१ |
मग ईयोब परमेश्वराला म्हणाला, |
२ |
“तुला सर्वकाही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे. |
३ |
अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. ह्यास्तव मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. |
४ |
आता ऐक; मी बोलतो! मी तुला विचारतो, तू मला बोध कर, |
५ |
मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे; |
६ |
म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.” |
७ |
परमेश्वराचे ईयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलीफज तेमानीला म्हणाला, “तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही. |
८ |
तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील; कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन; म्हणजे मग माझा सेवक ईयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हांला मिळणार नाही.” |
९ |
हे ऐकून अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी ह्यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; आणि परमेश्वराने ईयोबावर अनुग्रह केला. |
१० |
ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. |
११ |
मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले; आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले; प्रत्येकाने त्याला एक कसीटा1 व एक सोन्याची अंगठी दिली. |
१२ |
परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. |
१३ |
त्याला आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या. |
१४ |
एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे नाव कसीया व तिसरीचे केरेनहप्पूक अशी त्यांची नावे त्याने ठेवली. |
१५ |
ईयोबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या; त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावांप्रमाणेच वतन वाटून दिले. |
१६ |
त्यानंतर ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला; आणि त्याने चार पिढ्यांपर्यंत आपले पुत्रपौत्र पाहिले. |
१७ |
नंतर ईयोब वृद्ध व पुर्या वयाचा होऊन मरण पावला.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जॉब ४२:1 |
जॉब ४२:2 |
जॉब ४२:3 |
जॉब ४२:4 |
जॉब ४२:5 |
जॉब ४२:6 |
जॉब ४२:7 |
जॉब ४२:8 |
जॉब ४२:9 |
जॉब ४२:10 |
जॉब ४२:11 |
जॉब ४२:12 |
जॉब ४२:13 |
जॉब ४२:14 |
जॉब ४२:15 |
जॉब ४२:16 |
जॉब ४२:17 |
|
|
|
|
|
|
जॉब 1 / जॉब 1 |
जॉब 2 / जॉब 2 |
जॉब 3 / जॉब 3 |
जॉब 4 / जॉब 4 |
जॉब 5 / जॉब 5 |
जॉब 6 / जॉब 6 |
जॉब 7 / जॉब 7 |
जॉब 8 / जॉब 8 |
जॉब 9 / जॉब 9 |
जॉब 10 / जॉब 10 |
जॉब 11 / जॉब 11 |
जॉब 12 / जॉब 12 |
जॉब 13 / जॉब 13 |
जॉब 14 / जॉब 14 |
जॉब 15 / जॉब 15 |
जॉब 16 / जॉब 16 |
जॉब 17 / जॉब 17 |
जॉब 18 / जॉब 18 |
जॉब 19 / जॉब 19 |
जॉब 20 / जॉब 20 |
जॉब 21 / जॉब 21 |
जॉब 22 / जॉब 22 |
जॉब 23 / जॉब 23 |
जॉब 24 / जॉब 24 |
जॉब 25 / जॉब 25 |
जॉब 26 / जॉब 26 |
जॉब 27 / जॉब 27 |
जॉब 28 / जॉब 28 |
जॉब 29 / जॉब 29 |
जॉब 30 / जॉब 30 |
जॉब 31 / जॉब 31 |
जॉब 32 / जॉब 32 |
जॉब 33 / जॉब 33 |
जॉब 34 / जॉब 34 |
जॉब 35 / जॉब 35 |
जॉब 36 / जॉब 36 |
जॉब 37 / जॉब 37 |
जॉब 38 / जॉब 38 |
जॉब 39 / जॉब 39 |
जॉब 40 / जॉब 40 |
जॉब 41 / जॉब 41 |
जॉब 42 / जॉब 42 |