१ |
मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला. |
२ |
त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली. |
३ |
इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.” |
४ |
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. |
५ |
सहाव्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते, इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे.” |
६ |
मोशे आणि अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “परमेश्वरानेच तुम्हांला मिसर देशातून आणले हे तुम्हांला संध्याकाळी कळून येईल, |
७ |
आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” |
८ |
मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.” |
९ |
मोशे अहरोनाला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.” |
१० |
अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. |
११ |
परमेश्वर मोशेला म्हणाला, |
१२ |
“इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.” |
१३ |
संध्याकाळी असे झाले की लावे पक्षी येऊन सर्व छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दंव पडले. |
१४ |
हे पडलेले दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. |
१५ |
इस्राएल लोक ते पाहून एकमेकांना म्हणाले, “हे काय?”1 कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हांला खायला दिले आहे ते हेच. |
१६ |
परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की, प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे; ज्याच्या-त्याच्या डेर्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एकेक ओमर जमा करावे.” |
१७ |
इस्राएल लोकांनी तसे केले; कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले. |
१८ |
त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही; प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते. |
१९ |
मोशेने त्यांना सांगितले की, “कोणीही ह्यांपैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.” |
२० |
तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली; त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. |
२१ |
ह्या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे गोळा करीत; आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाई. |
२२ |
सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले, तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवले. |
२३ |
तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.” |
२४ |
मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले; पण त्याची घाण सुटली नाही की त्यात किडे पडले नाहीत. |
२५ |
मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानात ते तुम्हांला मिळायचे नाही. |
२६ |
सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे; सातवा दिवस शब्बाथ आहे, त्या दिवशी काहीएक नसणार.” |
२७ |
तरी सातव्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही मिळाले नाही. |
२८ |
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळायचे तुम्ही कोठवर नाकारणार? |
२९ |
पाहा, परमेश्वराने तुम्हांला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हांला दोन दिवसांचे अन्न देतो. सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.” |
३० |
ह्याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला. |
३१ |
इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना1 ठेवले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. |
३२ |
मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, ह्यातले एक ओमरभर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा; मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल.” |
३३ |
तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल; ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे.” |
३४ |
परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ठेवले. |
३५ |
इस्राएल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहचेपर्यंत चाळीस वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहचेपर्यंत ते मान्ना खात होते. |
३६ |
ओमर हा एफाचा दहावा भाग आहे.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
निर्गम १६:1 |
निर्गम १६:2 |
निर्गम १६:3 |
निर्गम १६:4 |
निर्गम १६:5 |
निर्गम १६:6 |
निर्गम १६:7 |
निर्गम १६:8 |
निर्गम १६:9 |
निर्गम १६:10 |
निर्गम १६:11 |
निर्गम १६:12 |
निर्गम १६:13 |
निर्गम १६:14 |
निर्गम १६:15 |
निर्गम १६:16 |
निर्गम १६:17 |
निर्गम १६:18 |
निर्गम १६:19 |
निर्गम १६:20 |
निर्गम १६:21 |
निर्गम १६:22 |
निर्गम १६:23 |
निर्गम १६:24 |
निर्गम १६:25 |
निर्गम १६:26 |
निर्गम १६:27 |
निर्गम १६:28 |
निर्गम १६:29 |
निर्गम १६:30 |
निर्गम १६:31 |
निर्गम १६:32 |
निर्गम १६:33 |
निर्गम १६:34 |
निर्गम १६:35 |
निर्गम १६:36 |
|
|
|
|
|
|
निर्गम 1 / निर्गम 1 |
निर्गम 2 / निर्गम 2 |
निर्गम 3 / निर्गम 3 |
निर्गम 4 / निर्गम 4 |
निर्गम 5 / निर्गम 5 |
निर्गम 6 / निर्गम 6 |
निर्गम 7 / निर्गम 7 |
निर्गम 8 / निर्गम 8 |
निर्गम 9 / निर्गम 9 |
निर्गम 10 / निर्गम 10 |
निर्गम 11 / निर्गम 11 |
निर्गम 12 / निर्गम 12 |
निर्गम 13 / निर्गम 13 |
निर्गम 14 / निर्गम 14 |
निर्गम 15 / निर्गम 15 |
निर्गम 16 / निर्गम 16 |
निर्गम 17 / निर्गम 17 |
निर्गम 18 / निर्गम 18 |
निर्गम 19 / निर्गम 19 |
निर्गम 20 / निर्गम 20 |
निर्गम 21 / निर्गम 21 |
निर्गम 22 / निर्गम 22 |
निर्गम 23 / निर्गम 23 |
निर्गम 24 / निर्गम 24 |
निर्गम 25 / निर्गम 25 |
निर्गम 26 / निर्गम 26 |
निर्गम 27 / निर्गम 27 |
निर्गम 28 / निर्गम 28 |
निर्गम 29 / निर्गम 29 |
निर्गम 30 / निर्गम 30 |
निर्गम 31 / निर्गम 31 |
निर्गम 32 / निर्गम 32 |
निर्गम 33 / निर्गम 33 |
निर्गम 34 / निर्गम 34 |
निर्गम 35 / निर्गम 35 |
निर्गम 36 / निर्गम 36 |
निर्गम 37 / निर्गम 37 |
निर्गम 38 / निर्गम 38 |
निर्गम 39 / निर्गम 39 |
निर्गम 40 / निर्गम 40 |