A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

२ राजे ८ज्या स्त्रीच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, “तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोईस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो ह्या देशात सात वर्षे चालू राहणार आहे.”
देवाच्या माणसाच्या ह्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिली.
सात वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन ह्याच्यासंबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली.
त्या वेळी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी ह्याच्याशी बोलत होता आणि “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली त्यांचे वर्णन कर” असे तो त्याला सांगत होता.
अलीशाने एका मृताला जिवंत केल्याचे तो राजाला सांगत होता तितक्यात जिचा मुलगा त्याने जिवंत केला होता ती स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन ह्यांच्यासंबंधाने तिने राजाकडे फिर्याद केली. गेहजी म्हणाला, “स्वामीराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने जिवंत केलेला हाच तो मुलगा.”
तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारल्यावर तिने आपली हकिकत त्याला सांगितली. राजाने एका अंमलदाराला तिच्याबरोबर पाठवले; त्याला त्याने सांगितले, “तिचे जे काही आहे ते सर्व आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंतचे तिच्या शेतीचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तजवीज कर.”
मग अलीशा दिमिष्काला गेला; त्या वेळी अरामाचा राजा बेन-हदाद आजारी पडला होता; तेव्हा “देवाचा माणूस आला आहे” असे कोणी त्याला सांगितले.
तेव्हा राजाने हजाएलाला सांगितले, “हाती नजराणा घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीला जा आणि त्याच्या द्वारे परमेश्वराला प्रश्‍न कर की मी ह्या रोगातून बरा होईन काय?”
तेव्हा हजाएल दिमिष्कातील सर्व उत्तम उत्तम वस्तू चाळीस उंटांवर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुझा पुत्र अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने तुला असे विचारायला मला पाठवले आहे की मी ह्या रोगातून उठेन की नाही?”
१०
अलीशा त्याला म्हणाला, “जाऊन त्याला सांग, तू खात्रीने बरा होशील;1 तथापि परमेश्वराने मला कळवले आहे की तो अवश्य मरेल.”
११
तो त्याच्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लावली की तो भांबावून गेला; आणि देवाचा माणूस रडू लागला.
१२
हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” त्याने म्हटले, “तू इस्राएल लोकांना उपद्रव देणार; त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तलवारीने वधणार; त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार; त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार; हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून.”
१३
हजाएल म्हणाला, “आपला दास तर केवळ कुत्रा आहे; तो असली मोठी कृत्ये कशी करणार?” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळवले आहे.”
१४
तो अलीशापासून निघून आपल्या धन्याकडे गेला; त्याने त्याला विचारले, “अलीशा तुला काय म्हणाला?” त्याने उत्तर दिले की, “आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले.”
१५
दुसर्‍या दिवशी त्याने एक रजई घेऊन ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरली; त्यामुळे तो मरण पावला. त्याच्या जागी हजाएल राजा झाला.
१६
इस्राएलाचा राजा अहाब ह्याचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यहोशाफाट यहूदाचा राजा होता त्या वेळी त्याचा पुत्र यहोराम हा राज्य करू लागला.
१७
तो बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले.
१८
अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला, त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
१९
तथापि आपला सेवक दावीद ह्याच्यास्तव यहूदाचा नाश करावा असे परमेश्वराला वाटले नाही, कारण त्याने त्याला वचन दिले होते की तुझ्या संतानाच्या ठायी मी तुझा दीप कायम ठेवीन.
२०
त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला एक राजा नेमला.
२१
तेव्हा योराम आपले सर्व रथ बरोबर घेऊन साईर येथे गेला; ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला; तेव्हा लोक आपापल्या डेर्‍यांकडे पळून गेले.
२२
अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले.
२३
योरामाने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने केलेली सगळी कामे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
२४
नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र अहज्या हा त्याच्या जागी राजा झाला.
२५
अहाबाचा पुत्र इस्राएलाचा राजा योराम ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या हा राज्य करू लागला.
२६
अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या; ही इस्राएलाचा राजा अम्री ह्याची नात.
२७
त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जावई होता.
२८
तो अहाबाचा पुत्र योराम ह्याच्याबरोबर रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढायला गेला; तेव्हा अरामी लोकांनी योरामाला घायाळ केले.
२९
योराम राजा हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्याला झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र योराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या त्याच्या समाचाराला गेला.२ राजे ८:1
२ राजे ८:2
२ राजे ८:3
२ राजे ८:4
२ राजे ८:5
२ राजे ८:6
२ राजे ८:7
२ राजे ८:8
२ राजे ८:9
२ राजे ८:10
२ राजे ८:11
२ राजे ८:12
२ राजे ८:13
२ राजे ८:14
२ राजे ८:15
२ राजे ८:16
२ राजे ८:17
२ राजे ८:18
२ राजे ८:19
२ राजे ८:20
२ राजे ८:21
२ राजे ८:22
२ राजे ८:23
२ राजे ८:24
२ राजे ८:25
२ राजे ८:26
२ राजे ८:27
२ राजे ८:28
२ राजे ८:29


२ राजे 1 / २राजे 1
२ राजे 2 / २राजे 2
२ राजे 3 / २राजे 3
२ राजे 4 / २राजे 4
२ राजे 5 / २राजे 5
२ राजे 6 / २राजे 6
२ राजे 7 / २राजे 7
२ राजे 8 / २राजे 8
२ राजे 9 / २राजे 9
२ राजे 10 / २राजे 10
२ राजे 11 / २राजे 11
२ राजे 12 / २राजे 12
२ राजे 13 / २राजे 13
२ राजे 14 / २राजे 14
२ राजे 15 / २राजे 15
२ राजे 16 / २राजे 16
२ राजे 17 / २राजे 17
२ राजे 18 / २राजे 18
२ राजे 19 / २राजे 19
२ राजे 20 / २राजे 20
२ राजे 21 / २राजे 21
२ राजे 22 / २राजे 22
२ राजे 23 / २राजे 23
२ राजे 24 / २राजे 24
२ राजे 25 / २राजे 25