A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र १०७परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे.
परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे,
आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे.
काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही.
ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठायी व्याकूळ झाला
तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.
वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;
कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले; भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले.
१०
काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते,
११
कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता.
१२
त्यांना कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरवला; ते पतन पावले, त्यांना साहाय्य करण्यास कोणी नव्हता;
१३
तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.
१४
त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली.
१५
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;
१६
कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.
१७
मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते.
१८
त्यांच्या जिवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो; ते मृत्युद्वाराजवळ पोहचतात.
१९
ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशांतून मुक्त करतो.
२०
तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो.
२१
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
२२
ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.
२३
जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करतात, महासागरात उद्योगधंदा करतात,
२४
ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये, भरसमुद्रात पाहतात.
२५
तो आज्ञा करून वादळ उठवतो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात.
२६
ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात; क्लेशाने त्यांच्या जिवाचे पाणीपाणी होते.
२७
ते मद्यप्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात, त्यांची मती अगदी कुंठित होते.
२८
ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो.
२९
तो वादळ शमवतो, तेव्हा लाटा शांत होतात.
३०
त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात, आणि तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास नेतो.
३१
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
३२
लोकांच्या मंडळीत ते त्याची थोरवी गावोत, आणि वडिलांच्या बैठकीत त्याचे स्तवन करोत.
३३
तो नद्यांचे रान करतो, पाण्याच्या झर्‍यांच्या जागी शुष्क भूमी करतो.
३४
सुपीक जमिनीची तेथे राहणार्‍यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करतो.
३५
तो वाळवंटाचे तळे करतो, व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो.
३६
तेथे तो भुकेल्यांना वसवतो, ते वस्तीसाठी नगर तयार करतात;
३७
ते शेते पेरतात, व द्राक्षांचे मळे लावतात आणि त्यांना पीक मिळते.
३८
तो त्यांना आशीर्वाद देतो, आणि त्यांची फार वाढ होते; त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही.
३९
पुढे जुलूम, विपत्ती व दुःख ह्यांच्यामुळे ते कमी होतात व खालावतात.
४०
तेव्हा तो अधिपतींवर अपमानाचा मारा करतो; त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकण्यास लावतो.
४१
पण दरिद्र्यांस क्लेशांतून मुक्त करून तो उच्च स्थानी ठेवतो, त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवतो.
४२
हे पाहून सरळ मनाचे लोक हर्ष पावतात; सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते. जो कोणी बुद्धिमान असेल त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी.स्तोत्र १०७:1
स्तोत्र १०७:2
स्तोत्र १०७:3
स्तोत्र १०७:4
स्तोत्र १०७:5
स्तोत्र १०७:6
स्तोत्र १०७:7
स्तोत्र १०७:8
स्तोत्र १०७:9
स्तोत्र १०७:10
स्तोत्र १०७:11
स्तोत्र १०७:12
स्तोत्र १०७:13
स्तोत्र १०७:14
स्तोत्र १०७:15
स्तोत्र १०७:16
स्तोत्र १०७:17
स्तोत्र १०७:18
स्तोत्र १०७:19
स्तोत्र १०७:20
स्तोत्र १०७:21
स्तोत्र १०७:22
स्तोत्र १०७:23
स्तोत्र १०७:24
स्तोत्र १०७:25
स्तोत्र १०७:26
स्तोत्र १०७:27
स्तोत्र १०७:28
स्तोत्र १०७:29
स्तोत्र १०७:30
स्तोत्र १०७:31
स्तोत्र १०७:32
स्तोत्र १०७:33
स्तोत्र १०७:34
स्तोत्र १०७:35
स्तोत्र १०७:36
स्तोत्र १०७:37
स्तोत्र १०७:38
स्तोत्र १०७:39
स्तोत्र १०७:40
स्तोत्र १०७:41
स्तोत्र १०७:42


स्तोत्र 1 / स्तोत्र 1
स्तोत्र 2 / स्तोत्र 2
स्तोत्र 3 / स्तोत्र 3
स्तोत्र 4 / स्तोत्र 4
स्तोत्र 5 / स्तोत्र 5
स्तोत्र 6 / स्तोत्र 6
स्तोत्र 7 / स्तोत्र 7
स्तोत्र 8 / स्तोत्र 8
स्तोत्र 9 / स्तोत्र 9
स्तोत्र 10 / स्तोत्र 10
स्तोत्र 11 / स्तोत्र 11
स्तोत्र 12 / स्तोत्र 12
स्तोत्र 13 / स्तोत्र 13
स्तोत्र 14 / स्तोत्र 14
स्तोत्र 15 / स्तोत्र 15
स्तोत्र 16 / स्तोत्र 16
स्तोत्र 17 / स्तोत्र 17
स्तोत्र 18 / स्तोत्र 18
स्तोत्र 19 / स्तोत्र 19
स्तोत्र 20 / स्तोत्र 20
स्तोत्र 21 / स्तोत्र 21
स्तोत्र 22 / स्तोत्र 22
स्तोत्र 23 / स्तोत्र 23
स्तोत्र 24 / स्तोत्र 24
स्तोत्र 25 / स्तोत्र 25
स्तोत्र 26 / स्तोत्र 26
स्तोत्र 27 / स्तोत्र 27
स्तोत्र 28 / स्तोत्र 28
स्तोत्र 29 / स्तोत्र 29
स्तोत्र 30 / स्तोत्र 30
स्तोत्र 31 / स्तोत्र 31
स्तोत्र 32 / स्तोत्र 32
स्तोत्र 33 / स्तोत्र 33
स्तोत्र 34 / स्तोत्र 34
स्तोत्र 35 / स्तोत्र 35
स्तोत्र 36 / स्तोत्र 36
स्तोत्र 37 / स्तोत्र 37
स्तोत्र 38 / स्तोत्र 38
स्तोत्र 39 / स्तोत्र 39
स्तोत्र 40 / स्तोत्र 40
स्तोत्र 41 / स्तोत्र 41
स्तोत्र 42 / स्तोत्र 42
स्तोत्र 43 / स्तोत्र 43
स्तोत्र 44 / स्तोत्र 44
स्तोत्र 45 / स्तोत्र 45
स्तोत्र 46 / स्तोत्र 46
स्तोत्र 47 / स्तोत्र 47
स्तोत्र 48 / स्तोत्र 48
स्तोत्र 49 / स्तोत्र 49
स्तोत्र 50 / स्तोत्र 50
स्तोत्र 51 / स्तोत्र 51
स्तोत्र 52 / स्तोत्र 52
स्तोत्र 53 / स्तोत्र 53
स्तोत्र 54 / स्तोत्र 54
स्तोत्र 55 / स्तोत्र 55
स्तोत्र 56 / स्तोत्र 56
स्तोत्र 57 / स्तोत्र 57
स्तोत्र 58 / स्तोत्र 58
स्तोत्र 59 / स्तोत्र 59
स्तोत्र 60 / स्तोत्र 60
स्तोत्र 61 / स्तोत्र 61
स्तोत्र 62 / स्तोत्र 62
स्तोत्र 63 / स्तोत्र 63
स्तोत्र 64 / स्तोत्र 64
स्तोत्र 65 / स्तोत्र 65
स्तोत्र 66 / स्तोत्र 66
स्तोत्र 67 / स्तोत्र 67
स्तोत्र 68 / स्तोत्र 68
स्तोत्र 69 / स्तोत्र 69
स्तोत्र 70 / स्तोत्र 70
स्तोत्र 71 / स्तोत्र 71
स्तोत्र 72 / स्तोत्र 72
स्तोत्र 73 / स्तोत्र 73
स्तोत्र 74 / स्तोत्र 74
स्तोत्र 75 / स्तोत्र 75
स्तोत्र 76 / स्तोत्र 76
स्तोत्र 77 / स्तोत्र 77
स्तोत्र 78 / स्तोत्र 78
स्तोत्र 79 / स्तोत्र 79
स्तोत्र 80 / स्तोत्र 80
स्तोत्र 81 / स्तोत्र 81
स्तोत्र 82 / स्तोत्र 82
स्तोत्र 83 / स्तोत्र 83
स्तोत्र 84 / स्तोत्र 84
स्तोत्र 85 / स्तोत्र 85
स्तोत्र 86 / स्तोत्र 86
स्तोत्र 87 / स्तोत्र 87
स्तोत्र 88 / स्तोत्र 88
स्तोत्र 89 / स्तोत्र 89
स्तोत्र 90 / स्तोत्र 90
स्तोत्र 91 / स्तोत्र 91
स्तोत्र 92 / स्तोत्र 92
स्तोत्र 93 / स्तोत्र 93
स्तोत्र 94 / स्तोत्र 94
स्तोत्र 95 / स्तोत्र 95
स्तोत्र 96 / स्तोत्र 96
स्तोत्र 97 / स्तोत्र 97
स्तोत्र 98 / स्तोत्र 98
स्तोत्र 99 / स्तोत्र 99
स्तोत्र 100 / स्तोत्र 100
स्तोत्र 101 / स्तोत्र 101
स्तोत्र 102 / स्तोत्र 102
स्तोत्र 103 / स्तोत्र 103
स्तोत्र 104 / स्तोत्र 104
स्तोत्र 105 / स्तोत्र 105
स्तोत्र 106 / स्तोत्र 106
स्तोत्र 107 / स्तोत्र 107
स्तोत्र 108 / स्तोत्र 108
स्तोत्र 109 / स्तोत्र 109
स्तोत्र 110 / स्तोत्र 110
स्तोत्र 111 / स्तोत्र 111
स्तोत्र 112 / स्तोत्र 112
स्तोत्र 113 / स्तोत्र 113
स्तोत्र 114 / स्तोत्र 114
स्तोत्र 115 / स्तोत्र 115
स्तोत्र 116 / स्तोत्र 116
स्तोत्र 117 / स्तोत्र 117
स्तोत्र 118 / स्तोत्र 118
स्तोत्र 119 / स्तोत्र 119
स्तोत्र 120 / स्तोत्र 120
स्तोत्र 121 / स्तोत्र 121
स्तोत्र 122 / स्तोत्र 122
स्तोत्र 123 / स्तोत्र 123
स्तोत्र 124 / स्तोत्र 124
स्तोत्र 125 / स्तोत्र 125
स्तोत्र 126 / स्तोत्र 126
स्तोत्र 127 / स्तोत्र 127
स्तोत्र 128 / स्तोत्र 128
स्तोत्र 129 / स्तोत्र 129
स्तोत्र 130 / स्तोत्र 130
स्तोत्र 131 / स्तोत्र 131
स्तोत्र 132 / स्तोत्र 132
स्तोत्र 133 / स्तोत्र 133
स्तोत्र 134 / स्तोत्र 134
स्तोत्र 135 / स्तोत्र 135
स्तोत्र 136 / स्तोत्र 136
स्तोत्र 137 / स्तोत्र 137
स्तोत्र 138 / स्तोत्र 138
स्तोत्र 139 / स्तोत्र 139
स्तोत्र 140 / स्तोत्र 140
स्तोत्र 141 / स्तोत्र 141
स्तोत्र 142 / स्तोत्र 142
स्तोत्र 143 / स्तोत्र 143
स्तोत्र 144 / स्तोत्र 144
स्तोत्र 145 / स्तोत्र 145
स्तोत्र 146 / स्तोत्र 146
स्तोत्र 147 / स्तोत्र 147
स्तोत्र 148 / स्तोत्र 148
स्तोत्र 149 / स्तोत्र 149
स्तोत्र 150 / स्तोत्र 150