१ |
एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गार्हाणे केले; ती म्हणाली, “तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.” |
२ |
अलीशाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग; तुझ्या घरात काय आहे?” ती म्हणाली, “एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.” |
३ |
तो तिला म्हणाला, “तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार्यापाजार्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. |
४ |
मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यांत तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव.” |
५ |
ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. |
६ |
सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, “मला आणखी एक भांडे आणून द्या;” त्यांनी म्हटले, “आता एकही भांडे उरले नाही;” तेव्हा तेल वाढायचे थांबले. |
७ |
तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, “जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर.” अलीशा व शूनेम येथील स्त्री |
८ |
एके दिवशी असे झाले की अलीशा शूनेम येथे गेला; तेथे एक थोर स्त्री राहत होती; तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे. |
९ |
ती आपल्या नवर्याला म्हणाली, “हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. |
१० |
ह्यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिथे ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल.” |
११ |
एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. |
१२ |
त्याने आपला सेवक गेहजी ह्याला म्हटले, “त्या शूनेमकरिणीला बोलावून आण.” त्याने तिला बोलावले, आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली. |
१३ |
तो त्या सेवकाला म्हणाला, “तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस; तुझ्यासाठी मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय?” ती म्हणाली, “मी आपल्या लोकांत नांदत आहे.” |
१४ |
त्याने आपल्या सेवकाला विचारले, “हिच्यासाठी काय करावे?” गेहजी म्हणाला, “तिला मूलबाळ नाही; आणि तिचा नवरा वृद्ध आहे.” |
१५ |
त्याने म्हटले, “तिला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती येऊन दारात उभी राहिली. |
१६ |
तो तिला म्हणाला, “वसंतऋतु पुनरपि येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील.” ती म्हणाली, “छे, छे, माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीशी खोटे बोलू नका.” |
१७ |
पुढे अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंतऋतू पुनरपि आला तेव्हा तिला पुत्र झाला. |
१८ |
तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते तेथे तो बाहेर कापणार्यांकडे आपल्या बापाकडे गेला. |
१९ |
तो आपल्या बापाला म्हणाला, “अरेरे! माझे डोके! माझे डोके!” त्याने आपल्या चाकराला सांगितले, “ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने.” |
२० |
त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. |
२१ |
तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले, व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली. |
२२ |
आपल्या नवर्याला हाक मारून ती म्हणाली, “एक नोकर व एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते.” |
२३ |
तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.” |
२४ |
गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकराला म्हणाली, “तू हे एकसारखे हाकत ने; मी सांगितल्यावाचून ते हाकण्याचे सोडू नकोस.” |
२५ |
मग ती चालत कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी ह्याला म्हणाला, “ती पाहा, शूनेमकरीण; |
२६ |
धाव, तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना?” तिने म्हटले, “सर्व खुशाल आहेत.” |
२७ |
डोंगर चढून देवाच्या माणसाजवळ आल्यावर तिने त्याचे पाय धरले. गेहजी तिला एकीकडे लोटायला जवळ गेला तेव्हा देवाचा माणूस त्याला म्हणाला, “तिला हात लावू नकोस, तिचे मन व्याकुळ झाले आहे; परमेश्वराने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आहे, मला कळवली नाही.” |
२८ |
ती म्हणाली, “मी स्वामींकडे पुत्राचा वर मागितला होता काय? मला फसवू नका असेच मी म्हटले होते ना?” |
२९ |
तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी हाती घेऊन नीघ; वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नकोस; कोणी सलाम केल्यास त्याला उलट सलाम करू नकोस. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव.” |
३० |
तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” तेव्हा तो उठून तिच्यामागून चालला. |
३१ |
गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडाला काठी लावली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलीशाकडे परत येऊन म्हणाला, “मूल काही जागे होत नाही.” |
३२ |
अलीशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. |
३३ |
आणि आत गेल्यावर त्याने त्यांच्यामागे दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली. |
३४ |
मग माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लावले; त्याच्यावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली. |
३५ |
मग त्याला सोडून तो घरात इकडेतिकडे फिरू लागला; व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाने सात वेळा शिंकून डोळे उघडले. |
३६ |
मग त्याने गेहजीला हाक मारून सांगितले, “त्या शूनेमकरिणीला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती त्याच्याकडे आली तेव्हा तो तिला म्हणाला, “आपल्या पुत्राला उचलून घे.” |
३७ |
ती आत जाऊन त्याच्या पाया पडली, त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले, नंतर ती आपल्या मुलाला घेऊन बाहेर गेली. |
३८ |
अलीशा पुन्हा गिलगाल येथे गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता, आणि संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले असताना त्याने आपल्या सेवकाला सांगितले, “चुलीवर मोठे बहुगुणे ठेवून संदेष्ट्यांच्या शिष्यांसाठी शाकभाजी रांध.” |
३९ |
तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करण्यासाठी गेला असता त्याला एक रानवेल सापडली; तिच्यावरील कडू इंद्रायणे तोडून त्याने ओटीत भरून आणली; ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली; ती कडू होती हे त्यांना ठाऊक नव्हते. |
४० |
त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसांना वाढली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, “देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे.” त्यांच्याने ते खाववेना. |
४१ |
अलीशा म्हणाला, “थोडे सपीठ आणा, ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यांना म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा म्हणजे ते ते खातील.” मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही. |
४२ |
बआल-शालीशा येथील कोणी मनुष्य आपल्या प्रथमउपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्याला म्हणाला, “ह्या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे.” |
४३ |
त्याचा सेवक म्हणाला, “काय? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ?” तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे; त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.” |
४४ |
तेव्हा ते त्याने लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर त्यातले काही उरले.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ राजे ४:1 |
२ राजे ४:2 |
२ राजे ४:3 |
२ राजे ४:4 |
२ राजे ४:5 |
२ राजे ४:6 |
२ राजे ४:7 |
२ राजे ४:8 |
२ राजे ४:9 |
२ राजे ४:10 |
२ राजे ४:11 |
२ राजे ४:12 |
२ राजे ४:13 |
२ राजे ४:14 |
२ राजे ४:15 |
२ राजे ४:16 |
२ राजे ४:17 |
२ राजे ४:18 |
२ राजे ४:19 |
२ राजे ४:20 |
२ राजे ४:21 |
२ राजे ४:22 |
२ राजे ४:23 |
२ राजे ४:24 |
२ राजे ४:25 |
२ राजे ४:26 |
२ राजे ४:27 |
२ राजे ४:28 |
२ राजे ४:29 |
२ राजे ४:30 |
२ राजे ४:31 |
२ राजे ४:32 |
२ राजे ४:33 |
२ राजे ४:34 |
२ राजे ४:35 |
२ राजे ४:36 |
२ राजे ४:37 |
२ राजे ४:38 |
२ राजे ४:39 |
२ राजे ४:40 |
२ राजे ४:41 |
२ राजे ४:42 |
२ राजे ४:43 |
२ राजे ४:44 |
|
|
|
|
|
|
२ राजे 1 / २राजे 1 |
२ राजे 2 / २राजे 2 |
२ राजे 3 / २राजे 3 |
२ राजे 4 / २राजे 4 |
२ राजे 5 / २राजे 5 |
२ राजे 6 / २राजे 6 |
२ राजे 7 / २राजे 7 |
२ राजे 8 / २राजे 8 |
२ राजे 9 / २राजे 9 |
२ राजे 10 / २राजे 10 |
२ राजे 11 / २राजे 11 |
२ राजे 12 / २राजे 12 |
२ राजे 13 / २राजे 13 |
२ राजे 14 / २राजे 14 |
२ राजे 15 / २राजे 15 |
२ राजे 16 / २राजे 16 |
२ राजे 17 / २राजे 17 |
२ राजे 18 / २राजे 18 |
२ राजे 19 / २राजे 19 |
२ राजे 20 / २राजे 20 |
२ राजे 21 / २राजे 21 |
२ राजे 22 / २राजे 22 |
२ राजे 23 / २राजे 23 |
२ राजे 24 / २राजे 24 |
२ राजे 25 / २राजे 25 |