१ |
मग ईयोबाने प्रत्युत्तर केले, |
२ |
“ऐका, अहो, माझे भाषण लक्षपूर्वक ऐका; एवढ्यानेच माझे तुमच्याकडून सांत्वन होईल. |
३ |
मला बोलू द्या म्हणजे मी बोलतो; माझे बोलणे संपल्यावर खुशाल माझा उपहास करा. |
४ |
माझे गार्हाणे मनुष्यासंबंधाने आहे काय? मी अधीर का नसावे? |
५ |
माझ्याकडे चित्त देऊन विस्मित व्हा. आपल्या तोंडाला हात लावा. |
६ |
मला आठवण झाली की मी घाबरा होतो; माझ्या देहाला कंप सुटतो. |
७ |
दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात? |
८ |
त्यांच्यासमक्ष त्यांच्याबरोबर, त्यांच्या डोळ्यांसमोर, त्यांची मुलेबाळे नांदतात. |
९ |
त्यांची घरे शांतीत निर्भय असतात, देवाचा दंड त्यांच्यावर पडत नाही. |
१० |
त्यांचा बैल प्रजनन करतो; तो निष्फळ होत नाही; त्यांची गाय विते, गाभटत नाही. |
११ |
ते आपल्या मुलांचा थवा बाहेर सोडतात, त्यांची मुले नाचतात व बागडतात; |
१२ |
ते डफ व वीणा ह्यांवर गातात; ते पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात. |
१३ |
ते आपले दिवस सुखासमाधानात घालवतात, व सहज क्षणात अधोलोकी जातात. |
१४ |
हेच लोक देवाला म्हणत असत की, ‘आमच्यापासून दूर हो; तुझ्या मार्गाची ओळख आम्हांला नको; |
१५ |
सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विनवणी करून आम्हांला लाभ तो काय?’ |
१६ |
पाहा, त्यांची समृद्धी त्यांच्या हाती नाही; दुष्ट लोकांचे विचार माझ्यापासून दूर असोत. |
१७ |
दुष्टांचा दीप मालवला व त्यांच्यावर विपत्ती आली; देवाने त्यांच्यावर कोप करून त्यांना दुःखाचे वाटेकरी केले; असे कितीदा होते? |
१८ |
वार्याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते? |
१९ |
तुम्ही म्हणाल की, ‘देव दुर्जनाच्या पापाचे प्रतिफळ त्याच्या मुलांसाठी राखून ठेवतो,’ तर त्याने त्यालाच त्याचे प्रतिफळ द्यावे म्हणजे त्याला त्याचा अनुभव घडेल. |
२० |
तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो; तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो. |
२१ |
कारण त्याच्या आयुष्याची1 मुदत खुंटली तर त्याच्यामागे त्याला आपल्या घराण्याची काय पर्वा राहील? |
२२ |
स्वर्गातल्यांचाही न्याय करणार्या देवाला कोणी ज्ञान शिकवील काय? |
२३ |
कोणी शक्तीच्या भरात, सुखासमाधानात असता मरतो. |
२४ |
त्याच्या चरव्या दुधाने भरलेल्या असतात. त्याच्या हाडांतील मज्जा रसरशीत असते. |
२५ |
कोणी सौख्याचा अनुभव न घेता जिवाच्या कष्टदशेत मरतो. |
२६ |
ते दोघेही बरोबर मातीस मिळतात. कीटक त्यांना व्यापतात. |
२७ |
पाहा, तुमचे मनोदय, माझ्या अहिताच्या तुमच्या योजना मला ठाऊक आहेत. |
२८ |
तुम्ही म्हणता, ‘सरदाराचा वाडा कोठे राहिला आहे? दुष्ट राहत असत तो डेरा कोठे टिकला आहे?’ |
२९ |
तुम्ही देशाटन केलेल्यांना विचारले नाही काय? त्यांचे दाखले तुम्हांला पटले नाहीत काय? |
३० |
असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात. |
३१ |
त्याच्या वर्तनाविषयी त्याच्या तोंडावर कोण बोलेल? त्याच्या कृतकर्माचे प्रतिफळ त्याला कोण देईल? |
३२ |
त्याला कबरेत पोचवतील; त्याच्या थडग्याची रखवाली करतील; |
३३ |
दरीतली ढेकळे त्याला गोड लागतील; जसे पूर्वीचे असंख्य लोक गेले तसे सर्व लोक त्याच्या मागून जातील. |
३४ |
तुमच्या उत्तरात दगा भरलेला आहे, तर तुम्ही माझे व्यर्थ सांत्वन का करता?”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जॉब २१:1 |
जॉब २१:2 |
जॉब २१:3 |
जॉब २१:4 |
जॉब २१:5 |
जॉब २१:6 |
जॉब २१:7 |
जॉब २१:8 |
जॉब २१:9 |
जॉब २१:10 |
जॉब २१:11 |
जॉब २१:12 |
जॉब २१:13 |
जॉब २१:14 |
जॉब २१:15 |
जॉब २१:16 |
जॉब २१:17 |
जॉब २१:18 |
जॉब २१:19 |
जॉब २१:20 |
जॉब २१:21 |
जॉब २१:22 |
जॉब २१:23 |
जॉब २१:24 |
जॉब २१:25 |
जॉब २१:26 |
जॉब २१:27 |
जॉब २१:28 |
जॉब २१:29 |
जॉब २१:30 |
जॉब २१:31 |
जॉब २१:32 |
जॉब २१:33 |
जॉब २१:34 |
|
|
|
|
|
|
जॉब 1 / जॉब 1 |
जॉब 2 / जॉब 2 |
जॉब 3 / जॉब 3 |
जॉब 4 / जॉब 4 |
जॉब 5 / जॉब 5 |
जॉब 6 / जॉब 6 |
जॉब 7 / जॉब 7 |
जॉब 8 / जॉब 8 |
जॉब 9 / जॉब 9 |
जॉब 10 / जॉब 10 |
जॉब 11 / जॉब 11 |
जॉब 12 / जॉब 12 |
जॉब 13 / जॉब 13 |
जॉब 14 / जॉब 14 |
जॉब 15 / जॉब 15 |
जॉब 16 / जॉब 16 |
जॉब 17 / जॉब 17 |
जॉब 18 / जॉब 18 |
जॉब 19 / जॉब 19 |
जॉब 20 / जॉब 20 |
जॉब 21 / जॉब 21 |
जॉब 22 / जॉब 22 |
जॉब 23 / जॉब 23 |
जॉब 24 / जॉब 24 |
जॉब 25 / जॉब 25 |
जॉब 26 / जॉब 26 |
जॉब 27 / जॉब 27 |
जॉब 28 / जॉब 28 |
जॉब 29 / जॉब 29 |
जॉब 30 / जॉब 30 |
जॉब 31 / जॉब 31 |
जॉब 32 / जॉब 32 |
जॉब 33 / जॉब 33 |
जॉब 34 / जॉब 34 |
जॉब 35 / जॉब 35 |
जॉब 36 / जॉब 36 |
जॉब 37 / जॉब 37 |
जॉब 38 / जॉब 38 |
जॉब 39 / जॉब 39 |
जॉब 40 / जॉब 40 |
जॉब 41 / जॉब 41 |
जॉब 42 / जॉब 42 |