A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

नीतिसूत्रे १०मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दु:खी.
दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.
परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो.
सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो.
उन्हाळ्यात जमवाजमव करतो तो मुलगा शहाणा होय; जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद होय.
नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते.
नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.
सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो.
सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.
१०
जो डोळे मिचकावतो तो दु:खास कारण होतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो.
११
नीतिमानाचे मुख जीवनाचा झरा आहे; दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते.
१२
द्वेष कलह उत्पन्न करतो; प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
१३
विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
१४
शहाणे जन ज्ञानसंग्रह करतात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय.
१५
धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे.
१६
नीतिमानाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते.
१७
बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो.
१८
गुप्तपणे द्वेष करणार्‍याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो.
१९
फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.
२०
नीतिमानाची जिव्हा उत्कृष्ट रुप्यासारखी आहे; दुर्जनांचे हृदय कवडीमोल आहे.
२१
नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.
२२
परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.
२३
मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते.
२४
दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते.
२५
वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्‍या पायासारखा आहे.
२६
जशी आंब दातांना, जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणार्‍यांना आहे.
२७
परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात.
२८
नीतिमानाची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.
२९
परमेश्वराचा मार्ग सात्त्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणार्‍यांना तो नाशकारक आहे,
३०
नीतिमान कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत.
३१
नीतिमानाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल.
३२
नीतिमानाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते.नीतिसूत्रे १०:1
नीतिसूत्रे १०:2
नीतिसूत्रे १०:3
नीतिसूत्रे १०:4
नीतिसूत्रे १०:5
नीतिसूत्रे १०:6
नीतिसूत्रे १०:7
नीतिसूत्रे १०:8
नीतिसूत्रे १०:9
नीतिसूत्रे १०:10
नीतिसूत्रे १०:11
नीतिसूत्रे १०:12
नीतिसूत्रे १०:13
नीतिसूत्रे १०:14
नीतिसूत्रे १०:15
नीतिसूत्रे १०:16
नीतिसूत्रे १०:17
नीतिसूत्रे १०:18
नीतिसूत्रे १०:19
नीतिसूत्रे १०:20
नीतिसूत्रे १०:21
नीतिसूत्रे १०:22
नीतिसूत्रे १०:23
नीतिसूत्रे १०:24
नीतिसूत्रे १०:25
नीतिसूत्रे १०:26
नीतिसूत्रे १०:27
नीतिसूत्रे १०:28
नीतिसूत्रे १०:29
नीतिसूत्रे १०:30
नीतिसूत्रे १०:31
नीतिसूत्रे १०:32


नीतिसूत्रे 1 / नीतिसू 1
नीतिसूत्रे 2 / नीतिसू 2
नीतिसूत्रे 3 / नीतिसू 3
नीतिसूत्रे 4 / नीतिसू 4
नीतिसूत्रे 5 / नीतिसू 5
नीतिसूत्रे 6 / नीतिसू 6
नीतिसूत्रे 7 / नीतिसू 7
नीतिसूत्रे 8 / नीतिसू 8
नीतिसूत्रे 9 / नीतिसू 9
नीतिसूत्रे 10 / नीतिसू 10
नीतिसूत्रे 11 / नीतिसू 11
नीतिसूत्रे 12 / नीतिसू 12
नीतिसूत्रे 13 / नीतिसू 13
नीतिसूत्रे 14 / नीतिसू 14
नीतिसूत्रे 15 / नीतिसू 15
नीतिसूत्रे 16 / नीतिसू 16
नीतिसूत्रे 17 / नीतिसू 17
नीतिसूत्रे 18 / नीतिसू 18
नीतिसूत्रे 19 / नीतिसू 19
नीतिसूत्रे 20 / नीतिसू 20
नीतिसूत्रे 21 / नीतिसू 21
नीतिसूत्रे 22 / नीतिसू 22
नीतिसूत्रे 23 / नीतिसू 23
नीतिसूत्रे 24 / नीतिसू 24
नीतिसूत्रे 25 / नीतिसू 25
नीतिसूत्रे 26 / नीतिसू 26
नीतिसूत्रे 27 / नीतिसू 27
नीतिसूत्रे 28 / नीतिसू 28
नीतिसूत्रे 29 / नीतिसू 29
नीतिसूत्रे 30 / नीतिसू 30
नीतिसूत्रे 31 / नीतिसू 31