A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

नहेम्या १०ज्यांनी आपली मोहर केली ते हेच: हखल्याचा पुत्र नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती) व सिद्कीया,
सराया, अजर्‍या, यिर्मया,
पश्हूर, अमर्‍या, मल्खीया,
हट्टूश, शबन्या, मल्लूख,
हारीम, मरेमोथ, ओबद्या,
दानीएल, गिन्नथोन, बारूख,
मशुल्लाम, अबीया, मियामीन,
माज्या, बिल्गई, शमया हे याजक;
आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादाच्या पुत्रांतला बिन्नुई, कदमीएल,
१०
आणि त्यांचे भाऊ शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हनान,
११
मीखा, रहोब, हशब्या,
१२
जक्कूर, शेरेब्या, शबन्या,
१३
होदीया, बानी, बनीनू;
१४
लोकांतले मुख्य: परोश, पहथ-मवाब, एलाम, जत्तू, बानी,
१५
बुन्नी, अजगाद, बेबाई,
१६
अदोनीया, बिग्वई, आदीन,
१७
आटेर, हिज्कीया, अज्जूर,
१८
होदीया, हाशूम, बेसाई,
१९
हारीफ, अनाथोथ, नोबाई,
२०
मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
२१
मशेजबेल, सादोक, यद्दूवा,
२२
पलट्या, हानान, अनाया,
२३
होशेया, हनन्या, हश्शूब,
२४
हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,
२५
रहूम, हशब्ना, मासेया,
२६
अहीया, हनान, अनान,
२७
मल्लूख, हारीम व बाना.
२८
अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथीनीम ह्यांनी आणि देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यांना अक्कल व समज होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्यासह
२९
आपले भाऊबंद व महाजन ह्यांच्याशी एकचित्त होऊन आणभाक केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्या द्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू; असे न केल्यास आम्हांला शाप लागो.
३०
आम्ही आमच्या मुली ह्या देशातल्या लोकांना देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलांना करणार नाही;
३१
ह्या देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी एखादी वस्तू अथवा अन्नसामग्री विकण्यास आणली, तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बाथ दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही; सातव्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ.
३२
ह्याशिवाय आम्ही असा एक नियम करून ठेवतो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येकी एक तृतीयांश शेकेल दर वर्षी द्यावा;
३३
समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण ह्यासंबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्राएलाच्या प्रायश्‍चित्तासाठी पापार्पणे, ह्या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा.
३४
मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळांप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समयी आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावीत.
३५
आपापल्या जमिनीचा प्रथमउपज व निरनिराळ्या वृक्षांची प्रथमफळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरात आणावीत;
३६
आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथमजन्मलेले पुत्र, तसेच आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमजन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणार्‍या याजकांकडे घेऊन यावे;
३७
आणि आपण आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल हे याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत आणावे; आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा; कारण लेवी सर्व नगरांतून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात.
३८
लेवी दशमांश घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातला कोणी याजक असावा, आणि लेव्यांनी दशमांशाचा दशमांश आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत म्हणजे भांडारात पोचता करावा.
३९
इस्राएल लोक व लेव्यांचे वंशज ह्यांनी धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्रस्थानाची पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाळ व गायक असतात त्या कोठड्यांत आणावे; आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये.नहेम्या १०:1
नहेम्या १०:2
नहेम्या १०:3
नहेम्या १०:4
नहेम्या १०:5
नहेम्या १०:6
नहेम्या १०:7
नहेम्या १०:8
नहेम्या १०:9
नहेम्या १०:10
नहेम्या १०:11
नहेम्या १०:12
नहेम्या १०:13
नहेम्या १०:14
नहेम्या १०:15
नहेम्या १०:16
नहेम्या १०:17
नहेम्या १०:18
नहेम्या १०:19
नहेम्या १०:20
नहेम्या १०:21
नहेम्या १०:22
नहेम्या १०:23
नहेम्या १०:24
नहेम्या १०:25
नहेम्या १०:26
नहेम्या १०:27
नहेम्या १०:28
नहेम्या १०:29
नहेम्या १०:30
नहेम्या १०:31
नहेम्या १०:32
नहेम्या १०:33
नहेम्या १०:34
नहेम्या १०:35
नहेम्या १०:36
नहेम्या १०:37
नहेम्या १०:38
नहेम्या १०:39


नहेम्या 1 / नहेम्या 1
नहेम्या 2 / नहेम्या 2
नहेम्या 3 / नहेम्या 3
नहेम्या 4 / नहेम्या 4
नहेम्या 5 / नहेम्या 5
नहेम्या 6 / नहेम्या 6
नहेम्या 7 / नहेम्या 7
नहेम्या 8 / नहेम्या 8
नहेम्या 9 / नहेम्या 9
नहेम्या 10 / नहेम्या 10
नहेम्या 11 / नहेम्या 11
नहेम्या 12 / नहेम्या 12
नहेम्या 13 / नहेम्या 13