A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

२ राजे ५अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता.
अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला, आणि इस्राएल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली; ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली.
ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.”
कोणीएकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएल मुलगी असे असे म्हणत आहे.”
अरामाच्या राजाने म्हटले, “जा तर मग. मी इस्राएलाच्या राजाला पत्र देतो.” मग तो माणूस दहा किक्कार1 चांदी, सोन्याची सहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला.
त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्र आणले; त्यात असा मजकूर होता की, “ह्या पत्राच्या द्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे, आपण त्याचे कोड बरे करावे.”
हे पत्र वाचून इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली; तो म्हणाला, “ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे; मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा; पाहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे.”
इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलीशा ह्याने ऐकले, तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, “तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल.”
तेव्हा नामान घोड्यांरथांनिशी अलीशाच्या दारी जाऊन उभा राहिला.
१०
अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.”
११
हे ऐकून नामान रागावून चालता झाला; तो म्हणाला, “पाहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील.
१२
दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय?” असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला.
१३
मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, “बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये?”
१४
मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या; तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.
१५
नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे; तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा.”
१६
तो म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काहीएक घेणार नाही.” त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना.
१७
तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांच्या ओझ्याची माती द्या; कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवांना होमबली अर्पण करणार नाही की यज्ञही करणार नाही.
१८
परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी; म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो, आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो; ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी.”
१९
तो त्याला म्हणाला, “आता सुखाने मार्गस्थ हो.” तो तेथून निघून थोडी वाट चालून गेला.
२०
इकडे देवाचा माणूस अलीशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की, “अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली; परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्यामागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच.”
२१
मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्यामागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्याला सामोरे जाऊन विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”
२२
गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने आपणास असे सांगायला पाठवले आहे की, ‘एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत; त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी व दोन पोशाख द्या.”’
२३
नामान म्हणाला, “कृपा करून दोन किक्कार घे.” त्याने आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोशाखांसह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यांवर ठेवल्या; हे सर्व घेऊन ते त्याच्यापुढे चालले.
२४
तो टेकडीनजीक येऊन पोहचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या माणसांना “जा” म्हणून सांगितले; मग ते निघून गेले.
२५
त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलीशा त्याला म्हणाला, “गेहजी, तू कोठून आलास?” त्याने म्हटले, “आपला दास कोठेही गेला नव्हता.”
२६
तो त्याला म्हणाला, “तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनांचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय?
२७
तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्यापुढून चालता झाला.२ राजे ५:1
२ राजे ५:2
२ राजे ५:3
२ राजे ५:4
२ राजे ५:5
२ राजे ५:6
२ राजे ५:7
२ राजे ५:8
२ राजे ५:9
२ राजे ५:10
२ राजे ५:11
२ राजे ५:12
२ राजे ५:13
२ राजे ५:14
२ राजे ५:15
२ राजे ५:16
२ राजे ५:17
२ राजे ५:18
२ राजे ५:19
२ राजे ५:20
२ राजे ५:21
२ राजे ५:22
२ राजे ५:23
२ राजे ५:24
२ राजे ५:25
२ राजे ५:26
२ राजे ५:27


२ राजे 1 / २राजे 1
२ राजे 2 / २राजे 2
२ राजे 3 / २राजे 3
२ राजे 4 / २राजे 4
२ राजे 5 / २राजे 5
२ राजे 6 / २राजे 6
२ राजे 7 / २राजे 7
२ राजे 8 / २राजे 8
२ राजे 9 / २राजे 9
२ राजे 10 / २राजे 10
२ राजे 11 / २राजे 11
२ राजे 12 / २राजे 12
२ राजे 13 / २राजे 13
२ राजे 14 / २राजे 14
२ राजे 15 / २राजे 15
२ राजे 16 / २राजे 16
२ राजे 17 / २राजे 17
२ राजे 18 / २राजे 18
२ राजे 19 / २राजे 19
२ राजे 20 / २राजे 20
२ राजे 21 / २राजे 21
२ राजे 22 / २राजे 22
२ राजे 23 / २राजे 23
२ राजे 24 / २राजे 24
२ राजे 25 / २राजे 25