१ |
परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले. |
२ |
तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय. |
३ |
माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस. |
४ |
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. |
५ |
मृत्युतरंगांनी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले. |
६ |
अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश माझ्यावर आले. |
७ |
मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. |
८ |
तेव्हा पृथ्वी हालली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. |
९ |
त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासत चालला होता. त्यामुळे निखारे धगधगत होते. |
१० |
तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता. |
११ |
तो करूबारुढ होऊन उडाला, वायूच्या पंखांवर तो दृष्टीस पडला. |
१२ |
त्याने आपल्याभोवती जलसंचय, आणि अंतराळातील अति घन मेघ ह्यांच्या अंधकाराचे मंडप आपल्यासभोवार केले. |
१३ |
त्याच्यापुढील तेजातून निखारे धगधगत होते. |
१४ |
परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली. |
१५ |
त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. |
१६ |
तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. |
१७ |
त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलसंचयांतून मला बाहेर काढले. |
१८ |
माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्यापासून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्याहून अति बलिष्ठ होते. |
१९ |
माझ्या विपत्काळी ते माझ्यावर चालून आले; तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. |
२० |
त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्याने मला सोडवले, कारण माझ्यामध्ये त्याला संतोष होता. |
२१ |
परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. |
२२ |
कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. |
२३ |
तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही, |
२४ |
मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले. |
२५ |
ह्यास्तव परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले. |
२६ |
दयाळू जनांशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस; |
२७ |
शुद्ध जनांशी तू शुद्ध भावनेने वागतोस कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस. |
२८ |
दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस. |
२९ |
हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. |
३० |
तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. |
३१ |
देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे. |
३२ |
परमेश्वराशिवाय देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? |
३३ |
देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो. |
३४ |
तो माझे पाय हरिणीच्या पायांसारखे करतो, आणि मला माझ्या उच्च स्थानांवर स्थापतो. |
३५ |
तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. |
३६ |
तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. |
३७ |
तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस. माझे पाय घसरले नाहीत. |
३८ |
मी आपल्या वैर्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला, आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. |
३९ |
मी त्यांचा धुव्वा उडवला, मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले. |
४० |
लढाईकरता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास, माझ्यावर उठलेल्यास तू माझ्याखाली चीत केलेस. |
४१ |
तू माझ्या वैर्यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. |
४२ |
त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. |
४३ |
तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले. |
४४ |
माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; मी राष्ट्रांचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. |
४५ |
परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले; माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले. |
४६ |
परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले |
४७ |
परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझा तारणदुर्ग जो देव त्याचा महिमा वाढो; |
४८ |
त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. |
४९ |
तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस. |
५० |
ह्यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुती करीन, तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन. |
५१ |
तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करतो, आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.”
|
Marathi Bible 2015 |
Copyright © 2015 by The Bible Society of India |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
२ शमुवेल २२:1 |
२ शमुवेल २२:2 |
२ शमुवेल २२:3 |
२ शमुवेल २२:4 |
२ शमुवेल २२:5 |
२ शमुवेल २२:6 |
२ शमुवेल २२:7 |
२ शमुवेल २२:8 |
२ शमुवेल २२:9 |
२ शमुवेल २२:10 |
२ शमुवेल २२:11 |
२ शमुवेल २२:12 |
२ शमुवेल २२:13 |
२ शमुवेल २२:14 |
२ शमुवेल २२:15 |
२ शमुवेल २२:16 |
२ शमुवेल २२:17 |
२ शमुवेल २२:18 |
२ शमुवेल २२:19 |
२ शमुवेल २२:20 |
२ शमुवेल २२:21 |
२ शमुवेल २२:22 |
२ शमुवेल २२:23 |
२ शमुवेल २२:24 |
२ शमुवेल २२:25 |
२ शमुवेल २२:26 |
२ शमुवेल २२:27 |
२ शमुवेल २२:28 |
२ शमुवेल २२:29 |
२ शमुवेल २२:30 |
२ शमुवेल २२:31 |
२ शमुवेल २२:32 |
२ शमुवेल २२:33 |
२ शमुवेल २२:34 |
२ शमुवेल २२:35 |
२ शमुवेल २२:36 |
२ शमुवेल २२:37 |
२ शमुवेल २२:38 |
२ शमुवेल २२:39 |
२ शमुवेल २२:40 |
२ शमुवेल २२:41 |
२ शमुवेल २२:42 |
२ शमुवेल २२:43 |
२ शमुवेल २२:44 |
२ शमुवेल २२:45 |
२ शमुवेल २२:46 |
२ शमुवेल २२:47 |
२ शमुवेल २२:48 |
२ शमुवेल २२:49 |
२ शमुवेल २२:50 |
२ शमुवेल २२:51 |
|
|
|
|
|
|
२ शमुवेल 1 / २शमुवे 1 |
२ शमुवेल 2 / २शमुवे 2 |
२ शमुवेल 3 / २शमुवे 3 |
२ शमुवेल 4 / २शमुवे 4 |
२ शमुवेल 5 / २शमुवे 5 |
२ शमुवेल 6 / २शमुवे 6 |
२ शमुवेल 7 / २शमुवे 7 |
२ शमुवेल 8 / २शमुवे 8 |
२ शमुवेल 9 / २शमुवे 9 |
२ शमुवेल 10 / २शमुवे 10 |
२ शमुवेल 11 / २शमुवे 11 |
२ शमुवेल 12 / २शमुवे 12 |
२ शमुवेल 13 / २शमुवे 13 |
२ शमुवेल 14 / २शमुवे 14 |
२ शमुवेल 15 / २शमुवे 15 |
२ शमुवेल 16 / २शमुवे 16 |
२ शमुवेल 17 / २शमुवे 17 |
२ शमुवेल 18 / २शमुवे 18 |
२ शमुवेल 19 / २शमुवे 19 |
२ शमुवेल 20 / २शमुवे 20 |
२ शमुवेल 21 / २शमुवे 21 |
२ शमुवेल 22 / २शमुवे 22 |
२ शमुवेल 23 / २शमुवे 23 |
२ शमुवेल 24 / २शमुवे 24 |