A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

१ राजे ४शलमोन राजा सर्व इस्राएलाचा राजा होता.
त्याचे सरदार हे होते: सादोकाचा पुत्र अजर्‍या याजक,
शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक);
यहोयादाचा पुत्र बनाया सैन्यावर होता; सादोक व अब्याथार हे याजक होते.
नाथानाचा पुत्र अजर्‍या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता;
अहीशार हा खानगी कारभारी (घरकारभारी) होता; व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगार्‍यांवर होता.
शलमोनाचे बारा कमावीसदार असत; ते सर्व इस्राएलावर नेमलेले असून राजाला व त्याच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवत; वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे.
त्यांची नावे ही: एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशात बेन-हूर;
माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;
१०
अरुबोथात बेन हेसेद (ह्याच्याकडे सोखो व हेफेर प्रदेश होते);
११
दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती);
१२
तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;
१३
रामोथ-गिलादात बेन-गेबेर होता (ह्याच्याकडे मनश्शेचा पुत्र याईर ह्याची गिलादातली गावे होती; ह्याशिवाय आणखी बाशानातला अर्गोब प्रांत ह्यातली तटबंदी व पितळेचे अडसर असलेली साठ मोठी नगरे त्याच्याकडे होती);
१४
इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाइमात होता;
१५
नफतालीत अहीमास हा होता (त्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी विवाह केला होता);
१६
आशेर व आलोथ ह्यांत हूशयाचा पुत्र बाना हा होता;
१७
इस्साखारात पारूहाचा पुत्र यहोशाफाट हा होता;
१८
बन्यामिनात एलाचा पुत्र शिमी हा होता;
१९
ऊरीचा पुत्र गेबेर हा गिलादात होता; ह्या एवढ्या देशात तो एकटाच कमावीसदार होता. हा देश पूर्वी अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग ह्यांचा होता.
२०
यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.
२१
महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.
२२
शलमोनाला एका दिवसाची भोजनसामग्री लागे, ती येणेप्रमाणे: तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ;
२३
दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी.
२४
महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे.
२५
दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.
२६
रथांच्या घोड्यांची चाळीस हजार ठाणी व बारा हजार स्वार शलमोन बाळगून होता.
२७
शलमोन राजाला व त्याच्या पंक्तीला भोजन करणार्‍यांसाठी कमावीसदार त्यांच्या-त्यांच्या नेमलेल्या महिन्यांत अन्नाचा पुरवठा करीत; कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत.
२८
रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे.
२९
देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.
३०
शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.
३१
तो सर्व मनुष्यांहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा ह्या सर्वांहून शहाणा होता, आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.
३२
त्याने तीन हजार नीतिसूत्रे कथन केली व एक हजार पाच गीते रचली.
३३
त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्‍या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले.
३४
पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकायला येत असत.१ राजे ४:1
१ राजे ४:2
१ राजे ४:3
१ राजे ४:4
१ राजे ४:5
१ राजे ४:6
१ राजे ४:7
१ राजे ४:8
१ राजे ४:9
१ राजे ४:10
१ राजे ४:11
१ राजे ४:12
१ राजे ४:13
१ राजे ४:14
१ राजे ४:15
१ राजे ४:16
१ राजे ४:17
१ राजे ४:18
१ राजे ४:19
१ राजे ४:20
१ राजे ४:21
१ राजे ४:22
१ राजे ४:23
१ राजे ४:24
१ राजे ४:25
१ राजे ४:26
१ राजे ४:27
१ राजे ४:28
१ राजे ४:29
१ राजे ४:30
१ राजे ४:31
१ राजे ४:32
१ राजे ४:33
१ राजे ४:34


१ राजे 1 / १राजे 1
१ राजे 2 / १राजे 2
१ राजे 3 / १राजे 3
१ राजे 4 / १राजे 4
१ राजे 5 / १राजे 5
१ राजे 6 / १राजे 6
१ राजे 7 / १राजे 7
१ राजे 8 / १राजे 8
१ राजे 9 / १राजे 9
१ राजे 10 / १राजे 10
१ राजे 11 / १राजे 11
१ राजे 12 / १राजे 12
१ राजे 13 / १राजे 13
१ राजे 14 / १राजे 14
१ राजे 15 / १राजे 15
१ राजे 16 / १राजे 16
१ राजे 17 / १राजे 17
१ राजे 18 / १राजे 18
१ राजे 19 / १राजे 19
१ राजे 20 / १राजे 20
१ राजे 21 / १राजे 21
१ राजे 22 / १राजे 22