१ |
शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व येशूवा ह्यांच्याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे: सराया, यिर्मया, एज्रा, |
२ |
अमर्या, मल्लूख, हट्टूश, |
३ |
शखन्या, रहूम, मरेमोथ, |
४ |
इद्दो, गिन्नथोई, अबीया, |
५ |
मियामीन, माद्या, बिल्गा, |
६ |
शमया, योयारीब, यदया, |
७ |
सल्लू, आमोक, हिल्कीया व यदया; हे येशूवाच्या काळात याजकांतले व त्यांच्या बांधवांतले मुख्य होते. |
८ |
लेवी: येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते; |
९ |
आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्यांच्याबरोबर पहार्यावर होते. |
१० |
येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमाला एल्याशीब झाला, एल्याशीबाला योयादा झाला, |
११ |
योयादाला योनाथान झाला, व योनाथानाला यद्दूवा झाला. |
१२ |
योयाकीमाच्या दिवसांत याजक पितृकुळातले मुख्य होते, ते हे: सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या, |
१३ |
एज्रापासून मशुल्लाम, अमर्यापासून यहोहानान, |
१४ |
मल्लूखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ, |
१५ |
हारीमापासून अदना, मरायोथापासून हेलकइ, |
१६ |
इद्दोपासून जखर्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम, |
१७ |
अबीयापासून जिख्री, मिन्यामिनापासून, मोवद्या-पासून पिल्तय, |
१८ |
बिल्गापासून शम्मूवा, शमयापासून यहोनाथान, |
१९ |
योयारीबापासून मत्तनई, यदयापासून उज्जी, |
२० |
सल्लाइपासून कल्लय, आमोकापासून एबेर, |
२१ |
हिज्कीयापासून हशब्या व यदायापासून नथनेल. |
२२ |
एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दूवा ह्यांच्या काळात लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळाचे मुख्य होते. |
२३ |
लेव्यांचे वंशज, आपापल्या पितृकुळांचे मुख्य, इतिहासाच्या पुस्तकात, एल्याशिबाचा पुत्र योहानान ह्याच्या काळापर्यंत नमूद केले होते; |
२४ |
आणि लेव्यांतले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमीएलाचा पुत्र येशूवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे गटागटाने देवाचा मनुष्य दावीद ह्याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकारस्मरण करायला होते. |
२५ |
मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशींवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत; |
२६ |
हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते. |
२७ |
यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यांना यरुशलेमेत पोचवण्यासाठी त्यांच्या-त्यांच्या स्थानांतून शोधून काढले. |
२८ |
यरुशलेमेच्या चोहोकडल्या प्रांतांतून नटोफाथीच्या खेड्यापाड्यांतून, |
२९ |
बेथ-गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेथ येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकत्र झाले; त्यांनी यरुशलेमेच्या आसपास खेडी वसवली होती. |
३० |
मग याजक व लेवी ह्यांनी स्वतःस शुद्ध करून लोकांची, वेशींची व कोटाची शुद्धी केली. |
३१ |
मी यहूदाच्या सरदारांना कोटावर चढवले आणि त्यांच्या दोन टोळ्या केल्या; त्या स्तोत्रे गात मिरवत चालल्या; त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे उकिरडावेशीकडे चालली; |
३२ |
आणि तिच्यामागून होशया, यहूदाचे अर्धे अधिकारी, |
३३ |
अजर्या, एज्रा, मशुल्लाम, |
३४ |
यहूदा बन्यामीन, शमया, यिर्मया, |
३५ |
व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ, |
३६ |
आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद ह्याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्यापुढे एज्रा शास्त्री चालला; |
३७ |
ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले. |
३८ |
स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत, |
३९ |
आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले. |
४० |
अशा प्रकारे स्तोत्रे म्हणणार्या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या; मी व माझ्याबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले; |
४१ |
याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखर्या व हनन्या ह्यांनी कर्णे हाती घेतले; |
४२ |
आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर ह्यांनीही कर्णे हाती घेतले; गायकांनी उंच स्वराने गाइले; यिज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता. |
४३ |
त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला. |
४४ |
याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता. |
४५ |
दाविदाच्या व त्याचा पुत्र शलमोन ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत; तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत. |
४६ |
प्राचीन काळी म्हणजे दावीद व आसाफ ह्यांच्या दिवसांत एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे ह्यांची योजना केली होती. |
४७ |
जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नहेम्या १२:1 |
नहेम्या १२:2 |
नहेम्या १२:3 |
नहेम्या १२:4 |
नहेम्या १२:5 |
नहेम्या १२:6 |
नहेम्या १२:7 |
नहेम्या १२:8 |
नहेम्या १२:9 |
नहेम्या १२:10 |
नहेम्या १२:11 |
नहेम्या १२:12 |
नहेम्या १२:13 |
नहेम्या १२:14 |
नहेम्या १२:15 |
नहेम्या १२:16 |
नहेम्या १२:17 |
नहेम्या १२:18 |
नहेम्या १२:19 |
नहेम्या १२:20 |
नहेम्या १२:21 |
नहेम्या १२:22 |
नहेम्या १२:23 |
नहेम्या १२:24 |
नहेम्या १२:25 |
नहेम्या १२:26 |
नहेम्या १२:27 |
नहेम्या १२:28 |
नहेम्या १२:29 |
नहेम्या १२:30 |
नहेम्या १२:31 |
नहेम्या १२:32 |
नहेम्या १२:33 |
नहेम्या १२:34 |
नहेम्या १२:35 |
नहेम्या १२:36 |
नहेम्या १२:37 |
नहेम्या १२:38 |
नहेम्या १२:39 |
नहेम्या १२:40 |
नहेम्या १२:41 |
नहेम्या १२:42 |
नहेम्या १२:43 |
नहेम्या १२:44 |
नहेम्या १२:45 |
नहेम्या १२:46 |
नहेम्या १२:47 |
|
|
|
|
|
|
नहेम्या 1 / नहेम्या 1 |
नहेम्या 2 / नहेम्या 2 |
नहेम्या 3 / नहेम्या 3 |
नहेम्या 4 / नहेम्या 4 |
नहेम्या 5 / नहेम्या 5 |
नहेम्या 6 / नहेम्या 6 |
नहेम्या 7 / नहेम्या 7 |
नहेम्या 8 / नहेम्या 8 |
नहेम्या 9 / नहेम्या 9 |
नहेम्या 10 / नहेम्या 10 |
नहेम्या 11 / नहेम्या 11 |
नहेम्या 12 / नहेम्या 12 |
नहेम्या 13 / नहेम्या 13 |