१ |
ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि त्यांच्या मेगेथ-अम्माची (मातृनगराची) सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. |
२ |
मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. |
३ |
सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता त्याचा दाविदाने मोड केला. |
४ |
दाविदाने एक हजार सातशे स्वार आणि वीस हजार पायदळ त्याच्यापासून हस्तगत केले; रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडल्या, मात्र त्यांतून शंभर घोडे राखून ठेवले. |
५ |
आणि दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हददेजर ह्याची कुमक करायला आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला. |
६ |
मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई. |
७ |
हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या. |
८ |
हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले. |
९ |
दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले. |
१० |
दाविदाने हददेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता म्हणून तोई राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारायला व त्याचे अभिनंदन करायला आपला पुत्र योराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हददेजर व तोई ह्यांच्या लढाया होत असत. योरामाने आपल्याबरोबर चांदीची, सोन्याची व पितळेची पात्रे आणली; |
११ |
सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदीसोन्याबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला अर्पण केली; |
१२ |
अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर ह्या सर्वांपासून मिळवलेली ही लूट होती. |
१३ |
दावीद क्षार खोर्यात अठरा हजार अराम्यांना मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले. |
१४ |
त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली; अदोमाच्या सर्व प्रांतांत त्याने ठाणी बसवली व सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे जेथे गेला तेथे तेथे परमेश्वराने त्याला यश दिले. |
१५ |
दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे. |
१६ |
त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस (इतिहासलेखक) अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता; |
१७ |
अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अहीमलेख हे याजक होते, आणि सराया हा चिटणीस होता; |
१८ |
करेथी व पलेथी (व्यक्तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते.
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ शमुवेल ८:1 |
२ शमुवेल ८:2 |
२ शमुवेल ८:3 |
२ शमुवेल ८:4 |
२ शमुवेल ८:5 |
२ शमुवेल ८:6 |
२ शमुवेल ८:7 |
२ शमुवेल ८:8 |
२ शमुवेल ८:9 |
२ शमुवेल ८:10 |
२ शमुवेल ८:11 |
२ शमुवेल ८:12 |
२ शमुवेल ८:13 |
२ शमुवेल ८:14 |
२ शमुवेल ८:15 |
२ शमुवेल ८:16 |
२ शमुवेल ८:17 |
२ शमुवेल ८:18 |
|
|
|
|
|
|
२ शमुवेल 1 / २शमुवे 1 |
२ शमुवेल 2 / २शमुवे 2 |
२ शमुवेल 3 / २शमुवे 3 |
२ शमुवेल 4 / २शमुवे 4 |
२ शमुवेल 5 / २शमुवे 5 |
२ शमुवेल 6 / २शमुवे 6 |
२ शमुवेल 7 / २शमुवे 7 |
२ शमुवेल 8 / २शमुवे 8 |
२ शमुवेल 9 / २शमुवे 9 |
२ शमुवेल 10 / २शमुवे 10 |
२ शमुवेल 11 / २शमुवे 11 |
२ शमुवेल 12 / २शमुवे 12 |
२ शमुवेल 13 / २शमुवे 13 |
२ शमुवेल 14 / २शमुवे 14 |
२ शमुवेल 15 / २शमुवे 15 |
२ शमुवेल 16 / २शमुवे 16 |
२ शमुवेल 17 / २शमुवे 17 |
२ शमुवेल 18 / २शमुवे 18 |
२ शमुवेल 19 / २शमुवे 19 |
२ शमुवेल 20 / २शमुवे 20 |
२ शमुवेल 21 / २शमुवे 21 |
२ शमुवेल 22 / २शमुवे 22 |
२ शमुवेल 23 / २शमुवे 23 |
२ शमुवेल 24 / २शमुवे 24 |