१ |
पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला. |
२ |
आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. |
३ |
तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांच्या अमंगळ आचारांना अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पण केले. |
४ |
तो उच्च स्थानी, पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करत असे व धूप जाळत असे. |
५ |
मग अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले; त्यांनी आहाजाला वेढा दिला पण त्यांना त्याला जिंकता आले नाही. |
६ |
त्या वेळी अरामाचा राजा रसीन ह्याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा अरामात सामील केले व तेथल्या यहूदी लोकांना हाकून दिले; अरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत. |
७ |
मग आहाजाने अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता अरामाचा राजा व इस्राएलाचा राजा हे माझ्यावर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा.” |
८ |
परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोनेरुपे आहाजास सापडले तेवढे त्याने अश्शूराच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठवले. |
९ |
त्याचे मागणे मान्य करून अश्शूराच्या राजाने दिमिष्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकांना पाडाव करून कीर येथे नेले; आणि रसीन ह्याचा वध केला. |
१० |
तेव्हा अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिष्क येथे गेला; त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण ह्यांचा नमुना उरीया याजकाकडे पाठवून दिला. |
११ |
आहाज राजाने दिमिष्काहून पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिष्काहून येण्यापूर्वी तयार केली. |
१२ |
राजा दिमिष्काहून परत आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली; त्याने त्या वेदीजवळ जाऊन तिच्यावर बली अर्पण केले. |
१३ |
त्या वेदीवर त्याने आपले होमबली व अन्नबली ह्यांचे होम केले, आपली पेयार्पणे तिच्यावर ओतली व आपल्या शांत्यर्पणांच्या बलींचे रक्त त्या वेदीवर शिंपडले. |
१४ |
परमेश्वरापुढे असलेली पितळेची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर ह्यांच्या दरम्यान होती ती तेथून काढून त्याने तयार केलेल्या ह्या वेदीच्या उत्तरेकडे ठेवली. |
१५ |
आहाज राजाने उरीया याजकाला आज्ञा केली की, “नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली, आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावीत; होमबली व इतर यज्ञपशू ह्यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे; पितळेची वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.” |
१६ |
आहाज राजाच्या आज्ञेप्रमाणे उरीया याजकाने केले. |
१७ |
मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावर असलेले गंगाळ काढले, आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला. |
१८ |
शब्बाथ दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधली होती ती व राजाला बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे दार केले होते ते, ही दोन्ही मंदिरापासून वेगळी करण्यात आली. |
१९ |
आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केल्या आहेत, नाहीत काय? |
२० |
आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र हिज्किया हा त्याच्या जागी राजा झाला.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ राजे १६:1 |
२ राजे १६:2 |
२ राजे १६:3 |
२ राजे १६:4 |
२ राजे १६:5 |
२ राजे १६:6 |
२ राजे १६:7 |
२ राजे १६:8 |
२ राजे १६:9 |
२ राजे १६:10 |
२ राजे १६:11 |
२ राजे १६:12 |
२ राजे १६:13 |
२ राजे १६:14 |
२ राजे १६:15 |
२ राजे १६:16 |
२ राजे १६:17 |
२ राजे १६:18 |
२ राजे १६:19 |
२ राजे १६:20 |
|
|
|
|
|
|
२ राजे 1 / २राजे 1 |
२ राजे 2 / २राजे 2 |
२ राजे 3 / २राजे 3 |
२ राजे 4 / २राजे 4 |
२ राजे 5 / २राजे 5 |
२ राजे 6 / २राजे 6 |
२ राजे 7 / २राजे 7 |
२ राजे 8 / २राजे 8 |
२ राजे 9 / २राजे 9 |
२ राजे 10 / २राजे 10 |
२ राजे 11 / २राजे 11 |
२ राजे 12 / २राजे 12 |
२ राजे 13 / २राजे 13 |
२ राजे 14 / २राजे 14 |
२ राजे 15 / २राजे 15 |
२ राजे 16 / २राजे 16 |
२ राजे 17 / २राजे 17 |
२ राजे 18 / २राजे 18 |
२ राजे 19 / २राजे 19 |
२ राजे 20 / २राजे 20 |
२ राजे 21 / २राजे 21 |
२ राजे 22 / २राजे 22 |
२ राजे 23 / २राजे 23 |
२ राजे 24 / २राजे 24 |
२ राजे 25 / २राजे 25 |