A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र ३५दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.
ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा.
भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्‍यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग.
माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.
ते वार्‍याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.
त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.
कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली.
त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.
मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील.
१०
माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्‍यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्‍यापासून सोडवतोस;”
११
द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारतात.
१२
मी केलेल्या बर्‍याची फेड ते वाइटाने करतात; माझा जीव निराधार झाला आहे.
१३
मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली.
१४
तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो; आईसाठी शोक करणार्‍यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो.
१५
मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली.
१६
जेवणाला नावे ठेवणार्‍या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दांतओठ खाल्ले.
१७
हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव.
१८
मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.
१९
माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;
२०
कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही; देशात शांततेने राहणार्‍यांविरुद्ध ते मसलती करतात.
२१
माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”
२२
हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.
२३
हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो.
२४
हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.
२५
“अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत.
२६
माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.
२७
माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.
२८
माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.स्तोत्र ३५:1
स्तोत्र ३५:2
स्तोत्र ३५:3
स्तोत्र ३५:4
स्तोत्र ३५:5
स्तोत्र ३५:6
स्तोत्र ३५:7
स्तोत्र ३५:8
स्तोत्र ३५:9
स्तोत्र ३५:10
स्तोत्र ३५:11
स्तोत्र ३५:12
स्तोत्र ३५:13
स्तोत्र ३५:14
स्तोत्र ३५:15
स्तोत्र ३५:16
स्तोत्र ३५:17
स्तोत्र ३५:18
स्तोत्र ३५:19
स्तोत्र ३५:20
स्तोत्र ३५:21
स्तोत्र ३५:22
स्तोत्र ३५:23
स्तोत्र ३५:24
स्तोत्र ३५:25
स्तोत्र ३५:26
स्तोत्र ३५:27
स्तोत्र ३५:28


स्तोत्र 1 / स्तोत्र 1
स्तोत्र 2 / स्तोत्र 2
स्तोत्र 3 / स्तोत्र 3
स्तोत्र 4 / स्तोत्र 4
स्तोत्र 5 / स्तोत्र 5
स्तोत्र 6 / स्तोत्र 6
स्तोत्र 7 / स्तोत्र 7
स्तोत्र 8 / स्तोत्र 8
स्तोत्र 9 / स्तोत्र 9
स्तोत्र 10 / स्तोत्र 10
स्तोत्र 11 / स्तोत्र 11
स्तोत्र 12 / स्तोत्र 12
स्तोत्र 13 / स्तोत्र 13
स्तोत्र 14 / स्तोत्र 14
स्तोत्र 15 / स्तोत्र 15
स्तोत्र 16 / स्तोत्र 16
स्तोत्र 17 / स्तोत्र 17
स्तोत्र 18 / स्तोत्र 18
स्तोत्र 19 / स्तोत्र 19
स्तोत्र 20 / स्तोत्र 20
स्तोत्र 21 / स्तोत्र 21
स्तोत्र 22 / स्तोत्र 22
स्तोत्र 23 / स्तोत्र 23
स्तोत्र 24 / स्तोत्र 24
स्तोत्र 25 / स्तोत्र 25
स्तोत्र 26 / स्तोत्र 26
स्तोत्र 27 / स्तोत्र 27
स्तोत्र 28 / स्तोत्र 28
स्तोत्र 29 / स्तोत्र 29
स्तोत्र 30 / स्तोत्र 30
स्तोत्र 31 / स्तोत्र 31
स्तोत्र 32 / स्तोत्र 32
स्तोत्र 33 / स्तोत्र 33
स्तोत्र 34 / स्तोत्र 34
स्तोत्र 35 / स्तोत्र 35
स्तोत्र 36 / स्तोत्र 36
स्तोत्र 37 / स्तोत्र 37
स्तोत्र 38 / स्तोत्र 38
स्तोत्र 39 / स्तोत्र 39
स्तोत्र 40 / स्तोत्र 40
स्तोत्र 41 / स्तोत्र 41
स्तोत्र 42 / स्तोत्र 42
स्तोत्र 43 / स्तोत्र 43
स्तोत्र 44 / स्तोत्र 44
स्तोत्र 45 / स्तोत्र 45
स्तोत्र 46 / स्तोत्र 46
स्तोत्र 47 / स्तोत्र 47
स्तोत्र 48 / स्तोत्र 48
स्तोत्र 49 / स्तोत्र 49
स्तोत्र 50 / स्तोत्र 50
स्तोत्र 51 / स्तोत्र 51
स्तोत्र 52 / स्तोत्र 52
स्तोत्र 53 / स्तोत्र 53
स्तोत्र 54 / स्तोत्र 54
स्तोत्र 55 / स्तोत्र 55
स्तोत्र 56 / स्तोत्र 56
स्तोत्र 57 / स्तोत्र 57
स्तोत्र 58 / स्तोत्र 58
स्तोत्र 59 / स्तोत्र 59
स्तोत्र 60 / स्तोत्र 60
स्तोत्र 61 / स्तोत्र 61
स्तोत्र 62 / स्तोत्र 62
स्तोत्र 63 / स्तोत्र 63
स्तोत्र 64 / स्तोत्र 64
स्तोत्र 65 / स्तोत्र 65
स्तोत्र 66 / स्तोत्र 66
स्तोत्र 67 / स्तोत्र 67
स्तोत्र 68 / स्तोत्र 68
स्तोत्र 69 / स्तोत्र 69
स्तोत्र 70 / स्तोत्र 70
स्तोत्र 71 / स्तोत्र 71
स्तोत्र 72 / स्तोत्र 72
स्तोत्र 73 / स्तोत्र 73
स्तोत्र 74 / स्तोत्र 74
स्तोत्र 75 / स्तोत्र 75
स्तोत्र 76 / स्तोत्र 76
स्तोत्र 77 / स्तोत्र 77
स्तोत्र 78 / स्तोत्र 78
स्तोत्र 79 / स्तोत्र 79
स्तोत्र 80 / स्तोत्र 80
स्तोत्र 81 / स्तोत्र 81
स्तोत्र 82 / स्तोत्र 82
स्तोत्र 83 / स्तोत्र 83
स्तोत्र 84 / स्तोत्र 84
स्तोत्र 85 / स्तोत्र 85
स्तोत्र 86 / स्तोत्र 86
स्तोत्र 87 / स्तोत्र 87
स्तोत्र 88 / स्तोत्र 88
स्तोत्र 89 / स्तोत्र 89
स्तोत्र 90 / स्तोत्र 90
स्तोत्र 91 / स्तोत्र 91
स्तोत्र 92 / स्तोत्र 92
स्तोत्र 93 / स्तोत्र 93
स्तोत्र 94 / स्तोत्र 94
स्तोत्र 95 / स्तोत्र 95
स्तोत्र 96 / स्तोत्र 96
स्तोत्र 97 / स्तोत्र 97
स्तोत्र 98 / स्तोत्र 98
स्तोत्र 99 / स्तोत्र 99
स्तोत्र 100 / स्तोत्र 100
स्तोत्र 101 / स्तोत्र 101
स्तोत्र 102 / स्तोत्र 102
स्तोत्र 103 / स्तोत्र 103
स्तोत्र 104 / स्तोत्र 104
स्तोत्र 105 / स्तोत्र 105
स्तोत्र 106 / स्तोत्र 106
स्तोत्र 107 / स्तोत्र 107
स्तोत्र 108 / स्तोत्र 108
स्तोत्र 109 / स्तोत्र 109
स्तोत्र 110 / स्तोत्र 110
स्तोत्र 111 / स्तोत्र 111
स्तोत्र 112 / स्तोत्र 112
स्तोत्र 113 / स्तोत्र 113
स्तोत्र 114 / स्तोत्र 114
स्तोत्र 115 / स्तोत्र 115
स्तोत्र 116 / स्तोत्र 116
स्तोत्र 117 / स्तोत्र 117
स्तोत्र 118 / स्तोत्र 118
स्तोत्र 119 / स्तोत्र 119
स्तोत्र 120 / स्तोत्र 120
स्तोत्र 121 / स्तोत्र 121
स्तोत्र 122 / स्तोत्र 122
स्तोत्र 123 / स्तोत्र 123
स्तोत्र 124 / स्तोत्र 124
स्तोत्र 125 / स्तोत्र 125
स्तोत्र 126 / स्तोत्र 126
स्तोत्र 127 / स्तोत्र 127
स्तोत्र 128 / स्तोत्र 128
स्तोत्र 129 / स्तोत्र 129
स्तोत्र 130 / स्तोत्र 130
स्तोत्र 131 / स्तोत्र 131
स्तोत्र 132 / स्तोत्र 132
स्तोत्र 133 / स्तोत्र 133
स्तोत्र 134 / स्तोत्र 134
स्तोत्र 135 / स्तोत्र 135
स्तोत्र 136 / स्तोत्र 136
स्तोत्र 137 / स्तोत्र 137
स्तोत्र 138 / स्तोत्र 138
स्तोत्र 139 / स्तोत्र 139
स्तोत्र 140 / स्तोत्र 140
स्तोत्र 141 / स्तोत्र 141
स्तोत्र 142 / स्तोत्र 142
स्तोत्र 143 / स्तोत्र 143
स्तोत्र 144 / स्तोत्र 144
स्तोत्र 145 / स्तोत्र 145
स्तोत्र 146 / स्तोत्र 146
स्तोत्र 147 / स्तोत्र 147
स्तोत्र 148 / स्तोत्र 148
स्तोत्र 149 / स्तोत्र 149
स्तोत्र 150 / स्तोत्र 150