A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र ७१हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.
तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर;
मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस.
हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर.
कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.
जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन.
पुष्कळ लोकांना मी आश्‍चर्याचा विषय झालो आहे; तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस.
माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.
उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.
१०
कारण माझे वैरी माझ्याविषयी बोलतात आणि माझ्या जिवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करतात.
११
ते म्हणतात, “देवाने ह्याला सोडले आहे; ह्याच्या पाठीस लागा, ह्याला धरा; कारण ह्याला सोडवणारा कोणी नाही.”
१२
हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.
१३
माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत.
१४
मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करत जाईन.
१५
माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील; त्यांची संख्या मला कळत नाही.
१६
प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करत येईन; तुझ्या, केवळ तुझ्याच, नीतिमत्त्वाचे मी निवेदन करीन.
१७
हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णन केली आहेत.
१८
मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.
१९
हे देवा, तुझे नीतिमत्त्व गगनापर्यंत पोहचले आहे. हे देवा, तू महत्कृत्ये केली आहेत; तुझ्यासारखा कोण आहे?
२०
तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
२१
तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर.
२२
मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन.
२३
मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील.
२४
माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.स्तोत्र ७१:1
स्तोत्र ७१:2
स्तोत्र ७१:3
स्तोत्र ७१:4
स्तोत्र ७१:5
स्तोत्र ७१:6
स्तोत्र ७१:7
स्तोत्र ७१:8
स्तोत्र ७१:9
स्तोत्र ७१:10
स्तोत्र ७१:11
स्तोत्र ७१:12
स्तोत्र ७१:13
स्तोत्र ७१:14
स्तोत्र ७१:15
स्तोत्र ७१:16
स्तोत्र ७१:17
स्तोत्र ७१:18
स्तोत्र ७१:19
स्तोत्र ७१:20
स्तोत्र ७१:21
स्तोत्र ७१:22
स्तोत्र ७१:23
स्तोत्र ७१:24


स्तोत्र 1 / स्तोत्र 1
स्तोत्र 2 / स्तोत्र 2
स्तोत्र 3 / स्तोत्र 3
स्तोत्र 4 / स्तोत्र 4
स्तोत्र 5 / स्तोत्र 5
स्तोत्र 6 / स्तोत्र 6
स्तोत्र 7 / स्तोत्र 7
स्तोत्र 8 / स्तोत्र 8
स्तोत्र 9 / स्तोत्र 9
स्तोत्र 10 / स्तोत्र 10
स्तोत्र 11 / स्तोत्र 11
स्तोत्र 12 / स्तोत्र 12
स्तोत्र 13 / स्तोत्र 13
स्तोत्र 14 / स्तोत्र 14
स्तोत्र 15 / स्तोत्र 15
स्तोत्र 16 / स्तोत्र 16
स्तोत्र 17 / स्तोत्र 17
स्तोत्र 18 / स्तोत्र 18
स्तोत्र 19 / स्तोत्र 19
स्तोत्र 20 / स्तोत्र 20
स्तोत्र 21 / स्तोत्र 21
स्तोत्र 22 / स्तोत्र 22
स्तोत्र 23 / स्तोत्र 23
स्तोत्र 24 / स्तोत्र 24
स्तोत्र 25 / स्तोत्र 25
स्तोत्र 26 / स्तोत्र 26
स्तोत्र 27 / स्तोत्र 27
स्तोत्र 28 / स्तोत्र 28
स्तोत्र 29 / स्तोत्र 29
स्तोत्र 30 / स्तोत्र 30
स्तोत्र 31 / स्तोत्र 31
स्तोत्र 32 / स्तोत्र 32
स्तोत्र 33 / स्तोत्र 33
स्तोत्र 34 / स्तोत्र 34
स्तोत्र 35 / स्तोत्र 35
स्तोत्र 36 / स्तोत्र 36
स्तोत्र 37 / स्तोत्र 37
स्तोत्र 38 / स्तोत्र 38
स्तोत्र 39 / स्तोत्र 39
स्तोत्र 40 / स्तोत्र 40
स्तोत्र 41 / स्तोत्र 41
स्तोत्र 42 / स्तोत्र 42
स्तोत्र 43 / स्तोत्र 43
स्तोत्र 44 / स्तोत्र 44
स्तोत्र 45 / स्तोत्र 45
स्तोत्र 46 / स्तोत्र 46
स्तोत्र 47 / स्तोत्र 47
स्तोत्र 48 / स्तोत्र 48
स्तोत्र 49 / स्तोत्र 49
स्तोत्र 50 / स्तोत्र 50
स्तोत्र 51 / स्तोत्र 51
स्तोत्र 52 / स्तोत्र 52
स्तोत्र 53 / स्तोत्र 53
स्तोत्र 54 / स्तोत्र 54
स्तोत्र 55 / स्तोत्र 55
स्तोत्र 56 / स्तोत्र 56
स्तोत्र 57 / स्तोत्र 57
स्तोत्र 58 / स्तोत्र 58
स्तोत्र 59 / स्तोत्र 59
स्तोत्र 60 / स्तोत्र 60
स्तोत्र 61 / स्तोत्र 61
स्तोत्र 62 / स्तोत्र 62
स्तोत्र 63 / स्तोत्र 63
स्तोत्र 64 / स्तोत्र 64
स्तोत्र 65 / स्तोत्र 65
स्तोत्र 66 / स्तोत्र 66
स्तोत्र 67 / स्तोत्र 67
स्तोत्र 68 / स्तोत्र 68
स्तोत्र 69 / स्तोत्र 69
स्तोत्र 70 / स्तोत्र 70
स्तोत्र 71 / स्तोत्र 71
स्तोत्र 72 / स्तोत्र 72
स्तोत्र 73 / स्तोत्र 73
स्तोत्र 74 / स्तोत्र 74
स्तोत्र 75 / स्तोत्र 75
स्तोत्र 76 / स्तोत्र 76
स्तोत्र 77 / स्तोत्र 77
स्तोत्र 78 / स्तोत्र 78
स्तोत्र 79 / स्तोत्र 79
स्तोत्र 80 / स्तोत्र 80
स्तोत्र 81 / स्तोत्र 81
स्तोत्र 82 / स्तोत्र 82
स्तोत्र 83 / स्तोत्र 83
स्तोत्र 84 / स्तोत्र 84
स्तोत्र 85 / स्तोत्र 85
स्तोत्र 86 / स्तोत्र 86
स्तोत्र 87 / स्तोत्र 87
स्तोत्र 88 / स्तोत्र 88
स्तोत्र 89 / स्तोत्र 89
स्तोत्र 90 / स्तोत्र 90
स्तोत्र 91 / स्तोत्र 91
स्तोत्र 92 / स्तोत्र 92
स्तोत्र 93 / स्तोत्र 93
स्तोत्र 94 / स्तोत्र 94
स्तोत्र 95 / स्तोत्र 95
स्तोत्र 96 / स्तोत्र 96
स्तोत्र 97 / स्तोत्र 97
स्तोत्र 98 / स्तोत्र 98
स्तोत्र 99 / स्तोत्र 99
स्तोत्र 100 / स्तोत्र 100
स्तोत्र 101 / स्तोत्र 101
स्तोत्र 102 / स्तोत्र 102
स्तोत्र 103 / स्तोत्र 103
स्तोत्र 104 / स्तोत्र 104
स्तोत्र 105 / स्तोत्र 105
स्तोत्र 106 / स्तोत्र 106
स्तोत्र 107 / स्तोत्र 107
स्तोत्र 108 / स्तोत्र 108
स्तोत्र 109 / स्तोत्र 109
स्तोत्र 110 / स्तोत्र 110
स्तोत्र 111 / स्तोत्र 111
स्तोत्र 112 / स्तोत्र 112
स्तोत्र 113 / स्तोत्र 113
स्तोत्र 114 / स्तोत्र 114
स्तोत्र 115 / स्तोत्र 115
स्तोत्र 116 / स्तोत्र 116
स्तोत्र 117 / स्तोत्र 117
स्तोत्र 118 / स्तोत्र 118
स्तोत्र 119 / स्तोत्र 119
स्तोत्र 120 / स्तोत्र 120
स्तोत्र 121 / स्तोत्र 121
स्तोत्र 122 / स्तोत्र 122
स्तोत्र 123 / स्तोत्र 123
स्तोत्र 124 / स्तोत्र 124
स्तोत्र 125 / स्तोत्र 125
स्तोत्र 126 / स्तोत्र 126
स्तोत्र 127 / स्तोत्र 127
स्तोत्र 128 / स्तोत्र 128
स्तोत्र 129 / स्तोत्र 129
स्तोत्र 130 / स्तोत्र 130
स्तोत्र 131 / स्तोत्र 131
स्तोत्र 132 / स्तोत्र 132
स्तोत्र 133 / स्तोत्र 133
स्तोत्र 134 / स्तोत्र 134
स्तोत्र 135 / स्तोत्र 135
स्तोत्र 136 / स्तोत्र 136
स्तोत्र 137 / स्तोत्र 137
स्तोत्र 138 / स्तोत्र 138
स्तोत्र 139 / स्तोत्र 139
स्तोत्र 140 / स्तोत्र 140
स्तोत्र 141 / स्तोत्र 141
स्तोत्र 142 / स्तोत्र 142
स्तोत्र 143 / स्तोत्र 143
स्तोत्र 144 / स्तोत्र 144
स्तोत्र 145 / स्तोत्र 145
स्तोत्र 146 / स्तोत्र 146
स्तोत्र 147 / स्तोत्र 147
स्तोत्र 148 / स्तोत्र 148
स्तोत्र 149 / स्तोत्र 149
स्तोत्र 150 / स्तोत्र 150