A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

उपदेशक ४मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी पुन्हा निरीक्षण केले; तेव्हा पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.
म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यांच्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले.
जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी.
मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.
मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.1
कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.
मग मी पुन्हा भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या:
कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.
एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.
१०
त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.
११
दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?
१२
जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.
१३
अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा.
१४
कारण हा कारागृहातून निघून राजा झाला; पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला.
१५
हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले.
१६
ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते; तरी पुढील काळातील लोक त्याच्याविषयी आनंद पावणार नाहीत. निःसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.उपदेशक ४:1

उपदेशक ४:2

उपदेशक ४:3

उपदेशक ४:4

उपदेशक ४:5

उपदेशक ४:6

उपदेशक ४:7

उपदेशक ४:8

उपदेशक ४:9

उपदेशक ४:10

उपदेशक ४:11

उपदेशक ४:12

उपदेशक ४:13

उपदेशक ४:14

उपदेशक ४:15

उपदेशक ४:16उपदेशक 1 / उपदेश 1

उपदेशक 2 / उपदेश 2

उपदेशक 3 / उपदेश 3

उपदेशक 4 / उपदेश 4

उपदेशक 5 / उपदेश 5

उपदेशक 6 / उपदेश 6

उपदेशक 7 / उपदेश 7

उपदेशक 8 / उपदेश 8

उपदेशक 9 / उपदेश 9

उपदेशक 10 / उपदेश 10

उपदेशक 11 / उपदेश 11

उपदेशक 12 / उपदेश 12