१ |
इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी: रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही; |
२ |
कारण यहूदाचे वर्चस्व त्याच्या बांधवांवर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता. |
३ |
इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याचे पुत्र हनोख पल्लू, हेस्रोन व कर्मी. |
४ |
योएलाचे पुत्र: त्याचा पुत्र शमाया, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी; |
५ |
त्याचा पुत्र मीखा, त्याचा पुत्र राया, त्याचा पुत्र बाल; |
६ |
त्याचा पुत्र बैरा, ह्याला अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर1 ह्याने कैद करून नेले; तो रऊबेन वंशाचा सरदार होता. |
७ |
त्याच्या भावांची वंशावळी त्यांच्या कुळांप्रमाणे लिहिली ती अशी: त्यांतला प्रमुख यइएल, जखर्या, |
८ |
बेला बिन आजाज बिन शमा बिन योएल; हा वंश नबो व बालमौन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला. |
९ |
पूर्वेकडील महानद फराताजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्याने वस्ती केली; कारण गिलाद देशात त्यांची गुरेढोरे फार वाढली होती. |
१० |
शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेर्यांत राहू लागले. |
११ |
गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलका येथवर बाशान प्रदेशात राहत होते; |
१२ |
त्यांतला प्रमुख योएल व दुय्यम शाफाम ह्यांखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते. |
१३ |
त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचे बांधव मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर असे सात होते. |
१४ |
हे सर्व अबीहाईल बिन हूरी बिन यारोह, बिन गिलाद बिन मीखाएल बिन यशीशाय बिन यहदो बिन बूज ह्यांचे वंशज होत; |
१५ |
अही बिन अबूदीएल बिन गूनी हा त्यांच्या पितृकुळांचा प्रमुख होता. |
१६ |
ते लोक गिलादात व बाशानात खेड्यापाड्यांत आणि शारोनाच्या शिवारात आपल्या सीमेच्या आत वस्ती करून होते. |
१७ |
ह्या सर्वांची वंशावळी यहूदाचा राजा योथाम व इस्राएलाचा राजा यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत लिहिली. |
१८ |
रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक त्यांच्यातले बलवान पुरुष ढालाईत, धारकरी, धनुर्धारी व युद्धकलानिपुण असे चव्वेचाळीस हजार सातशे साठ लढाईस जाण्याजोगे लोक होते. |
१९ |
त्यांनी हगरी यतूर, नाफीश व नोदाब ह्यांच्याशी युद्ध केले. |
२० |
त्यांच्याशी लढण्यास त्यांना कुमक मिळून त्यांनी हगरी व त्यांच्याबरोबरचे इतर लोक ह्यांना पादाक्रांत केले, कारण युद्धसमयी त्यांनी देवाचा धावा केला; त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांची प्रार्थना ऐकली. |
२१ |
त्यांनी त्यांची गुरेढोरे हरण केली; पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे एवढी जनावरे व एक लक्ष माणसे त्यांनी नेली. |
२२ |
बहुत लोकांचा संहार झाला, कारण युद्ध देवाच्या पक्षाचे होते. त्यांचा स्वतःचा पाडाव होईपर्यंत ते त्यांच्या ठिकाणी वस्ती करून राहिले. |
२३ |
मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्या देशात वस्ती केली; बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर, व हर्मोन पर्वत येथपर्यंत त्यांचा विस्तार झाला. |
२४ |
त्यांच्या पितृकुळांपैकी प्रमुख पुरुष होते ते हे: एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या व यहदीएल; हे महावीर व नामांकित पुरुष असून आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. |
२५ |
त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देवाशी फितुरी केली, आणि देवाने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता त्यांच्या देवांच्या नादी लागून ते अत्याचारी बनले. |
२६ |
ह्यास्तव इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल आणि त्याच देशाचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्यांना उठवले; त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक ह्यांना पाडाव करून हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत त्यांना नेऊन ठेवले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१ इतिहास ५:1 |
१ इतिहास ५:2 |
१ इतिहास ५:3 |
१ इतिहास ५:4 |
१ इतिहास ५:5 |
१ इतिहास ५:6 |
१ इतिहास ५:7 |
१ इतिहास ५:8 |
१ इतिहास ५:9 |
१ इतिहास ५:10 |
१ इतिहास ५:11 |
१ इतिहास ५:12 |
१ इतिहास ५:13 |
१ इतिहास ५:14 |
१ इतिहास ५:15 |
१ इतिहास ५:16 |
१ इतिहास ५:17 |
१ इतिहास ५:18 |
१ इतिहास ५:19 |
१ इतिहास ५:20 |
१ इतिहास ५:21 |
१ इतिहास ५:22 |
१ इतिहास ५:23 |
१ इतिहास ५:24 |
१ इतिहास ५:25 |
१ इतिहास ५:26 |
|
|
|
|
|
|
१ इतिहास 1 / १इतिह 1 |
१ इतिहास 2 / १इतिह 2 |
१ इतिहास 3 / १इतिह 3 |
१ इतिहास 4 / १इतिह 4 |
१ इतिहास 5 / १इतिह 5 |
१ इतिहास 6 / १इतिह 6 |
१ इतिहास 7 / १इतिह 7 |
१ इतिहास 8 / १इतिह 8 |
१ इतिहास 9 / १इतिह 9 |
१ इतिहास 10 / १इतिह 10 |
१ इतिहास 11 / १इतिह 11 |
१ इतिहास 12 / १इतिह 12 |
१ इतिहास 13 / १इतिह 13 |
१ इतिहास 14 / १इतिह 14 |
१ इतिहास 15 / १इतिह 15 |
१ इतिहास 16 / १इतिह 16 |
१ इतिहास 17 / १इतिह 17 |
१ इतिहास 18 / १इतिह 18 |
१ इतिहास 19 / १इतिह 19 |
१ इतिहास 20 / १इतिह 20 |
१ इतिहास 21 / १इतिह 21 |
१ इतिहास 22 / १इतिह 22 |
१ इतिहास 23 / १इतिह 23 |
१ इतिहास 24 / १इतिह 24 |
१ इतिहास 25 / १इतिह 25 |
१ इतिहास 26 / १इतिह 26 |
१ इतिहास 27 / १इतिह 27 |
१ इतिहास 28 / १इतिह 28 |
१ इतिहास 29 / १इतिह 29 |