A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

नीतिसूत्रे ७माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ.
ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.
“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण; आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण;
त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणार्‍या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल.
मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले तो,
भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला.
तो तिच्या घराच्या कोपर्‍याजवळून जाणार्‍या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने
संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात, निबिड अंधकारात गेला.
१०
तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली.
११
ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत;
१२
कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते.
१३
तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले; तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले,
१४
“मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले.
१५
ह्यासाठी तुला भेटायला व तुझे मुख पाहायला, मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस.
१६
मी आपला पलंग वेलबुट्टीदार गिरद्यांनी, मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे.
१७
मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे.
१८
ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू.
१९
कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे;
२०
त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे; तो पौर्णिमेस घरी येईल.”
२१
तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले.
२२
तो तत्काळ तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो.
२३
जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो.
२४
तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनांकडे लक्ष द्या.
२५
तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.
२६
कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडले आहे; तिने वधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे.
२७
तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय.नीतिसूत्रे ७:1
नीतिसूत्रे ७:2
नीतिसूत्रे ७:3
नीतिसूत्रे ७:4
नीतिसूत्रे ७:5
नीतिसूत्रे ७:6
नीतिसूत्रे ७:7
नीतिसूत्रे ७:8
नीतिसूत्रे ७:9
नीतिसूत्रे ७:10
नीतिसूत्रे ७:11
नीतिसूत्रे ७:12
नीतिसूत्रे ७:13
नीतिसूत्रे ७:14
नीतिसूत्रे ७:15
नीतिसूत्रे ७:16
नीतिसूत्रे ७:17
नीतिसूत्रे ७:18
नीतिसूत्रे ७:19
नीतिसूत्रे ७:20
नीतिसूत्रे ७:21
नीतिसूत्रे ७:22
नीतिसूत्रे ७:23
नीतिसूत्रे ७:24
नीतिसूत्रे ७:25
नीतिसूत्रे ७:26
नीतिसूत्रे ७:27


नीतिसूत्रे 1 / नीतिसू 1
नीतिसूत्रे 2 / नीतिसू 2
नीतिसूत्रे 3 / नीतिसू 3
नीतिसूत्रे 4 / नीतिसू 4
नीतिसूत्रे 5 / नीतिसू 5
नीतिसूत्रे 6 / नीतिसू 6
नीतिसूत्रे 7 / नीतिसू 7
नीतिसूत्रे 8 / नीतिसू 8
नीतिसूत्रे 9 / नीतिसू 9
नीतिसूत्रे 10 / नीतिसू 10
नीतिसूत्रे 11 / नीतिसू 11
नीतिसूत्रे 12 / नीतिसू 12
नीतिसूत्रे 13 / नीतिसू 13
नीतिसूत्रे 14 / नीतिसू 14
नीतिसूत्रे 15 / नीतिसू 15
नीतिसूत्रे 16 / नीतिसू 16
नीतिसूत्रे 17 / नीतिसू 17
नीतिसूत्रे 18 / नीतिसू 18
नीतिसूत्रे 19 / नीतिसू 19
नीतिसूत्रे 20 / नीतिसू 20
नीतिसूत्रे 21 / नीतिसू 21
नीतिसूत्रे 22 / नीतिसू 22
नीतिसूत्रे 23 / नीतिसू 23
नीतिसूत्रे 24 / नीतिसू 24
नीतिसूत्रे 25 / नीतिसू 25
नीतिसूत्रे 26 / नीतिसू 26
नीतिसूत्रे 27 / नीतिसू 27
नीतिसूत्रे 28 / नीतिसू 28
नीतिसूत्रे 29 / नीतिसू 29
नीतिसूत्रे 30 / नीतिसू 30
नीतिसूत्रे 31 / नीतिसू 31