A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र ३४दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला तेव्हाचे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले.
परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!
परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्‍यांना काही उणे पडत नाही.
१०
तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
११
मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.
१२
सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण?
१३
तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर,
१४
वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.
१५
परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.
१६
वाईट करणार्‍यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.
१७
नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.
१८
परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.
१९
नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.
२०
त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही.
२१
दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार; नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात.
२२
परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.स्तोत्र ३४:1
स्तोत्र ३४:2
स्तोत्र ३४:3
स्तोत्र ३४:4
स्तोत्र ३४:5
स्तोत्र ३४:6
स्तोत्र ३४:7
स्तोत्र ३४:8
स्तोत्र ३४:9
स्तोत्र ३४:10
स्तोत्र ३४:11
स्तोत्र ३४:12
स्तोत्र ३४:13
स्तोत्र ३४:14
स्तोत्र ३४:15
स्तोत्र ३४:16
स्तोत्र ३४:17
स्तोत्र ३४:18
स्तोत्र ३४:19
स्तोत्र ३४:20
स्तोत्र ३४:21
स्तोत्र ३४:22


स्तोत्र 1 / स्तोत्र 1
स्तोत्र 2 / स्तोत्र 2
स्तोत्र 3 / स्तोत्र 3
स्तोत्र 4 / स्तोत्र 4
स्तोत्र 5 / स्तोत्र 5
स्तोत्र 6 / स्तोत्र 6
स्तोत्र 7 / स्तोत्र 7
स्तोत्र 8 / स्तोत्र 8
स्तोत्र 9 / स्तोत्र 9
स्तोत्र 10 / स्तोत्र 10
स्तोत्र 11 / स्तोत्र 11
स्तोत्र 12 / स्तोत्र 12
स्तोत्र 13 / स्तोत्र 13
स्तोत्र 14 / स्तोत्र 14
स्तोत्र 15 / स्तोत्र 15
स्तोत्र 16 / स्तोत्र 16
स्तोत्र 17 / स्तोत्र 17
स्तोत्र 18 / स्तोत्र 18
स्तोत्र 19 / स्तोत्र 19
स्तोत्र 20 / स्तोत्र 20
स्तोत्र 21 / स्तोत्र 21
स्तोत्र 22 / स्तोत्र 22
स्तोत्र 23 / स्तोत्र 23
स्तोत्र 24 / स्तोत्र 24
स्तोत्र 25 / स्तोत्र 25
स्तोत्र 26 / स्तोत्र 26
स्तोत्र 27 / स्तोत्र 27
स्तोत्र 28 / स्तोत्र 28
स्तोत्र 29 / स्तोत्र 29
स्तोत्र 30 / स्तोत्र 30
स्तोत्र 31 / स्तोत्र 31
स्तोत्र 32 / स्तोत्र 32
स्तोत्र 33 / स्तोत्र 33
स्तोत्र 34 / स्तोत्र 34
स्तोत्र 35 / स्तोत्र 35
स्तोत्र 36 / स्तोत्र 36
स्तोत्र 37 / स्तोत्र 37
स्तोत्र 38 / स्तोत्र 38
स्तोत्र 39 / स्तोत्र 39
स्तोत्र 40 / स्तोत्र 40
स्तोत्र 41 / स्तोत्र 41
स्तोत्र 42 / स्तोत्र 42
स्तोत्र 43 / स्तोत्र 43
स्तोत्र 44 / स्तोत्र 44
स्तोत्र 45 / स्तोत्र 45
स्तोत्र 46 / स्तोत्र 46
स्तोत्र 47 / स्तोत्र 47
स्तोत्र 48 / स्तोत्र 48
स्तोत्र 49 / स्तोत्र 49
स्तोत्र 50 / स्तोत्र 50
स्तोत्र 51 / स्तोत्र 51
स्तोत्र 52 / स्तोत्र 52
स्तोत्र 53 / स्तोत्र 53
स्तोत्र 54 / स्तोत्र 54
स्तोत्र 55 / स्तोत्र 55
स्तोत्र 56 / स्तोत्र 56
स्तोत्र 57 / स्तोत्र 57
स्तोत्र 58 / स्तोत्र 58
स्तोत्र 59 / स्तोत्र 59
स्तोत्र 60 / स्तोत्र 60
स्तोत्र 61 / स्तोत्र 61
स्तोत्र 62 / स्तोत्र 62
स्तोत्र 63 / स्तोत्र 63
स्तोत्र 64 / स्तोत्र 64
स्तोत्र 65 / स्तोत्र 65
स्तोत्र 66 / स्तोत्र 66
स्तोत्र 67 / स्तोत्र 67
स्तोत्र 68 / स्तोत्र 68
स्तोत्र 69 / स्तोत्र 69
स्तोत्र 70 / स्तोत्र 70
स्तोत्र 71 / स्तोत्र 71
स्तोत्र 72 / स्तोत्र 72
स्तोत्र 73 / स्तोत्र 73
स्तोत्र 74 / स्तोत्र 74
स्तोत्र 75 / स्तोत्र 75
स्तोत्र 76 / स्तोत्र 76
स्तोत्र 77 / स्तोत्र 77
स्तोत्र 78 / स्तोत्र 78
स्तोत्र 79 / स्तोत्र 79
स्तोत्र 80 / स्तोत्र 80
स्तोत्र 81 / स्तोत्र 81
स्तोत्र 82 / स्तोत्र 82
स्तोत्र 83 / स्तोत्र 83
स्तोत्र 84 / स्तोत्र 84
स्तोत्र 85 / स्तोत्र 85
स्तोत्र 86 / स्तोत्र 86
स्तोत्र 87 / स्तोत्र 87
स्तोत्र 88 / स्तोत्र 88
स्तोत्र 89 / स्तोत्र 89
स्तोत्र 90 / स्तोत्र 90
स्तोत्र 91 / स्तोत्र 91
स्तोत्र 92 / स्तोत्र 92
स्तोत्र 93 / स्तोत्र 93
स्तोत्र 94 / स्तोत्र 94
स्तोत्र 95 / स्तोत्र 95
स्तोत्र 96 / स्तोत्र 96
स्तोत्र 97 / स्तोत्र 97
स्तोत्र 98 / स्तोत्र 98
स्तोत्र 99 / स्तोत्र 99
स्तोत्र 100 / स्तोत्र 100
स्तोत्र 101 / स्तोत्र 101
स्तोत्र 102 / स्तोत्र 102
स्तोत्र 103 / स्तोत्र 103
स्तोत्र 104 / स्तोत्र 104
स्तोत्र 105 / स्तोत्र 105
स्तोत्र 106 / स्तोत्र 106
स्तोत्र 107 / स्तोत्र 107
स्तोत्र 108 / स्तोत्र 108
स्तोत्र 109 / स्तोत्र 109
स्तोत्र 110 / स्तोत्र 110
स्तोत्र 111 / स्तोत्र 111
स्तोत्र 112 / स्तोत्र 112
स्तोत्र 113 / स्तोत्र 113
स्तोत्र 114 / स्तोत्र 114
स्तोत्र 115 / स्तोत्र 115
स्तोत्र 116 / स्तोत्र 116
स्तोत्र 117 / स्तोत्र 117
स्तोत्र 118 / स्तोत्र 118
स्तोत्र 119 / स्तोत्र 119
स्तोत्र 120 / स्तोत्र 120
स्तोत्र 121 / स्तोत्र 121
स्तोत्र 122 / स्तोत्र 122
स्तोत्र 123 / स्तोत्र 123
स्तोत्र 124 / स्तोत्र 124
स्तोत्र 125 / स्तोत्र 125
स्तोत्र 126 / स्तोत्र 126
स्तोत्र 127 / स्तोत्र 127
स्तोत्र 128 / स्तोत्र 128
स्तोत्र 129 / स्तोत्र 129
स्तोत्र 130 / स्तोत्र 130
स्तोत्र 131 / स्तोत्र 131
स्तोत्र 132 / स्तोत्र 132
स्तोत्र 133 / स्तोत्र 133
स्तोत्र 134 / स्तोत्र 134
स्तोत्र 135 / स्तोत्र 135
स्तोत्र 136 / स्तोत्र 136
स्तोत्र 137 / स्तोत्र 137
स्तोत्र 138 / स्तोत्र 138
स्तोत्र 139 / स्तोत्र 139
स्तोत्र 140 / स्तोत्र 140
स्तोत्र 141 / स्तोत्र 141
स्तोत्र 142 / स्तोत्र 142
स्तोत्र 143 / स्तोत्र 143
स्तोत्र 144 / स्तोत्र 144
स्तोत्र 145 / स्तोत्र 145
स्तोत्र 146 / स्तोत्र 146
स्तोत्र 147 / स्तोत्र 147
स्तोत्र 148 / स्तोत्र 148
स्तोत्र 149 / स्तोत्र 149
स्तोत्र 150 / स्तोत्र 150