१ |
पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय? |
२ |
त्यांचे महिने केव्हा भरतात ह्याचे गणित तुला करता येते काय? त्यांचा प्रसवकाळ तुला कळतो काय? |
३ |
त्या ओणवून आपली पिले वितात; त्या प्रसूतिवेदनांपासून मुक्त होतात. |
४ |
त्यांची पिले धष्टपुष्ट होऊन रानात वाढतात; ती त्यांना सोडून जातात, त्यांच्याकडे परत येत नाहीत. |
५ |
रानगाढवाला कोणी स्वैर फिरू दिले? त्याला बंधमुक्त कोणी केले? |
६ |
त्याचे निवासस्थान मी रुक्ष मैदानातील क्षारभूमी केले आहे. |
७ |
नगरातील गजबजीचा त्याला तिटकारा असतो; हाकणार्याचा शब्द त्याच्या कानी पडत नाही. |
८ |
डोंगरावर जे काही सापडेल ते त्याचा चारा; तो हरतर्हेची हिरवळ शोधत फिरतो. |
९ |
रानबैल तुझी सेवा करण्यास मान्य होईल काय? तो रात्रीचा गव्हाणीत राहील काय? |
१० |
त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालवशील काय? तो तुझ्यामागून खोर्यातील जमीन कोळपील काय? |
११ |
त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्याच्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्याच्यावर आपले काम सोपवशील काय? |
१२ |
तो तुझे धान्य घरी आणील व तुझ्या खळ्यातले धान्य जमा करील असा त्याचा तुला भरवसा आहे काय? |
१३ |
शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात; तिचे पिसारे व पर माया करण्याच्या कामी पडतात काय? |
१४ |
ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते, ती धुळीत उबवते. |
१५ |
ती कोणाच्या पायाखाली चिरडतील, किंवा कोणी वनपशू ती तुडवील, ह्याचे तिला भान नसते. |
१६ |
ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच; आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्चिंत राहते; |
१७ |
कारण देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्न केले आहे; तिच्या वाट्याला अक्कल आली नाही. |
१८ |
ती आपली मान उंच उभारून आपले पंख फडफडवत धावते, तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते. |
१९ |
घोड्याला बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणार्या आयाळीचे पांघरूण तू घालतोस काय? |
२० |
त्याला पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो. |
२१ |
तो मैदानात टापा मारतो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवतो, तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो. |
२२ |
तो भीतीस हसतो, व घाबरत नाही, तलवारीपासून मागे हटत नाही. |
२३ |
भाता, चमकणारा भाला व बरची ही त्याच्यावर आपटून खणखणतात. |
२४ |
तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो; रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो. |
२५ |
रणशिंग जेव्हाजेव्हा वाजते तेव्हा तो ‘अहा!’ म्हणतो; लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द ह्यांचा वास तो दुरून काढतो. |
२६ |
ससाणा तुझ्या चातुर्याने उडतो आणि दक्षिणेकडे उडून जाण्यास तो पंख फडफडवतो काय? |
२७ |
गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय? |
२८ |
तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करतो. |
२९ |
तेथून तो आपले भक्ष्य निरखतो; त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते. |
३० |
त्याची पिले रक्त चाखतात; जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जॉब ३९:1 |
जॉब ३९:2 |
जॉब ३९:3 |
जॉब ३९:4 |
जॉब ३९:5 |
जॉब ३९:6 |
जॉब ३९:7 |
जॉब ३९:8 |
जॉब ३९:9 |
जॉब ३९:10 |
जॉब ३९:11 |
जॉब ३९:12 |
जॉब ३९:13 |
जॉब ३९:14 |
जॉब ३९:15 |
जॉब ३९:16 |
जॉब ३९:17 |
जॉब ३९:18 |
जॉब ३९:19 |
जॉब ३९:20 |
जॉब ३९:21 |
जॉब ३९:22 |
जॉब ३९:23 |
जॉब ३९:24 |
जॉब ३९:25 |
जॉब ३९:26 |
जॉब ३९:27 |
जॉब ३९:28 |
जॉब ३९:29 |
जॉब ३९:30 |
|
|
|
|
|
|
जॉब 1 / जॉब 1 |
जॉब 2 / जॉब 2 |
जॉब 3 / जॉब 3 |
जॉब 4 / जॉब 4 |
जॉब 5 / जॉब 5 |
जॉब 6 / जॉब 6 |
जॉब 7 / जॉब 7 |
जॉब 8 / जॉब 8 |
जॉब 9 / जॉब 9 |
जॉब 10 / जॉब 10 |
जॉब 11 / जॉब 11 |
जॉब 12 / जॉब 12 |
जॉब 13 / जॉब 13 |
जॉब 14 / जॉब 14 |
जॉब 15 / जॉब 15 |
जॉब 16 / जॉब 16 |
जॉब 17 / जॉब 17 |
जॉब 18 / जॉब 18 |
जॉब 19 / जॉब 19 |
जॉब 20 / जॉब 20 |
जॉब 21 / जॉब 21 |
जॉब 22 / जॉब 22 |
जॉब 23 / जॉब 23 |
जॉब 24 / जॉब 24 |
जॉब 25 / जॉब 25 |
जॉब 26 / जॉब 26 |
जॉब 27 / जॉब 27 |
जॉब 28 / जॉब 28 |
जॉब 29 / जॉब 29 |
जॉब 30 / जॉब 30 |
जॉब 31 / जॉब 31 |
जॉब 32 / जॉब 32 |
जॉब 33 / जॉब 33 |
जॉब 34 / जॉब 34 |
जॉब 35 / जॉब 35 |
जॉब 36 / जॉब 36 |
जॉब 37 / जॉब 37 |
जॉब 38 / जॉब 38 |
जॉब 39 / जॉब 39 |
जॉब 40 / जॉब 40 |
जॉब 41 / जॉब 41 |
जॉब 42 / जॉब 42 |