१ |
मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व प्रमुख व सर्व पितृकुळांचे सरदार ह्यांना शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले. |
२ |
सर्व इस्राएल पुरुष एथानीम महिन्यात म्हणजे सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसांत शलमोन राजाजवळ जमा झाले. |
३ |
इस्राएल लोकांचे सर्व वडील जन आले तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला. |
४ |
परमेश्वराचा कोश, दर्शनमंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक व लेवी ह्यांनी वरती वाहून नेली. |
५ |
शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करता आली नाही. |
६ |
मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभार्यात, परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला. |
७ |
कोशाच्या जागेवर करूबांचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांच्यावर त्यांचे आच्छादन होते; |
८ |
त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके गाभार्या-समोरल्या पवित्रस्थानातून दिसत; परंतु पवित्रस्थानाबाहेरून ती दिसत नसत; ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत. |
९ |
इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन दगडी पाट्या ठेवल्या होत्या; त्यांखेरीज त्यात दुसरे काही नव्हते. |
१० |
याजक पवित्रस्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. |
११ |
त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. |
१२ |
मग शलमोन राजा म्हणाला, “परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वस्ती करीन. |
१३ |
तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.” |
१४ |
मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली. |
१५ |
तो म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! त्याने माझा बाप दावीद ह्याला स्वमुखाने हे वचन दिले होते व त्याने स्वहस्ते हे पूर्ण केले; ते वचन असे: |
१६ |
मी आपल्या इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर दाविदाला मी निवडून नेमले आहे. |
१७ |
माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे. |
१८ |
पण परमेश्वराने माझा बाप दावीद ह्याला सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस; |
१९ |
पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. |
२० |
परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले; मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मी हे मंदिर बांधले आहे. |
२१ |
परमेश्वराने आमचे वाडवडील मिसर देशातून आणले तेव्हा त्यांच्याशी परमेश्वराचा जो करार झाला तो त्या कोशात आहे; त्यासाठी मी स्थान तयार केले आहे.” |
२२ |
शलमोनाने इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले; |
२३ |
तो म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक जिवेभावे तुझ्यासमोर वर्ततात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार व दयेने वर्ततोस; |
२४ |
जे वचन तू आपला सेवक, माझा बाप दावीद, ह्याला दिले ते तू पाळले आहेस; जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस; अशी आज वस्तुस्थिती आहे. |
२५ |
तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक, माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होते की तू माझ्यासमोर वागत आलास त्याप्रमाणेच तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटायची नाही; त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर. |
२६ |
तर आता हे इस्राएलाच्या देवा, तू जे वचन तुझा सेवक, माझा बाप दावीद, ह्याला दिले होते ते प्रतीतीस येऊ दे. |
२७ |
देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा? |
२८ |
तरी हे माझ्या देवा, परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे, विनंतीकडे लक्ष दे; आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझ्यापुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे; |
२९ |
माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो; जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. |
३० |
तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. |
३१ |
एखाद्याने आपल्या शेजार्याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, |
३२ |
तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे. |
३३ |
तुझे लोक इस्राएल ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझ्याकडे वळतील आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून ह्या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करतील, |
३४ |
तेव्हा तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल ह्यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आण. |
३५ |
त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते तुझ्याकडे वळले, |
३६ |
तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्राएल तुझी प्रजा, तुझे सेवक, ह्यांच्या पापांची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांना शिकवत आहेस; हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहेस त्यावर पर्जन्यवृष्टी कर. |
३७ |
ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला, |
३८ |
आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील, |
३९ |
ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस; |
४० |
म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजांना दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगतील. |
४१ |
तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, |
४२ |
(कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू हे सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच,) आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, |
४३ |
तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील त्याप्रमाणे कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल. |
४४ |
तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यासाठी जातील आणि तू निवडलेल्या ह्या नगराकडे व तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, |
४५ |
तर तू स्वर्गातून त्यांची ती प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे. |
४६ |
त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले, |
४७ |
तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’; |
४८ |
आणि ज्यांनी त्यांना पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे जिवेभावे वळून, त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, |
४९ |
तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे; |
५० |
तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्याविरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्याविरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्यांना क्षमा करून, त्यांचा पाडाव करणार्यांच्या मनात दया उत्पन्न कर म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील; |
५१ |
कारण, ज्यांना तू मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून काढले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत; |
५२ |
तर तुझे नेत्र तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे व तुझ्या इस्राएल लोकांच्या विनवणीकडे उघडे राख; ते तुझा धावा करतील; त्यांच्याकडे कान दे. |
५३ |
कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलांना मिसर देशातून काढले त्या वेळी तुझा सेवक मोशे ह्याच्या द्वारे तू वचन दिलेस, त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यांना वेगळे केले आहेस.” |
५४ |
शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वराला करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला. |
५५ |
त्याने उभे राहून सर्व इस्राएल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला; तो म्हणाला, |
५६ |
“ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांना विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे ह्याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही. |
५७ |
आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजांबरोबर राहत असे तसाच तो आपल्याबरोबर राहो; तो आम्हांला न सोडो, तो आम्हांला न टाको; |
५८ |
आम्ही त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याने आमच्या पूर्वजांना दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावेत म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. |
५९ |
ज्या शब्दांनी मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे ते आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकांना व आपल्या इस्राएल लोकांना न्याय देवो. |
६० |
ह्यावरून ह्या भूतलावरील सर्व राष्ट्रे समजतील की परमेश्वर हाच देव आहे; अन्य कोणी नव्हे. |
६१ |
तर तुमचे मन आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे असे पूर्णपणे लागलेले असो की आजच्यासारखे त्याच्या नियमांप्रमाणे तुम्ही चालावे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात.” |
६२ |
मग राजाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले. |
६३ |
शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. |
६४ |
त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना. |
६५ |
शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी त्या वेळी महोत्सव केला, हमाथाच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्राएल लोकांचा मोठा जमाव एक सप्तक व आणखी एक सप्तक म्हणजे एकंदर चौदा दिवस आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उत्सव करीत राहिला. |
६६ |
आठव्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली; ते सर्व राजाचे अभीष्ट चिंतून आपापल्या डेर्यांस गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल ह्यांचे जे कल्याण परमेश्वराने केले त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१ राजे ८:1 |
१ राजे ८:2 |
१ राजे ८:3 |
१ राजे ८:4 |
१ राजे ८:5 |
१ राजे ८:6 |
१ राजे ८:7 |
१ राजे ८:8 |
१ राजे ८:9 |
१ राजे ८:10 |
१ राजे ८:11 |
१ राजे ८:12 |
१ राजे ८:13 |
१ राजे ८:14 |
१ राजे ८:15 |
१ राजे ८:16 |
१ राजे ८:17 |
१ राजे ८:18 |
१ राजे ८:19 |
१ राजे ८:20 |
१ राजे ८:21 |
१ राजे ८:22 |
१ राजे ८:23 |
१ राजे ८:24 |
१ राजे ८:25 |
१ राजे ८:26 |
१ राजे ८:27 |
१ राजे ८:28 |
१ राजे ८:29 |
१ राजे ८:30 |
१ राजे ८:31 |
१ राजे ८:32 |
१ राजे ८:33 |
१ राजे ८:34 |
१ राजे ८:35 |
१ राजे ८:36 |
१ राजे ८:37 |
१ राजे ८:38 |
१ राजे ८:39 |
१ राजे ८:40 |
१ राजे ८:41 |
१ राजे ८:42 |
१ राजे ८:43 |
१ राजे ८:44 |
१ राजे ८:45 |
१ राजे ८:46 |
१ राजे ८:47 |
१ राजे ८:48 |
१ राजे ८:49 |
१ राजे ८:50 |
१ राजे ८:51 |
१ राजे ८:52 |
१ राजे ८:53 |
१ राजे ८:54 |
१ राजे ८:55 |
१ राजे ८:56 |
१ राजे ८:57 |
१ राजे ८:58 |
१ राजे ८:59 |
१ राजे ८:60 |
१ राजे ८:61 |
१ राजे ८:62 |
१ राजे ८:63 |
१ राजे ८:64 |
१ राजे ८:65 |
१ राजे ८:66 |
|
|
|
|
|
|
१ राजे 1 / १राजे 1 |
१ राजे 2 / १राजे 2 |
१ राजे 3 / १राजे 3 |
१ राजे 4 / १राजे 4 |
१ राजे 5 / १राजे 5 |
१ राजे 6 / १राजे 6 |
१ राजे 7 / १राजे 7 |
१ राजे 8 / १राजे 8 |
१ राजे 9 / १राजे 9 |
१ राजे 10 / १राजे 10 |
१ राजे 11 / १राजे 11 |
१ राजे 12 / १राजे 12 |
१ राजे 13 / १राजे 13 |
१ राजे 14 / १राजे 14 |
१ राजे 15 / १राजे 15 |
१ राजे 16 / १राजे 16 |
१ राजे 17 / १राजे 17 |
१ राजे 18 / १राजे 18 |
१ राजे 19 / १राजे 19 |
१ राजे 20 / १राजे 20 |
१ राजे 21 / १राजे 21 |
१ राजे 22 / १राजे 22 |