A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र ११९जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!
जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात.
तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.
तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही.
तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन.
मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस.
तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.
१०
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
११
मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.
१२
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव.
१३
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो.
१४
तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो.
१५
मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन.
१६
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
१७
आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन.
१८
तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
१९
मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस.
२०
तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे.
२१
गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत.
२२
निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो.
२३
अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो.
२४
तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.
२५
माझा जीव धुळीस मिळाला आहे; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
२६
मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिलेस; तू आपले नियम मला शिकव.
२७
तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
२८
माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे.
२९
असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे.
३०
मी सत्याचा मार्ग निवडला आहे; मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
३१
मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस.
३२
तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो.
३३
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन.
३४
मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.
३५
तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे.
३६
माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे.
३७
निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.
३८
तू आपले भय धरणार्‍यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर.
३९
मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
४०
पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.
४१
हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो;
४२
म्हणजे माझी निंदा करणार्‍याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे.
४३
तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे.
४४
म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन.
४५
मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.
४६
मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही.
४७
मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत.
४८
तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन.
४९
तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस.
५०
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते.
५१
गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही.
५२
हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे.
५३
दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो.
५४
माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत.
५५
हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे.
५६
मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे.
५७
परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्‍चय केला आहे.
५८
मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर.
५९
आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली.
६०
मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही.
६१
दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
६२
तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो.
६३
तुझे भय धरणार्‍या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्‍यांचा, मी सोबती आहे.
६४
हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव.
६५
हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेस.
६६
विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.
६७
मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे.
६८
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव.
६९
गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन.
७०
त्यांचे मन कठीण झाले आहे; मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे.
७१
मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.
७२
सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.
७३
तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले; तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे.
७४
तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे.
७५
हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.
७६
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.
७७
माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.
७८
गर्विष्ठ फजीत होवोत, कारण त्यांनी लबाडीने माझ्यावर अन्याय केला आहे; मी तर तुझ्या विधींचे मनन करीन.
७९
तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
८०
मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमांकडे पूर्णपणे लागू दे.
८१
तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो.
८२
तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे.
८३
धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
८४
तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत? माझ्या पाठीस लागणार्‍यांना तू कधी शासन करशील?
८५
गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेवल्या आहेत; ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत.
८६
तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत; ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत, तू मला साहाय्य कर.
८७
त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला; तरी मी तुझे विधी सोडले नाहीत.
८८
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
८९
हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे.
९०
तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे.
९१
तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत.
९२
तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता.
९३
तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस.
९४
मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.
९५
दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन.
९६
सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे.
९७
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.
९८
तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत.
९९
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो.
१००
वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो.
१०१
तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो.
१०२
तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस.
१०३
तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.
१०४
तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
१०५
तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
१०६
तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे.
१०७
मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
१०८
हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव.
१०९
मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
११०
दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही.
१११
तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.
११२
तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे.
११३
मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.
११४
तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो.
११५
अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
११६
तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस.
११७
मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन.
११८
तुझ्या नियमांपासून बहकणार्‍या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे.
११९
पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत.
१२०
तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो.
१२१
मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस.
१२२
तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस.
१२३
तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत.
१२४
तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव.
१२५
मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे.
१२६
परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे;
१२७
ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
१२८
ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.
१२९
तुझे निर्बंध आश्‍चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो.
१३०
तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.
१३१
मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.
१३२
तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्‍यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर.
१३३
तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस.
१३४
मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन.
१३५
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव.
१३६
लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.
१३७
हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत.
१३८
तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
१३९
माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत.
१४०
तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे;
१४१
मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
१४२
तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे.
१४३
संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
१४४
तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
१४५
मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन.
१४६
मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन.
१४७
उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो.
१४८
तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
१४९
तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे.
१५०
दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.
१५१
हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
१५२
तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत.
१५३
माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
१५४
माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
१५५
तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत.
१५६
हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे.
१५७
माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही.
१५८
विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.
१५९
तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे.
१६०
तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत.
१६१
अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते.
१६२
मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो.
१६३
मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.
१६४
तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो.
१६५
तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.
१६६
हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
१६७
माझा जीव तुझे निर्बंध पाळतो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत.
१६८
मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळतो; कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे.
१६९
हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे.
१७०
माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर.
१७१
तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
१७२
माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
१७३
तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत.
१७४
हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.
१७५
माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत.
१७६
हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.स्तोत्र ११९:1
स्तोत्र ११९:2
स्तोत्र ११९:3
स्तोत्र ११९:4
स्तोत्र ११९:5
स्तोत्र ११९:6
स्तोत्र ११९:7
स्तोत्र ११९:8
स्तोत्र ११९:9
स्तोत्र ११९:10
स्तोत्र ११९:11
स्तोत्र ११९:12
स्तोत्र ११९:13
स्तोत्र ११९:14
स्तोत्र ११९:15
स्तोत्र ११९:16
स्तोत्र ११९:17
स्तोत्र ११९:18
स्तोत्र ११९:19
स्तोत्र ११९:20
स्तोत्र ११९:21
स्तोत्र ११९:22
स्तोत्र ११९:23
स्तोत्र ११९:24
स्तोत्र ११९:25
स्तोत्र ११९:26
स्तोत्र ११९:27
स्तोत्र ११९:28
स्तोत्र ११९:29
स्तोत्र ११९:30
स्तोत्र ११९:31
स्तोत्र ११९:32
स्तोत्र ११९:33
स्तोत्र ११९:34
स्तोत्र ११९:35
स्तोत्र ११९:36
स्तोत्र ११९:37
स्तोत्र ११९:38
स्तोत्र ११९:39
स्तोत्र ११९:40
स्तोत्र ११९:41
स्तोत्र ११९:42
स्तोत्र ११९:43
स्तोत्र ११९:44
स्तोत्र ११९:45
स्तोत्र ११९:46
स्तोत्र ११९:47
स्तोत्र ११९:48
स्तोत्र ११९:49
स्तोत्र ११९:50
स्तोत्र ११९:51
स्तोत्र ११९:52
स्तोत्र ११९:53
स्तोत्र ११९:54
स्तोत्र ११९:55
स्तोत्र ११९:56
स्तोत्र ११९:57
स्तोत्र ११९:58
स्तोत्र ११९:59
स्तोत्र ११९:60
स्तोत्र ११९:61
स्तोत्र ११९:62
स्तोत्र ११९:63
स्तोत्र ११९:64
स्तोत्र ११९:65
स्तोत्र ११९:66
स्तोत्र ११९:67
स्तोत्र ११९:68
स्तोत्र ११९:69
स्तोत्र ११९:70
स्तोत्र ११९:71
स्तोत्र ११९:72
स्तोत्र ११९:73
स्तोत्र ११९:74
स्तोत्र ११९:75
स्तोत्र ११९:76
स्तोत्र ११९:77
स्तोत्र ११९:78
स्तोत्र ११९:79
स्तोत्र ११९:80
स्तोत्र ११९:81
स्तोत्र ११९:82
स्तोत्र ११९:83
स्तोत्र ११९:84
स्तोत्र ११९:85
स्तोत्र ११९:86
स्तोत्र ११९:87
स्तोत्र ११९:88
स्तोत्र ११९:89
स्तोत्र ११९:90
स्तोत्र ११९:91
स्तोत्र ११९:92
स्तोत्र ११९:93
स्तोत्र ११९:94
स्तोत्र ११९:95
स्तोत्र ११९:96
स्तोत्र ११९:97
स्तोत्र ११९:98
स्तोत्र ११९:99
स्तोत्र ११९:100
स्तोत्र ११९:101
स्तोत्र ११९:102
स्तोत्र ११९:103
स्तोत्र ११९:104
स्तोत्र ११९:105
स्तोत्र ११९:106
स्तोत्र ११९:107
स्तोत्र ११९:108
स्तोत्र ११९:109
स्तोत्र ११९:110
स्तोत्र ११९:111
स्तोत्र ११९:112
स्तोत्र ११९:113
स्तोत्र ११९:114
स्तोत्र ११९:115
स्तोत्र ११९:116
स्तोत्र ११९:117
स्तोत्र ११९:118
स्तोत्र ११९:119
स्तोत्र ११९:120
स्तोत्र ११९:121
स्तोत्र ११९:122
स्तोत्र ११९:123
स्तोत्र ११९:124
स्तोत्र ११९:125
स्तोत्र ११९:126
स्तोत्र ११९:127
स्तोत्र ११९:128
स्तोत्र ११९:129
स्तोत्र ११९:130
स्तोत्र ११९:131
स्तोत्र ११९:132
स्तोत्र ११९:133
स्तोत्र ११९:134
स्तोत्र ११९:135
स्तोत्र ११९:136
स्तोत्र ११९:137
स्तोत्र ११९:138
स्तोत्र ११९:139
स्तोत्र ११९:140
स्तोत्र ११९:141
स्तोत्र ११९:142
स्तोत्र ११९:143
स्तोत्र ११९:144
स्तोत्र ११९:145
स्तोत्र ११९:146
स्तोत्र ११९:147
स्तोत्र ११९:148
स्तोत्र ११९:149
स्तोत्र ११९:150
स्तोत्र ११९:151
स्तोत्र ११९:152
स्तोत्र ११९:153
स्तोत्र ११९:154
स्तोत्र ११९:155
स्तोत्र ११९:156
स्तोत्र ११९:157
स्तोत्र ११९:158
स्तोत्र ११९:159
स्तोत्र ११९:160
स्तोत्र ११९:161
स्तोत्र ११९:162
स्तोत्र ११९:163
स्तोत्र ११९:164
स्तोत्र ११९:165
स्तोत्र ११९:166
स्तोत्र ११९:167
स्तोत्र ११९:168
स्तोत्र ११९:169
स्तोत्र ११९:170
स्तोत्र ११९:171
स्तोत्र ११९:172
स्तोत्र ११९:173
स्तोत्र ११९:174
स्तोत्र ११९:175
स्तोत्र ११९:176


स्तोत्र 1 / स्तोत्र 1
स्तोत्र 2 / स्तोत्र 2
स्तोत्र 3 / स्तोत्र 3
स्तोत्र 4 / स्तोत्र 4
स्तोत्र 5 / स्तोत्र 5
स्तोत्र 6 / स्तोत्र 6
स्तोत्र 7 / स्तोत्र 7
स्तोत्र 8 / स्तोत्र 8
स्तोत्र 9 / स्तोत्र 9
स्तोत्र 10 / स्तोत्र 10
स्तोत्र 11 / स्तोत्र 11
स्तोत्र 12 / स्तोत्र 12
स्तोत्र 13 / स्तोत्र 13
स्तोत्र 14 / स्तोत्र 14
स्तोत्र 15 / स्तोत्र 15
स्तोत्र 16 / स्तोत्र 16
स्तोत्र 17 / स्तोत्र 17
स्तोत्र 18 / स्तोत्र 18
स्तोत्र 19 / स्तोत्र 19
स्तोत्र 20 / स्तोत्र 20
स्तोत्र 21 / स्तोत्र 21
स्तोत्र 22 / स्तोत्र 22
स्तोत्र 23 / स्तोत्र 23
स्तोत्र 24 / स्तोत्र 24
स्तोत्र 25 / स्तोत्र 25
स्तोत्र 26 / स्तोत्र 26
स्तोत्र 27 / स्तोत्र 27
स्तोत्र 28 / स्तोत्र 28
स्तोत्र 29 / स्तोत्र 29
स्तोत्र 30 / स्तोत्र 30
स्तोत्र 31 / स्तोत्र 31
स्तोत्र 32 / स्तोत्र 32
स्तोत्र 33 / स्तोत्र 33
स्तोत्र 34 / स्तोत्र 34
स्तोत्र 35 / स्तोत्र 35
स्तोत्र 36 / स्तोत्र 36
स्तोत्र 37 / स्तोत्र 37
स्तोत्र 38 / स्तोत्र 38
स्तोत्र 39 / स्तोत्र 39
स्तोत्र 40 / स्तोत्र 40
स्तोत्र 41 / स्तोत्र 41
स्तोत्र 42 / स्तोत्र 42
स्तोत्र 43 / स्तोत्र 43
स्तोत्र 44 / स्तोत्र 44
स्तोत्र 45 / स्तोत्र 45
स्तोत्र 46 / स्तोत्र 46
स्तोत्र 47 / स्तोत्र 47
स्तोत्र 48 / स्तोत्र 48
स्तोत्र 49 / स्तोत्र 49
स्तोत्र 50 / स्तोत्र 50
स्तोत्र 51 / स्तोत्र 51
स्तोत्र 52 / स्तोत्र 52
स्तोत्र 53 / स्तोत्र 53
स्तोत्र 54 / स्तोत्र 54
स्तोत्र 55 / स्तोत्र 55
स्तोत्र 56 / स्तोत्र 56
स्तोत्र 57 / स्तोत्र 57
स्तोत्र 58 / स्तोत्र 58
स्तोत्र 59 / स्तोत्र 59
स्तोत्र 60 / स्तोत्र 60
स्तोत्र 61 / स्तोत्र 61
स्तोत्र 62 / स्तोत्र 62
स्तोत्र 63 / स्तोत्र 63
स्तोत्र 64 / स्तोत्र 64
स्तोत्र 65 / स्तोत्र 65
स्तोत्र 66 / स्तोत्र 66
स्तोत्र 67 / स्तोत्र 67
स्तोत्र 68 / स्तोत्र 68
स्तोत्र 69 / स्तोत्र 69
स्तोत्र 70 / स्तोत्र 70
स्तोत्र 71 / स्तोत्र 71
स्तोत्र 72 / स्तोत्र 72
स्तोत्र 73 / स्तोत्र 73
स्तोत्र 74 / स्तोत्र 74
स्तोत्र 75 / स्तोत्र 75
स्तोत्र 76 / स्तोत्र 76
स्तोत्र 77 / स्तोत्र 77
स्तोत्र 78 / स्तोत्र 78
स्तोत्र 79 / स्तोत्र 79
स्तोत्र 80 / स्तोत्र 80
स्तोत्र 81 / स्तोत्र 81
स्तोत्र 82 / स्तोत्र 82
स्तोत्र 83 / स्तोत्र 83
स्तोत्र 84 / स्तोत्र 84
स्तोत्र 85 / स्तोत्र 85
स्तोत्र 86 / स्तोत्र 86
स्तोत्र 87 / स्तोत्र 87
स्तोत्र 88 / स्तोत्र 88
स्तोत्र 89 / स्तोत्र 89
स्तोत्र 90 / स्तोत्र 90
स्तोत्र 91 / स्तोत्र 91
स्तोत्र 92 / स्तोत्र 92
स्तोत्र 93 / स्तोत्र 93
स्तोत्र 94 / स्तोत्र 94
स्तोत्र 95 / स्तोत्र 95
स्तोत्र 96 / स्तोत्र 96
स्तोत्र 97 / स्तोत्र 97
स्तोत्र 98 / स्तोत्र 98
स्तोत्र 99 / स्तोत्र 99
स्तोत्र 100 / स्तोत्र 100
स्तोत्र 101 / स्तोत्र 101
स्तोत्र 102 / स्तोत्र 102
स्तोत्र 103 / स्तोत्र 103
स्तोत्र 104 / स्तोत्र 104
स्तोत्र 105 / स्तोत्र 105
स्तोत्र 106 / स्तोत्र 106
स्तोत्र 107 / स्तोत्र 107
स्तोत्र 108 / स्तोत्र 108
स्तोत्र 109 / स्तोत्र 109
स्तोत्र 110 / स्तोत्र 110
स्तोत्र 111 / स्तोत्र 111
स्तोत्र 112 / स्तोत्र 112
स्तोत्र 113 / स्तोत्र 113
स्तोत्र 114 / स्तोत्र 114
स्तोत्र 115 / स्तोत्र 115
स्तोत्र 116 / स्तोत्र 116
स्तोत्र 117 / स्तोत्र 117
स्तोत्र 118 / स्तोत्र 118
स्तोत्र 119 / स्तोत्र 119
स्तोत्र 120 / स्तोत्र 120
स्तोत्र 121 / स्तोत्र 121
स्तोत्र 122 / स्तोत्र 122
स्तोत्र 123 / स्तोत्र 123
स्तोत्र 124 / स्तोत्र 124
स्तोत्र 125 / स्तोत्र 125
स्तोत्र 126 / स्तोत्र 126
स्तोत्र 127 / स्तोत्र 127
स्तोत्र 128 / स्तोत्र 128
स्तोत्र 129 / स्तोत्र 129
स्तोत्र 130 / स्तोत्र 130
स्तोत्र 131 / स्तोत्र 131
स्तोत्र 132 / स्तोत्र 132
स्तोत्र 133 / स्तोत्र 133
स्तोत्र 134 / स्तोत्र 134
स्तोत्र 135 / स्तोत्र 135
स्तोत्र 136 / स्तोत्र 136
स्तोत्र 137 / स्तोत्र 137
स्तोत्र 138 / स्तोत्र 138
स्तोत्र 139 / स्तोत्र 139
स्तोत्र 140 / स्तोत्र 140
स्तोत्र 141 / स्तोत्र 141
स्तोत्र 142 / स्तोत्र 142
स्तोत्र 143 / स्तोत्र 143
स्तोत्र 144 / स्तोत्र 144
स्तोत्र 145 / स्तोत्र 145
स्तोत्र 146 / स्तोत्र 146
स्तोत्र 147 / स्तोत्र 147
स्तोत्र 148 / स्तोत्र 148
स्तोत्र 149 / स्तोत्र 149
स्तोत्र 150 / स्तोत्र 150