भूमी अतिशय हादरून गेली आहे.
२०
भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.
२१
त्या दिवशी असे होईल की उच्च आकाशात आकाशस्थांचे सैन्य व भूमीवर भूमीचे राजे ह्यांची परमेश्वर झडती घेईल.
२२
बंदिवानांना जसे अंधारकोठडीत कोंडतात, तसे त्यांना कोंडतील व कारागृहात ठेवतील; आणि बहुत दिवसांनी त्यांची झडती घेतील.
२३
चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.यशया २४:1
यशया २४:2
यशया २४:3
यशया २४:4
यशया २४:5
यशया २४:6
यशया २४:7
यशया २४:8
यशया २४:9
यशया २४:10
यशया २४:11
यशया २४:12
यशया २४:13
यशया २४:14
यशया २४:15
यशया २४:16
यशया २४:17
यशया २४:18
यशया २४:19
यशया २४:20
यशया २४:21
यशया २४:22
यशया २४:23


यशया 1 / यशया 1
यशया 2 / यशया 2
यशया 3 / यशया 3
यशया 4 / यशया 4
यशया 5 / यशया 5
यशया 6 / यशया 6
यशया 7 / यशया 7
यशया 8 / यशया 8
यशया 9 / यशया 9
यशया 10 / यशया 10
यशया 11 / यशया 11
यशया 12 / यशया 12
यशया 13 / यशया 13
यशया 14 / यशया 14
यशया 15 / यशया 15
यशया 16 / यशया 16
यशया 17 / यशया 17
यशया 18 / यशया 18
यशया 19 / यशया 19
यशया 20 / यशया 20
यशया 21 / यशया 21
यशया 22 / यशया 22
यशया 23 / यशया 23
यशया 24 / यशया 24
यशया 25 / यशया 25
यशया 26 / यशया 26
यशया 27 / यशया 27
यशया 28 / यशया 28
यशया 29 / यशया 29
यशया 30 / यशया 30
यशया 31 / यशया 31
यशया 32 / यशया 32
यशया 33 / यशया 33
यशया 34 / यशया 34
यशया 35 / यशया 35
यशया 36 / यशया 36
यशया 37 / यशया 37
यशया 38 / यशया 38
यशया 39 / यशया 39
यशया 40 / यशया 40
यशया 41 / यशया 41
यशया 42 / यशया 42
यशया 43 / यशया 43
यशया 44 / यशया 44
यशया 45 / यशया 45
यशया 46 / यशया 46
यशया 47 / यशया 47
यशया 48 / यशया 48
यशया 49 / यशया 49
यशया 50 / यशया 50
यशया 51 / यशया 51
यशया 52 / यशया 52
यशया 53 / यशया 53
यशया 54 / यशया 54
यशया 55 / यशया 55
यशया 56 / यशया 56
यशया 57 / यशया 57
यशया 58 / यशया 58
यशया 59 / यशया 59
यशया 60 / यशया 60
यशया 61 / यशया 61
यशया 62 / यशया 62
यशया 63 / यशया 63
यशया 64 / यशया 64
यशया 65 / यशया 65
यशया 66 / यशया 66