A A A A A
मराठी बायबल 2015

जॉब २९

ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला,
“पूर्वीचे महिने मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसांत देव माझे रक्षण करीत असे.
त्याचा दीप माझ्या शिरावर प्रकाशत असे; व त्याच्या तेजाने मी अंधकारात चालत असे;
त्या काळी मी भर उमेदीत होतो; देवाचा सहवास मला माझ्या डेर्‍यात घडे;
सर्वसमर्थ त्या काळी माझ्यासन्निध असे; माझी मुलेबाळे माझ्या सभोवती असत;
दह्यालोण्यात माझी पावले भिजत; खडकातून तेलाचे प्रवाह माझ्यासाठी निघत.
मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी,
तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत;
सरदार बोलायचे थांबत व तोंडावर हात ठेवत;
१०
अमीरउमराव स्तब्ध राहत; त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही.
११
कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे; कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो माझ्याविषयी ग्वाही देई;
१२
कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित ह्यांचा मी उद्धार करी.
१३
नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी.
१४
नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे.
१५
मी आंधळ्याला नेत्र होई; लंगड्याला पाय होई.
१६
मी लाचारांचा पिता असे; अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई.
१७
मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.
१८
तेव्हा मी म्हणे की, ‘माझ्या घरकुलातच राहून मला मरण येईल, व माझे दिवस वाळूच्या कणांप्रमाणे1 बहुगुणित होतील;
१९
माझे मूळ पाण्याजवळ पसरेल; माझ्या फांदीवर रात्रभर दहिवर राहील.
२०
माझे वैभव माझ्या ठायी जसेच्या तसेच टवटवीत राहील;’ माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील.’
२१
लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत, माझा निर्णय ऐकायला ते स्तब्ध राहत.
२२
माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत; माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई.
२३
लोक माझ्या बोलण्याची पावसाप्रमाणे वाट पाहत; जसे काय अखेरच्या पावसासाठी तोंड पसरून ते अपेक्षा करीत.
२४
ते निराश झाले असता मी त्यांच्याकडे हास्यवदन करून पाही; त्यांना माझे मुखतेज उतरवता येत नसे.
२५
मी त्यांचा मार्गदर्शक होई व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसे; सैन्यात जसा राजा, शोकग्रस्तांत जसा समाधान करणारा, तसा मी त्यांच्यामध्ये असे.”
जॉब २९:1
जॉब २९:2
जॉब २९:3
जॉब २९:4
जॉब २९:5
जॉब २९:6
जॉब २९:7
जॉब २९:8
जॉब २९:9
जॉब २९:10
जॉब २९:11
जॉब २९:12
जॉब २९:13
जॉब २९:14
जॉब २९:15
जॉब २९:16
जॉब २९:17
जॉब २९:18
जॉब २९:19
जॉब २९:20
जॉब २९:21
जॉब २९:22
जॉब २९:23
जॉब २९:24
जॉब २९:25
जॉब 1 / जॉब 1
जॉब 2 / जॉब 2
जॉब 3 / जॉब 3
जॉब 4 / जॉब 4
जॉब 5 / जॉब 5
जॉब 6 / जॉब 6
जॉब 7 / जॉब 7
जॉब 8 / जॉब 8
जॉब 9 / जॉब 9
जॉब 10 / जॉब 10
जॉब 11 / जॉब 11
जॉब 12 / जॉब 12
जॉब 13 / जॉब 13
जॉब 14 / जॉब 14
जॉब 15 / जॉब 15
जॉब 16 / जॉब 16
जॉब 17 / जॉब 17
जॉब 18 / जॉब 18
जॉब 19 / जॉब 19
जॉब 20 / जॉब 20
जॉब 21 / जॉब 21
जॉब 22 / जॉब 22
जॉब 23 / जॉब 23
जॉब 24 / जॉब 24
जॉब 25 / जॉब 25
जॉब 26 / जॉब 26
जॉब 27 / जॉब 27
जॉब 28 / जॉब 28
जॉब 29 / जॉब 29
जॉब 30 / जॉब 30
जॉब 31 / जॉब 31
जॉब 32 / जॉब 32
जॉब 33 / जॉब 33
जॉब 34 / जॉब 34
जॉब 35 / जॉब 35
जॉब 36 / जॉब 36
जॉब 37 / जॉब 37
जॉब 38 / जॉब 38
जॉब 39 / जॉब 39
जॉब 40 / जॉब 40
जॉब 41 / जॉब 41
जॉब 42 / जॉब 42